AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदेंकडून अशी अपेक्षा नव्हती… जरांगे पाटलांच्या टीकेला शिंदेंचे उत्तर, आरक्षणाबाबत मोठं विधान

Jarange vs Shinde : प्रमाणपत्र अपात्रतेच्या मुद्द्यावर बोलताना जरांगेंनी, 'मला एकनाथ शिंदे यांच्याकडून अपेक्षा नव्हती.' असं विधान केले आहे. यावर आता शिंदेंनी उत्तर दिले आहे.

एकनाथ शिंदेंकडून अशी अपेक्षा नव्हती... जरांगे पाटलांच्या टीकेला शिंदेंचे उत्तर, आरक्षणाबाबत मोठं विधान
Shinde vs JarangeImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 06, 2026 | 7:59 PM
Share

मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे जरांगे पाटील यांनी आतापर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर मराठा आरक्षणाबाबत टीका केली नव्हती. मात्र आता जरांगे यांनी एकनाथ शिंदेंवर भाष्य केले आहे. प्रमाणपत्र अपात्रतेच्या मुद्द्यावर बोलताना जरांगेंनी, ‘शिंदे साहेब मी तुमचे सर्व लोकं झोपून टाकीन, पाडून टाकीन, मला एकनाथ शिंदे यांच्याकडून अपेक्षा नव्हती. किती दिवस डबल ढोलकी वाजवणार’ असा सवाल एकनाथ शिंदे यांना विचारला आहे. यावर आता एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे.

काय म्हणाले होते मनोज जरांगे?

जरांगे पाटील यांनी म्हटले होते की, ‘एकनाथ शिंदे यांच्या नेत्याच्या कॉलेज मध्ये बैठका घेतात. मराठ्यांना सांगतो आपलं सर्व सत्य आहे. बावनकुळेंनी आपलं प्रमाणपत्र रद्द करायला लावलं. काय उपयोग आहे आपला. मंत्र्याचा आदेश आला अधिकारी थरथर कापायला लागला. हे असेच मराठ्यांचे वाटोळं करणार आहे. वाटोळं करायचं नसेल तर प्रत्येक आंदोलनात मोठ्या प्रमाणात उतरावं लागेल. आपल्याला मुंबईत जावं लागणार आहे. यांना दाखवावं लागलं आहे.’

पुढे बोलताना जरांगे पाटलांनी म्हटले की, ‘शिंदे विरोधात जातील असं कधी वाटलं नव्हतं. पण त्यांच्या कॉलेजवर आपल्या विरोधात बैठका होतात. ज्यांचं काही आरक्षणाचं घेणंदेणं नाही, त्यांना सभेला घेऊन येतात. गर्दी जमली म्हणून दाखवतात. काय शिरसाट साहेब. तुम्हालाही दोन मुलं आहेत. आमचीही मुलं आहे. आमचा तळतळाट घेऊ नका. यांना 29 ऑगस्टला हिसका दाखवावा लागेल. एकजुटीने राहा. सावध व्हा. सरकारला गुडघ्यावर आणायचं आहे. एकनाथ शिंदे यांनी आम्हाला एवढं नाराज करायला नको होतं. मला शिंदेंकडून ही अपेक्षा नव्हती. मी खूप खुनशी आहे. एकदा डोक्यात गेला तर सोडत नसतो.’

जरांगेंचे गैरसमज दूर होईल – शिंदे

या सर्व टीकेला उत्तर देताना एकनाथ शिंदेंनी म्हटले की, उदय सामंत यांनी मनोज जरांगेशी चर्चा केली आहे. उदय सामंतांचा मला फोन आला होता. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा मराठा समाजासाठी 10 टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला होता. कुणबी प्रमाणपत्रही आमच्या काळात भेटायला लागले. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता आपण आरक्षण दिलं. सारथी आणि अण्णासाहेब महामंडळाला निधी दिलेला आहे. आम्ही मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयाची कल्पना मनोज जरांगेना आहे. मनोज जरांगे पाटलांचा गैरसमज दूर होईल.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल