IPL 2026: ऋषभ पंतच्या एक्स गर्लफ्रेंडने आपली चूक सुधारली, श्रेयस अय्यरला दिली अशी साथ

आयपीएल 2026 स्पर्धेत पंजाब किंग्सची विजयी घोडदौड अखेर राजस्थान रॉयल्सने रोखली. या सामन्यादरम्यान ईशा नेगीने एक इंस्टाग्राम पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये एक चूक होती. मात्र त्यानंतर त्यात सुधारणा केली, पण तिथपर्यंत ती पोस्ट व्हायरल झाली होती.

IPL 2026: ऋषभ पंतच्या एक्स गर्लफ्रेंडने आपली चूक सुधारली, श्रेयस अय्यरला दिली अशी साथ
IPL 2026: ऋषभ पंतच्या एक्स गर्लफ्रेंडने आपली चूक सुधारली, श्रेयस अय्यरला दिली अशी साथ
Image Credit source: PTI
| Updated on: Apr 29, 2026 | 4:46 PM

आयपीएल 2026 स्पर्धेत पंजाब किंग्सने प्लेऑफच्या दिशेने कूच केली आहे. पण राजस्थान रॉयल्सने पराभवाचा दणका देऊन या मार्गात खोडा घातला. आता पंजाब किंग्सला आणखी दोन विजय मिळवणं भाग आहे. असं असताना ऋषभ पंतची एक्स गर्लफ्रेंड ईशा नेगी या सामन्यादरम्यान चर्चेत आली आहे. तिने या स्पर्धेत श्रेयस अय्यर नेतृत्व करत असलेल्या पंजाब किंग्सला पाठिंबा दिला आहे. त्याच्यासाठी एक व्हिडीओही शेअर केला होता. पण हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड करताच एक चूक लक्षात आली. त्यानंतर ईशा नेगीने चूक दुरूस्त केली खरी पण तिथपर्यंत सोशल मीडियावर तिचा हा व्हिडीओ चुकीसह व्हायरल झाला होता.

ईशा नेगी पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स सामना पाहण्यासाठी मुल्लांपूरच्या स्टेडियममध्ये पोहोचली होती. या पर्वात तिने पंजाब किंग्सला पाठिंबा दिला आहे. रिपोर्टनुसार, ऋषभ पंत आणि ईशा नेगी एकमेकांपासून वेगळे होऊन एक वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. इतकंच दोघं एकमेकांना सोशल मीडियावर फॉलोही करत नाहीत.

आयपीएल 2026 स्पर्धेत ईशा नेगी पहिल्यांदाच सामना पाहण्यासाठी गेली होती. तिने पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स सामन्याचा पुरेपूर फायदा उचलला. यावेळी तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. यात पंजाब किंग्साठी हातात झेंडा घेऊन प्रोत्साहान देताना दिसत होती. तिने पोस्टमध्ये पंजाब किंग्स आवडता संघ आणि श्रेयस अय्यर आवडता कर्णधार असल्याचं सांगितलं. टॉपचा इमोजी टाकत लिहिलं की, या संघासारखा दुसरा संघ नाही.

पण हे अर्धसत्य आहे. कारण यापूर्वी तिने वेगळं पोस्ट केलं होतं. यात तिने कॅप्शनमध्ये एक ओळ लिहिली होती. फक्त एकच टेन्शन होतं की पंजाब किंग्स टॉपवरून खाली येता कामा नये, असं लिहिलं होतं.

ईशा नेगीला वाटलं होतं की, राजस्थानकडून पराभूत होताच पंजाब किंग्सचं पहिलं स्थान जाईल. पण पंजाब किंग्सच्या खात्यात 13 गुण होते. त्यामुळे राजस्थानने सामना जिंकला आणि त्यांचे 12 गुण झाले. त्यामुळे पंजाब किंग्सचं पहिलं स्थान काय झालं.

Follow Us