IPL 2026, KKR vs RR: कोलकात्यासमोर आता राजस्थान रॉयल्सचं आव्हान, आकडेवारीत कोण बेस्ट?

आयपीएल 2026 स्पर्धेच्या 28व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत होणार आहे. या स्पर्धेत कोलकात्याची स्थिती नाजूक आहे. तर राजस्थान रॉयल्स जबरदस्त फॉर्मात आहे. त्यामुळे या सामन्यात काय निकाल लागतो याकडे लक्ष लागून आहे.

IPL 2026, KKR vs RR: कोलकात्यासमोर आता राजस्थान रॉयल्सचं आव्हान, आकडेवारीत कोण बेस्ट?
IPL 2026, KKR vs RR: कोलकात्यासमोर आता राजस्थान रॉयल्सचं आव्हान, आकडेवारीत कोण बेस्ट?
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 18, 2026 | 5:56 PM

आयपीएल 2026 स्पर्धेच्या 28व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमनेसामने येणार आहे. हा सामना कोलकात्याचं होमग्राउंड असलेल्या इडन गार्डनवर रविवारी दुपारी 3.30 वाजता होणार आहे. राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत खेळलेल्या पाच पैकी चार सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच 8 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. मागच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सला पराभूत केलं होतं. त्यामुळे अव्वल स्थान हुकलं होतं. त्यामुळे कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून टॉपला पोहोचण्याची धडपड असेल. तर कोलकात्याला आता प्रत्येक सामना करो या मरोची लढाई आहे. कोलकात्याने आतापर्यंत सहा सामने खेळले आणि त्यापैकी पाच सामन्यात पराभूत झाले आहेत. गुणतालिकेत 1 गुण मिळवून सर्वात शेवटच्या स्थानी आहे. त्यामुळे कोलकात्यासाठी हा सामना खूपच महत्त्वाचा आहे. कारण हा सामना गमावला तर संघाचं मनोबल पूर्णपणे खचून जाईल.

कोलकाता राजस्थान हेड टू हेड

आयपीएलमध्ये केकेआर आणि राजस्थान रॉयल्स संघ 32 वेळा आमनेसामने आले आहेत. तसं पाहिलं तर आकडेवारीत कोलकात्याचा संघ वरचढ आहे.कारण केकेआरने 16 सामने, राजस्थान रॉयल्सने 14 सामने जिंकले आहेत. तर दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. राजस्थानविरुद्ध केकेआरची सर्वोच्च सांघिक धावसंख्या 223, तर सर्वात कमी धावसंख्या 125 आहे. दुसरीकडे, राजस्थानने केकेआरविरुद्ध 224 ही सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे, तर सर्वात कमी धावसंख्या 81 आहे. मागच्या पर्वात कोलकात्याने दोन्ही सामने जिंकले होते. पण या स्पर्धेतील राजस्थान रॉयल्सचा फॉर्म पाहता कोलकाता नाईट रायडर्सला खूपच कठीण जाणार आहे.

एक्युवेदर वेबसाइटनुसार , 19 एप्रिल रोजी कोलकातामध्ये पावसाची शक्यता नाही. त्यामुळे हा सामना 20 षटकांचा होईल. सामन्यादरम्यान हवामान मुख्यतः निरभ्र राहील आणि तापमान 34 ते29 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असेल. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करणं पसंत केलं जाईल. सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांना थोडी मदत मिळू शकते. त्यानंतर फलंदाजांना पूरक अशी खेळपट्टी असेल. त्यामुळे कोलकात्याच्या ईडन गार्डनवर धावांचा पाठलाग करणं सोपं जातं.

Follow Us