AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: वैभव सूर्यवंशीसोबत घेतलेला पंगा पडला महागात, काईल जेमिसनवर बीसीसीआयची थेट कारवाई

आयपीएल 2026 स्पर्धेतील 43व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सला मात दिली. या सामन्यात वैभव सूर्यवंशीची विकेट महत्त्वाची ठरली. या विकेटनंतर काईल जेमिसनने विचित्र सेलीब्रेशन केलं. यानंतर बीसीसीआयने कारवाईचा बडगा उचलला आहे.

IPL 2026: वैभव सूर्यवंशीसोबत घेतलेला पंगा पडला महागात, काईल जेमिसनवर बीसीसीआयची थेट कारवाई
IPL 2026: वैभव सूर्यवंशीसोबत घेतलेला पंगा पडला महागात, काईल जेमिसनवर बीसीसीआयची थेट कारवाईImage Credit source: PTI
| Updated on: May 02, 2026 | 5:30 PM
Share

Kyle Jamieson vs Vaibhav Sooryavanshi: आयपीएल 2026 स्पर्धेत 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीची दहशत आहे. त्याने भल्याभल्या गोलंदाजांना कात्रजचा घाट दाखवला आहे. त्यामुळे वैभव सूर्यवंशी समोर असला की दिग्गज गोलंदाजांचाही थरकाप उडतो. कारण त्याने आपल्या आक्रमक शैलीने दिग्गज गोलंदाजांना अस्वस्थ करून सोडलं आहे. असं असताना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आयपीएलच्या 43व्या सामन्यात भिडले. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल ही आक्रमक जोडी मैदानात उतरली. पहिल्या षटकात मिचेल स्टार्कने यशस्वी जयस्वालला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर दुसरं षटक टाकण्यासाठी काईल जेमिसन आला आणि समोर होतो तो वैभव सूर्यवंशी.. वैभव सूर्यवंशीने पहिल्याच चेंडूवर चौकार मारत आक्रमक बाणा दाखवला. काईल जेमिसनने दुसरा चेंडू बुलेट यॉर्कर टाकला आणि त्याच्या दांड्या उडवल्या.

वैभव सूर्यवंशीला क्लिन बोल्ड केल्यानंतर काईल जेमिसनच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. त्याने विकेट घेताच आक्रमक सेलीब्रेशन केलं. विकेट पडल्यानंतर जेमिसन वारंवार टाळ्या वाजवताना आणि वैभवच्या डोळ्यात डोळे घालून पाहताना दिसला होता. त्याचं सेलीब्रेशन पाहून क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला. या सेलीब्रेशनची दखल बीसीसीआयने घेतली असून त्याच्यावर कारवाईचा बडगा उचलला आहे. काइल जेमिसनने आयपीएल स्पर्धेतील आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचं उघड झालं आहे. ही घटना आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.5 चे उल्लंघन मानली गेलीसामनाधिकारी राजीव सेठ यांनी त्याला लेव्हल 1 चा इशारा दिला असून एक डिमेरिट पॉइंटही दिला आहे. त्याच्या कृतीमुळे फलंदाजाकडून आक्रमक प्रतिक्रिया येऊ शकली असती.

काईल जेमिसन आक्रमक सेलीब्रेशन करत असताना वैभव सूर्यवंशीही त्याच्यात एकटक पाहात होता. वैभव सूर्यवंशी 2 चेंडूत 4 धावा करून बाद झाला. आता या दोघांचा पुन्हा एकदा होणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ 17 मे रोजी पुन्हा भिडणार आहेत. त्यामुळे या सामन्याची उत्सुकता आतापासून लागली आहे. कारण आक्रमक सेलीब्रेशननंतर वैभव सूर्यवंशीच्या मनात कालवाकालव झाली असणार आहे. त्यामुळे पुढच्या सामन्यात वैभव आपल्या आक्रमक शैलीची इंगा दाखवणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल