AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LSG vs RCB Toss : लखनौला करो या मरो सामन्यात बॅटिंगची संधी, अर्जून तेंडुलकरला संधी?

Lucknow Super Giants vs Royal Challengers Bengaluru Toss and Playing 11, IPL 2026 : लखनौ सुपर जायंट्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध घरच्या मैदानात बॅटिंग करणार आहे. जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग ईलेव्हन.

LSG vs RCB Toss : लखनौला करो या मरो सामन्यात बॅटिंगची संधी, अर्जून तेंडुलकरला संधी?
RCB vs LSG Toss IPL 2026Image Credit source: IPL X Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 07, 2026 | 7:39 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 50 व्या सामन्यात आज 7 मे रोजी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे लखनौमधील एकाना स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. आरसीबीच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार याने फिल्डिंगचा निर्णय घेत लखनौला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. दोन्ही संघांनी प्लेइंग ईलेव्हनमध्ये केलेल्या बदलांबाबत जाणून घेऊयात.

गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केलेला नाही. तर लखनौने 3 बदल केले आहेत. जोश इंग्लिस, मोहसीन खान आणि आवेश खान या तिघांना बाहेर करण्यात आलं आहे. तर अर्शीन कुलकर्णी, दिग्वेश राठी आणि शाहबाज अहमद यांचा समावेश करण्यात आला आहे. लखनौ अर्जुन तेंडुलकर याला संधी देईल, अशी आशा चाहत्यांना होती. मात्र तसं झालंले नाही. त्यामुळे अर्जुनला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळवण्यासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

लखनौसाठी अस्तित्वाचा सामना

लखनौ आणि आरसीबी दोन्ही संघांचा हा या हंगामातील दहावा सामना आहे. आरसीबीने 9 पैकी 6 सामने जिंकले आहेत. तर लखनौला 9 पैकी फक्त 2 सामनेच जिंकता आले आहेत. त्यामुळे लखनौला प्लेऑफमधील आपलं जर तरचं आव्हान कायम राखायचं असेल तर आरसीबी विरुद्ध कोणत्याही स्थिती सामना जिंकावा लागणार आहे. त्यामुळे पंतसेना आरसीबीला पराभूत करण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

लखनौ पराभवाची परतफेड करणार?

तसेच दोन्ही संघांची या हंगामात आमनेसामने येण्याची दुसरी वेळ आहे. दोन्ही संघांत 15 एप्रिलला सामना खेळवण्यात आला होता. आरसीबीने त्या सामन्यात लखनौवर 5 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यामुळे आता लखनौ आरसीबीवर मात करुन गेल्या पराभवाची परतफेड करणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

आरसीबीने टॉस जिंकला

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : जेकब बेथेल, विराट कोहली, देवदत्त पडीक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), कृणाल पंड्या, रोमॅरियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, रसिक सलाम दार आणि जोश हेजलवुड.

लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : मिचेल मार्श, अर्शिन कुलकर्णी, निकोलस पूरन, एडन मार्करम, ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), अक्षत रघुवंशी, हिम्मत सिंग, शाहबाज अहमद, दिग्वेश सिंग राठी, मोहम्मद शमी आणि प्रिन्स यादव.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?