MI vs PBKS : मुंबईसमोर वानखेडेत पंजाबचं आव्हान, पलटणच्या Playing 11 मध्ये बदल फिक्स! कुणाला डच्चू?

Mumbai Indians Probable Playing 11 Against Punjab Kings : मुंबईसमोर वानखेडे स्टेडियममध्ये पंजाब किंग्सचं आव्हान असणार आहे.

MI vs PBKS : मुंबईसमोर वानखेडेत पंजाबचं आव्हान, पलटणच्या Playing 11 मध्ये बदल फिक्स! कुणाला डच्चू?
Shreyas Iyer and Rohit Sharma MI vs PBKS
Image Credit source: Bcci
| Updated on: Apr 16, 2026 | 3:53 AM

मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली. मुंबईने कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत करुन विजयी सलामी दिली. मात्र त्यानंतर मुंबईला सलग 3 पराभवांचा सामना करावा लागला. तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पंड्या याने प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. त्यामुळे आता पंजाब विरूद्धच्या सामन्यातून कॅप्टन हार्दिक पंड्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करणार असल्याचं स्पष्ट आहे. अशात पंजाब विरूद्धच्या सामन्यासाठी पलटणची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन कशी असणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

तिलक वर्माला डच्चू?

तिलक वर्मा मुंबईचा प्रमुख फलंदाज आहे. तिलक प्रामुख्याने तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी खेळतो. मात्र तिलकला या मोसमात आतापर्यंत काही खास करता आलेलं नाही. तिलकने आतापर्यंतच्या 4 सामन्यांत अनु्क्रमे 20, 0,14 आणि 1 अशा धावा केल्या आहेत. त्यामुळे कॅप्टन हार्दिक तिलकला डच्चू देणार की विश्वास दाखवत प्लेइंग ईलेव्हनमध्ये काय राखणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पंजाब-मुंबईत टफ फाईट

पंजाब आणि मुंबईत यांच्यात गुरुवारी 16 एप्रिलला होणारा 35 वा सामना असणार आहे. याआधी उभयसंघातील 34 सामन्यांचा निकाल पाहिल्यास दोन्ही संघ तुल्यबळ आहेत असंच म्हणावं लागेल. दोन्ही संघांनी प्रत्येकी 17-17 सामने जिंकले आहेत. त्यामुळे गुरुवारी कोणता संघ विजय मिळवून आघाडी घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बुमराह खातं उघडणार का?

जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. मात्र दुर्देव असं की बुमराहची या मोसमातील 4 सामन्यानंतरही पहिल्या विकेटची प्रतिक्षा कायम आहे. मात्र बुमराहला प्लेइंग ईलेव्हनमधून बाहेर करणं धाडसाचं ठरेल. त्यामुळे बुमराह पंजाब विरुद्ध कशी कामगिरी करतो हे पंजाब विरुद्ध बॉलिंगदरम्यानच स्पष्ट होईल.

तसेच मुंबईचा प्रमुख फलंदाज रोहित शर्मा याला आरसीबी विरूद्धच्या दुखापतीमुळे पंजाब विरुद्ध खेळता येणार नसल्याचं म्हटलं जातंय. मात्र याबाबत अधिकृत माहिती देण्यात नाही. त्यामुळे आता कॅप्टन हार्दिक बदलाच्या संकेतानंतर काय निर्णय घेतो याची चाहत्यांना प्रतिक्षा असणार आहे.

मुंबई-पंजाबची वानखेडेतील आकडेवारी

मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात आतापर्यंत वानखेडे स्टेडियमध्ये एकूण 10 सामने खेळवण्यात आले आहेत. दोन्ही संघांनी वानखेडे स्टेडियममध्ये प्रत्येकी 5-5 सामने जिंकले आहेत.

पंजाब विरुद्धच्या सामन्यासाठी मुंबईची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कॅप्टन), नमन धीर, मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, ट्रेंट बोल्ट, मयंक मार्कंडे आणि जसप्रीत बुमराह.

Follow Us