IPL 2026, MI vs RR: वैभव सूर्यवंशीचा मुंबई इंडियन्सला दणका, बुमराह-बोल्ट आणि ठाकुरचे हाल

आयपीएल 2026 स्पर्धेच्या 13व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला झोडलं. पावसामुळे हा सामना फक्त 11 षटकांचा झाला. या सामन्यात ध्रुव जुरेल वगळता सर्वच फलंदाज चालले. वैभव सूर्यवंशीने तर कहर केला.

IPL 2026, MI vs RR: वैभव सूर्यवंशीचा मुंबई इंडियन्सला दणका, बुमराह-बोल्ट आणि ठाकुरचे हाल
वैभव सूर्यवंशीचा मुंबई इंडियन्सला दणका, बुमराह-बोल्ट आणि ठाकुरचे हाल
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 07, 2026 | 11:27 PM

आयपीएल 2026 स्पर्धेतील 13 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. खरं तर संघात दिग्गज गोलंदाजांचा ताफा असल्याने राजस्थान रॉयल्सला कठीण जाईल असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही. राजस्थान रॉयल्सने पहिल्या चेंडूपासून आक्रमक पवित्रा घेतला. दीपक चाहर पहिलं षटक टाकण्यासाठी आला होता. तर स्ट्राईकला यशस्वी जयस्वाल होता. त्याने पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकात, तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथा चेंडू निर्धाव, पाचवा आणि सहाव्या चेंडूवर पुन्हा चौकार मारला. पहिल्या षटकात 22 धावा आल्या. पण उत्सुकता वैभव सूर्यवंशीची होती. कारण जसप्रीत बुमराहच्या हाती चेंडू सोपवला होता आणि समोर वैभव सूर्यवंशी होता. त्यामुळे हे द्वंद्व पाहण्यासाठी क्रीडाप्रेमी उत्सुक होते.

वैभव सूर्यवंशीने जसप्रीत बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. खरं तर असं कोणालाच अपेक्षित नव्हतं. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी असं काही करेल असं वाटलं नाही. कारण त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. चौथ्या चेंडूवर पुन्हा स्ट्राईकला आणि त्याने पुन्हा एकदा जसप्रीत बुमराहला षटकार मारला. पुढच्या षटकात वैभव सूर्यवंशीचा सामना ट्रेंट बोल्टशी झाला. या षटकात यशस्वी जयस्वालचा आक्रमक बाणा पाहायला मिळाला. चौथ्या चेंडूवर वैभव सूर्यवंशी स्ट्राईकला आणि त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. म्हणजेच बुमराहनंतर ट्रेंड बोल्टच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. हार्दिक पांड्याच्या षटकात वैभवला काही करता आलं नाही.

पुढच्या षटकात शार्दुल ठाकुर समोर आला आणि स्ट्राईकला वैभव सूर्यवंशी होता. त्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. त्यानंतर पाचव्या चेंडूवर पुन्हा स्ट्राईकला आला आणि षटकार मारला. पण सहाव्या चेंडूवर झेल बाद झाला. वैभव सूर्यवंशीने 14 चेंडूत 1 चौकार आणि 5 षटकार मारत 39 धावांची खेळी केली. त्याने 278.57 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. वैभव सूर्यवंशीची फलंदाजी पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

Follow Us