PBKS vs DC : प्रियांश-श्रेयसची अर्धशतकी खेळी, दिल्लीसमोर 211 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?

Punjab Kings vs Delhi Capitals, 1st Innings Highlights In Marathi : पंजाब किंग्सने हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये दिल्ली कॅपिट्ल्ससमोर 211 धावांचं आव्हान ठेवलं आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय निर्णायक आहे.

PBKS vs DC : प्रियांश-श्रेयसची अर्धशतकी खेळी, दिल्लीसमोर 211 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
Shreyas Iyer Pbks vs DC IPL 2026
Image Credit source: IPL X Account
| Updated on: May 11, 2026 | 10:34 PM

पंजाब किंग्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) पुन्हा एकदा आपल्या लौकीकाला साजेशी धावसंख्या उभारली आहे. पंजाबने धर्मशालेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध 200 पार मजल मारली आहे. पंजाबने दिल्ली कॅपिट्ल्ससमोर 211 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पंजाबने ओपनर प्रियांश आर्या आणि कॅप्टन श्रेयस अय्यर या दोघांनी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 5 विकेट्स गमावून 210 धावा केल्या आहेत. पंजाबला गेल्या 3 सामन्यांत पराभूत व्हावं लागलंय. त्यामुळे पंजाबसमोर सलग चौथा पराभव टाळून प्लेऑफच्या दिशेने 1 पाऊल पुढे टाकायचं आव्हान आव्हान असणार आहे. तर दिल्लीला स्पर्धेतील आव्हान कायम राखायचं असेल तर कोणत्याही स्थिती हा सामना जिंकावा लागणार आहे. त्यामुळे आता दोघांपैकी कोणता संघ 2 गुणांची कमाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दिल्लीची बॅटिंग

दिल्ली कॅपिट्ल्सने टॉस जिंकून कॅप्टन अक्षर पटेल याने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. पंजाबच्या सलामी जोडीने दमदार सुरुवात केली. प्रभसिमरन सिंह आणि प्रियांश आर्या या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. दोघांनी पावरप्लेचा पूर्ण फायदा घेत फटकेबाजी केली. दोघांनी 78 रन्सची पार्टनरशीप केली. मात्र प्रभसिमरन सिंह आऊट झाल्याने ही जोडी फुटली. प्रभसिमरन सिंह याने 18 धावांचं योगदान दिलं. प्रभनंतर काही षटकांनी प्रियांश आर्याही आऊट झाला. प्रियांशला आणखी मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र प्रियांशला तसं करता आलं नाही.

प्रियांशने 33 बॉलमध्ये 169.70 च्या स्ट्राईक रेटने 56 रन्स केल्या. प्रियांशने या दरम्यान 6 सिक्स आणि 2 फोर लगावले. कूपर कोनोली याला अर्धशतक करण्याची संधी होती. मात्र कूपरची संधी हुकली. कूपरने 27 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 3 फोरसह नॉट आऊट 38 रन्स केल्या. मार्कस स्टोयनिस आणि शशांक सिंह या दोघांनी निराशा केली. स्टोयनिसने 1 धाव केली. तर शशांक सिंह याला भोपळाही फोडता आला नाही.

लाईव्ह स्कोअरकार्ड

मुंबईकर जोडीची फटकेबाजी

अखेरच्या क्षणी कॅप्टन श्रेयस अय्यर आणि सूर्यांश शेडगे या मुंबईकर जोडीने पंजाबसाठी 10 बॉलमध्ये 23 रन्सची नॉट आऊट पार्टनरशीप केली. सूर्यांशने 8 बॉलमध्ये 262.50 च्या स्ट्राईक रेटने नॉट आऊट 21 रन्स केल्या. सूर्यांशने या दरम्यान 2 सिक्स आणि 2 फोर गावले. तर श्रेयसने पंजाबसाठी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. श्रेयसने 36 बॉलमध्ये नॉट आऊट 59 रन्स केल्या. श्रेयसने या दरम्यान 3 सिक्स आणि 5 फोर लगावले. दिल्लीसाठी मिचेल स्टार्क आणि माधव तिवारी या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर मुकेश कुमार याने 1 विकेट मिळवली.

Follow Us