AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajay Devgn: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्यावर महापालिकेची नोटीस; नेमकं काय घडलं?

Ajay Devgn: आता अजय देवगणच्या कुटुंबाकडून चार आठवड्यांच्या मुदतीत कोणती कागदपत्रे सादर केली जातात आणि त्यानंतर महापालिकेकडून काय निर्णय घेतला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Ajay Devgn: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्यावर महापालिकेची नोटीस; नेमकं काय घडलं?
अजय देवगणचा जुहूमधला बंगलाImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 24, 2026 | 9:10 AM
Share

Ajay Devgn: अभिनेता अजय देवगणच्या मुंबईतील जुहू परिसरातील बंगल्याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. त्याच्या बंगल्यात प्रस्तावित असलेल्या सलून आणि स्पाच्या कामावर मुंबई महापालिकेनं ‘स्टॉप वर्क’ (काम थांबवा) नोटीस बजावली आहे. संबंधित जागेच्या व्यावसायिक वापरासाठी आवश्यक परवानगी नसल्याचं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे अजय देवगणच्या बंगल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजय देवगणचा बंगला जुहू इथल्या कापोले को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये आहे. या बंगल्यात सलून आणि स्पासाठी काही काम सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सोसायटीकडून तक्रार करण्यात आली. त्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची पाहणी करत संबंधित मालमत्ताधारकांकडून आवश्यक कागदपत्रे आणि परवानग्या मागवल्या.

व्यावसायिक वापरासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे किंवा परवानग्या सादर करण्यात आल्या नसल्याचं अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं. त्यामुळे महापालिकेच्या के- पश्चिम विभागाने संबंधित बांधकाम किंवा काम तातडीने थांबवण्याचे निर्देश देणारी नोटीस बजावली आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी जागेच्या वापराचा मुद्दा आहे. संबंधित बंगल्याच्या जागेचा सलून आणि स्पासाठी व्यावसायिक वापर करण्यास महापालिकेची परवानगी नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आवश्यक मंजुरी मिळेपर्यंत प्रस्तावित काम पुढे सुरू ठेवता येणार नाही.

महापालिकेच्या नियमांनुसार एखाद्या निवासी मालमत्तेचा व्यावसायिक कारणांसाठी वापर करायचा असल्यास त्यासाठी संबंधित परवानग्या आणि मंजुरी आवश्यक असतात. त्यामुळे या प्रकरणात कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आल्यानंतरही ती उपलब्ध न झाल्याने महापालिकेने पुढील कारवाई केली. अजय देवगणच्या कुटुंबाने या प्रकरणी आपली बाजू मांडण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ मागितल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता संबंधित कागदपत्रे आणि परवानग्या महापालिकेसमोर सादर केल्या जातात का, याकडे लक्ष लागलं आहे.

जुहू हा मुंबईतील बॉलिवूड सेलिब्रिटींच्या आलिशान घरांसाठी प्रसिद्ध परिसर आहे. कापोले को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्येही अनेक प्रसिद्ध व्यक्तींची घरं आहेत. त्यामुळे अजय देवगण यांच्या बंगल्याशी संबंधित महापालिकेच्या कारवाईची बातमी समोर आल्यानंतर या प्रकरणाकडे विशेष लक्ष वेधलं गेलं आहे.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी