IPL 2026 Points Table : डबल हेडरच्या थरारानंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबईची वाईट स्थिती

IPL 2026 Points Table : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. मुंबईचा हा 19 व्या मोसमातील सलग आणि एकूण तिसरा पराभव ठरला. या पराभवानंतर पॉइंट्स टेबलमध्ये कोणता संघ कोणत्या स्थानी आहे? जाणून घ्या.

IPL 2026 Points Table : डबल हेडरच्या थरारानंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबईची वाईट स्थिती
MI vs RCB IPL 2026 Points Table
Image Credit source: Bcci
| Updated on: Apr 13, 2026 | 4:02 AM

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने रविवारी 12 एप्रिलला मुंबई इंडियन्सला एकतर्फी फरकाने पराभूत केलं. त्याआधी गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंट्सचा धुव्वा उडवला. या डबल हेडरनंतर पॉइंट्स टेबलमध्ये कोण कोणत्या स्थानी आहे हे आपण जाणून घेऊयात. गुजरातने लखनौवर 7 विकेट्सने विजय मिळवला. तर मोसमातील 20 व्या (IPL 2026) आणि डबर हेडरमधील दुसऱ्या सामन्यात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्सवर 18 धावांनी विजय मिळवला. आरसीबीने मुंबईसमोर 241 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र मुंबईला आरसीबीच्या गोलंदाजांसमोर 5 विकेट्स गमावून 222 धावाच करता आल्या.

आरसीबीने मुंबईला पराभूत करुन 19 व्या मोसमातील तिसरा विजय साकारला. तर मुंबईचा हा तिसरा पराभव ठरला. या सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये बदल झाला आहे. पॉइंट्स टेबलमध्ये कोणता संघ कितव्या स्थानी आहे? हे जाणून घेऊयात. राजस्थान रॉयल्स मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्यानंतरही पहिल्या स्थानी कायम आहे. राजस्थान रॉयल्स टीम या 19 व्या मोसमात एकही सामना गमावलेला नाही.

मुंबईला पराभूत केल्यानंतर आरसीबीच्या खात्यात 2 गुणांनी वाढ झाली. आरसीबीने या मोसमात 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत. आरसीबी 6 गुणांसह तिसऱ्या स्थानी कायम आहे. तर मुंबई एका विजयासह आणि 2 गुणांसोबत आठव्या क्रमांकावर आहे. तर राजस्थान रॉयल्स 8 गुणांसह पहिल्या स्थानी विराजमान आहे.

श्रेयस अय्यरची पंजाब किंग्स दुसऱ्या स्थानी

पंजाब किंग्स 7 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाब किंग्सचा कोलकाता नाईट रायडर्स विरूद्धच्या सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे पंजाबला एका गुणावर समाधान मानावं लागलं. पंजाब या मोसमात राजस्थान रॉयल्सप्रमाणे अजिंक्य आहे. दिल्ली कॅपिट्ल्स आणि गुजरात टायटन्स अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहेत. गुजरातच्या तुलनेत नेट रनरेट चांगला असल्याने दिल्ली पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी आहे.

पॉइंट्स टेबलमध्ये राजस्थानच ‘रॉयल्स’

केकेआरची पहिल्या विजयाची प्रतिक्षा कायम

सहाव्या स्थानी असलेल्या लखनौ सुपर जायंट्सच्या खात्यातही दिल्ली आणि गुजरातप्रमाणे 4 गुण आहेत. सनरायजर्स हैदराबाद एका विजयासह सातव्या स्थानी आहेत. मुंबई आणि चेन्नईच्या खात्यात प्रत्येकी 2-2 गुण आहेत. मुंबई आठव्या आणि चेन्नई नवव्या स्थानी आहे. तर केकेआरला अद्याप विजयाचं खातं उघडण्यात यश मिळालेलं नाहीय. केकेआर एक गुणासह सर्वात शेवटी अर्थात दहाव्या क्रमांकावर विराजमान आहे.

Follow Us