AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 Points Table : हैदराबादला दुसऱ्या विजयासह मोठा फायदा, थेट 3 संघांना पछाडलं, नंबर 1 कोण?

IPL 2026 Points Table : सनरायजर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवत पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उडी घेतली आहे. हैदराबादने संघांना झटका दिला आहे.

IPL 2026 Points Table : हैदराबादला दुसऱ्या विजयासह मोठा फायदा, थेट 3 संघांना पछाडलं, नंबर 1 कोण?
Praful Hinge SRH vs RR IPL 2026Image Credit source: Bcci
| Updated on: Apr 14, 2026 | 3:30 AM
Share

सनरायजर्स हैदराबादने सोमवारी 13 एप्रिलला आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 21 व्या सामन्यात राजस्थानला रॉयल्सवर 57 धावांनी विजय मिळवला. सनरायजर्स हैदराबादने कॅप्टन इशान किशन याच्या 91 रन्सच्या जोरावर राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये राजस्थानसमोर 217 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र हैदराबादच्या गोलंदाजांनी राजस्थानला 6 बॉलआधीच ऑलआऊट केलं.  हैदराबादने राजस्थानला 19 ओव्हरमध्ये 159 रन्सवर गुंडाळलं. हैदराबादचा आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील हा एकूण दुसरा विजय ठरला. हैदराबादने यासह राजस्थानचा विजयरथ रोखला. हैदराबादला या विजयामुळे पॉइंट्स टेबलमध्ये मोठा फायदा झाला आहे. हैदराबाद-राजस्थान या सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये कोणता संघ कितव्या स्थानी विराजमान आहे हे आपण जाणून घेऊयात.

टॉप 5 मध्ये बदल, नंबर 1 कोण?

हैदराबादच्या विजयामुळे पॉइंट्स टेबलमधील टॉप 5 मध्ये बदल झाला आहे. हैदराबादने विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये टॉप 5 मध्ये धडक दिली आहे. तसेच हैदराबादला नेट रनरेटमध्येही फायदा झाला आहे. तर राजस्थान रॉयल्स पहिल्या पराभवांनतरही पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी कायम आहे.

हैदराबादला 3 स्थानांचा फायदा

राजस्थानला पराभूत केल्याने हैदराबादला जबरदस्त फायदा झालाय. हैदराबादने सातव्या स्थानावरुन 3 अंकांची झेप घेत चौथ्या क्रमांक पटकावला आहे. हैदराबादच्या खात्यात 4 गुण आहेत. हैदराबादच्या विजयानंतर नेट रनरेटमध्ये कमालीचा सुधार झाला आहे.  हैदराबादचा नेट रनरेट हा राजस्थान विरुद्धच्या विजयानंतर +0.576 असा झाला आहे. या सामन्याआधी हैदराबादचा नेट रनरेट हा -0.024 असा होता.

इतर संघांची स्थिती काय?

पंजाब किंग्स 7 गुणांसह दुसऱ्या स्थानी कायम आहे. गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या खात्यात 6 गुण आहेत. आरसीबी तिसऱ्या क्रमांकावर आहे. हैदराबाद चौथ्या तर दिल्ली कॅपिट्ल्स पाचव्या स्थानी आहे. दिल्लीच्या नावावर 4 गुण आहेत.

दिल्लीप्रमाणे गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्सच्या खात्यातही प्रत्येकी 4-4 गुण आहेत. मात्र गुजरात आणि लखनौचा नेट रनरेट कमी आहे. त्यामुळे गुजरात आणि लखनौ अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहेत. मुंबई एका विजयासह आठव्या तर चेन्नई सुपर किंग्स 2 गुणांसह नवव्या स्थानी आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स सर्वात शेवटी म्हणजे 10 व्या क्रमांकावर आहे. कोलकाता या मोसमात आतापर्यंत एकही सामना न जिंकणारी एकमेव टीम आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...