IPL 2026 Points Table : दिल्लीच्या विजयामुळे पॉइंट्स टेबलमध्ये ट्विस्ट, पंजाब प्लेऑफमधून आऊट होणार?
IPL 2026 Points Table PBKS vs DC : दिल्ली कॅपिट्ल्सने राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवला आहे. या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये कोण कुठे आहे? जाणून घ्या.

दिल्ली कॅपिट्ल्सने अक्षर पटेल याच्या नेतृत्वात सोमवारी 11 मे रोजी आयपीएल 2026 मधील (IPL 2026) पाचवा सामना जिंकला. पंजाबने दिल्लीसमोर 211 धावांचं आव्हान ठेवलं होतं. दिल्लीने विजयी आव्हान हे 19 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून पूर्ण केलं. दिल्लीचा हा पाचवा विजय ठरला. तर पंजाबचा सलग चौथा पराभव ठरला. दिल्लीने या विजयासह प्लेऑफमधील जर तरचं आव्हान कायम राखलं आहे. दिल्लीला या विजयामुळे पॉइंट्स टेबलमध्ये फायदा झाला आहे. तर या पराभवाने प्लेऑफच्या हिशोबाने पंजाबच्या अडचणीत वाढ झाली आहे. पंजाब या पराभवामुळे डेंजर झोनमध्ये गेली आहे. पंजाब विरुद्ध दिल्ली सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये कोणता संघ कोणत्या ठिकाणी आहे हे जाणून घेऊयात.
पंजाबने या मोसमात श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात जबरदस्त सुरुवात केली. पंजाब 7 सामन्यानंतर आयपीएल स्पर्धेत अजिंक्य राहणारी एकमेव ठरली होती. पंजाबने 7 पैकी 6 सामने जिंकले. तर पंजाबचा 1 सामना हा पावसाने वाया घालवला. त्यामुळे पंजाबच्या खात्यात 7 सामन्यानंतर 13 गुण होते. त्यामुळे पंजाब सहज प्लेऑफसाठी आवश्यक 2 सामने जिंकेल, असं चित्र होतं. मात्र झालं उलटंच. पंजाबला सलग 4 सामन्यांत पराभूत व्हावं लागलंय. त्यामुळे आता पंजाबच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे पंजाबला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी कोणत्याही स्थितीत उर्वरित 3 पैकी 2 सामने जिंकावे लागणार आहेत. अशात पंजाबचा चांगलाच कस लागणार आहे.
पंजाबची पॉइंट्स टेबलमधील स्थिती
पंजाब पॉइंट्स टेबलमध्ये पराभवानंतरही चौथ्या स्थानी कायम आहे. मात्र पंजाबला नेट रनरेटमध्ये फटका बसला आहे. पंजाबचा नेट रनरेट हा सामन्याआधी +0.571 असा होता जो पराभवानंतर +0.428 असा झाला आहे. दिल्ली विरूद्धच्या विजयानंतर पंजाबची प्लेऑफमध्ये पोहचण्याची शक्यता ही 90 टक्क्यांपेक्षा जास्त असती. मात्र पंजाबची ती शक्यता पराभवानंतर 60 टक्के इतकी झाली आहे. त्यामुळे पंजाबला इथून 1 चूकही महागात पडू शकते.
दिल्लीची सातव्या स्थानी झेप
तर दिल्लीने पंजाब विरूद्धच्या विजयासह आपलं आव्हान कायम ठेवलंय. तसेच दिल्लीला पॉइंट्स टेबलमध्ये फायदा झाला आहे. दिल्लीने पॉइंट्स टेबलमध्ये आठव्या स्थानावरुन सातव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. दिल्लीचा नेट रनरेट हा सामन्याआधी -1.154 असा होता जो सामन्यानंतर -0.993 असा झालाय.
पॉइंट्स टेबलमध्ये कोण कुठे?
मंगळवारी कुणाचा सामना?
दरम्यान मंगळवारी 12 मे रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात लढत होणार आहे. दोन्ही संघांची या मोसमात सारखीच कामगिरी राहिली आहे. दोन्ही संघांनी 11 पैकी 7 सामने जिंकले आहेत. त्यामुळे या सामन्यातील विजेता संघ प्लेऑफचं तिकीट जवळपास निश्चित करेल. तसेच विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी पोहचेल. त्यामुळे गुजरात आणि हैदराबादसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा असणार आहे.