AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PBKS vs DC : दिल्लीकडून अचूक हिशोब, 3 विकेट्सने विजय, पंचाबचा सलग चौथा पराभव

Punjab Kings vs Delhi Capitals Match Result, IPL 2026 : दिल्ली आणि पंजाब दोन्ही संघांची एकमेकांसमोरची ही दुसरी लढत होती. पंजाबने गेल्या सामन्यात दिल्लीवर मात केली होती. मात्र आता दिल्लीने विजय मिळवून गेल्या पराभवाचा हिशोब केला आहे.

PBKS vs DC : दिल्लीकडून अचूक हिशोब, 3 विकेट्सने विजय, पंचाबचा सलग चौथा पराभव
Axar Patel PBKS vs DC IPL 2026 Image Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 12, 2026 | 7:28 AM
Share

दिल्ली कॅपिट्ल्सने सांघिक कामगिरीच्या जोरावर आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 55 व्या सामन्यात सुरक्षित असा विजय मिळवत 2 गुणांची कमाई केली आहे. पंजाबने ओपनर प्रियांश आर्या आणि कॅप्टन श्रेयस अय्यर या दोघांनी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्लीसमोर 211 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. दिल्लीने हे आव्हान सहज आणि सुरक्षित अंतराने पूर्ण केलं. दिल्लीने 6 बॉल राखून आणि 7 विकेट्स गमावून विजय मिळवला. दिल्लीने 19 ओव्हरमध्ये 3 विकेट्सआधी 216 धावा केल्या. दिल्लीने यासह पाजवा विजय मिळवला. दिल्ली 10 गुण मिळवणारी सातवी टीम ठरली. तर पंजाबचा हा एकूण आणि सलग चौथा पराभव ठरला.

दिल्लीची निराशाजनक सुरुवात

दिल्ली 200 पेक्षा अधिक धावांचं आव्हान असताना झालेली सुरुवात पाहून जिंकेल असं क्रिकेट चाहत्यांना वाटलं नसावं. दिल्लीच्या टॉप ऑर्डरने निराशा केली. मात्र मिडल ऑर्डरने सर्व भार आपल्या खांद्यावर घेत दिल्लीच्या विजयाचा पाया रचला. ओपनर केएल राहुल याने 9 तर अभिषेक पोरेल याने 5 धावा केल्या. साहील पारख याने 13 तर ट्रिस्टन स्टब्स याने 12 धावांचं योगदान दिलं. त्यामुळे 8.2 ओव्हरमध्ये दिल्लीची 4 आऊट 74 अशी स्थिती झाली.

मिलर-पटेलची निर्णायक भागीदारी

त्यानंतर कॅप्टन अक्षर पटेल आणि डेव्हिड मिलर या जोडीने निर्णायक भागीदारी करुन दिल्लीच्या डावाला स्थिरता दिली. पटेल आणि मिलर या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 34 बॉलमध्ये 64 रन्सची पार्टनरशीप केली. दोघांनी या दरम्यान वैयक्तिक अर्धशतक झळकावलं. त्यामुळे दिल्ली चांगल्या स्थितीत पोहचली. मात्र दोघेही अर्धशतकानंतर झटपट आऊट झाले.

अक्षरने दिल्लीसाठी सर्वाधिक धावा केल्या. अक्षरने 30 बॉलमध्ये 56 रन्स केल्या. तर मिलरने 28 चेंडूत 51 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर आशुतोष शर्मा याने 10 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 2 फोरसह निर्णायक 24 धावा जोडल्या. तर माधव तिवारी आणि आकिब नबी डार या जोडीने नाबाद राहून दिल्लीला विजयापर्यंत पोहचवलं. माधवने 8 बॉल 18 रन्स केल्या. तर आकीबने 2 बॉलमध्ये 10 धावा करत दिल्लीला सुरक्षितपणे विजयी करण्यात योगदान दिलं.

पंजाबकडून अर्शदीप सिंह आणि यश ठाकुर या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर बेन ड्वारशुईस आणि मार्कस स्टोयनिस या दोघांनी दिल्लीच्या प्रत्येकी 1-1 फलंदाजाला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

पंजाबची बॅटिंग

त्याआधी दिल्ली कॅप्टन अक्षर पटेल याने टॉस जिंकून पंजाबला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पंजाबने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 210 धावा केल्या. पंजाबसाठी कॅप्टन श्रेयस अय्यर याने सर्वाधिक 59 रन्स केल्या. तर ओपनर प्रियांश आर्या याने 56 धावा जोडल्या. कूपर कोनोली याने 38 धावांचं योगदान दिलं. प्रभसिमरन सिंह याने 18 धावा केल्या. तर अखेरच्या श्रणी सूर्यांश शेडगे याने निर्णायक आणि नाबाद 21 धावांची खेळी केली. तर दिल्लीसाठी मिचेल स्टार्क आणि माधव तिवारी या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर मुकेश कुमार याने 1 विकेट मिळवली.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी