IPL 2026, RCB vs DC : आरसीबी की दिल्ली कॅपिटल्स! कोण मारणार बाजी? वाचा आकडेवारी

आयपीएल स्पर्धेतील 26 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होत आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. चला जाणून घेऊयात हेड टू हेड आकडेवारी..

IPL 2026, RCB vs DC : आरसीबी की दिल्ली कॅपिटल्स! कोण मारणार बाजी? वाचा आकडेवारी
IPL 2026, RCB vs DC : आरसीबी की दिल्ली कॅपिटल्स! कोण मारणार बाजी? वाचा आकडेवारी
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 17, 2026 | 7:08 PM

आयपीएल स्पर्धेच्या 26व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना 18 एप्रिलला दुपारी 3.30 वाजता बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार आहे. आयपीएल 2026 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची विजयी घोडदौड सुरू आहे. आतापर्यंत खेळलेल्या पाच पैकी चार सामन्यात विजय मिळवला आहे. तर एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. गुणतकालिकेत आरसीबीचा संघ 8 गुण आणि +1.503 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्स संघाची विजयी गाडी रूळावरून घसरली आहे. लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळवून विजयी सुरूवात केली. पण त्यानंतर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्सकडून पराभवाला सामोरं जावं लागलं. सध्या गुणतालिकेत 4 गुण आणि +0.322 नेट रनरेटसह पाचव्या स्थानावर घसरले आहेत. दिल्ली कॅपिटल्सला गुण आणि नेट रनरेटमध्ये सुधारणा करण्याची संधी आहे.

आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स हेड टू हेड

आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स या दोघांसाठी हा सामना खूपच महत्त्वाचा आहे. पहिलं स्थान गाठण्यासाठी आरसीबीला हा सामना जिंकणं भाग आहे. तर दिल्ली कॅपिटल्सला विजयी ट्रॅक मिळवण्यासाठी विजय महत्त्वाचा आहे. आतापर्यंत दोन्ही संघ 33 वेळा आमनेसामने आले आहेत. या आकडेवारीत आरसीबीचा वरचष्मा दिसत आहे. आरसीबीने 20 सामन्यात, तर दिल्ली कॅपिटल्सने 12 सामन्यात विजय मिळवला आहे. तर सामना निकालाविना सुटला आहे. आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 215 ही सर्वोच्च धावसंख्या, तर 135 ही सर्वात कमी धावसंख्या नोंदवली आहे. तर दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीविरुद्ध 196 ही सर्वोच्च आणि 95 ही कमी धावसंख्या नोंदवली आहे.

आयपीएल 2025 स्पर्धेत या संघात दोन सामने झाले होते. पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने विजय मिळवला होता. दिल्लीने आरसीबीला 6 गडी राखून पराभूत केलं. तर दुसर्‍या सामन्यात आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सला 6 गडी राखून मात दिली. आता या स्पर्धेतही या दोन संघात दोन सामने होणार आहे. या स्पर्धेतील दुसरा सामना 27 एप्रिलला होणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे.

Follow Us