RR vs CSK : वैभवची वादळी खेळी, राजस्थानची विजयी सलामी, चेन्नईचा 8 विकेट्सने धुव्वा

Rajasthan Royals vs Chennai Super King Match Result : आयपीएलच्या 19 व्या मोसमात सलग तिसऱ्या सामन्यातही होम टीमने सामना जिंकला आहे. राजस्थानने सीएसकेवर मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे.

RR vs CSK : वैभवची वादळी खेळी, राजस्थानची विजयी सलामी, चेन्नईचा 8 विकेट्सने धुव्वा
Yashasvi Jaiswal and Riyan Parag RR vs CSK
Image Credit source: Social Media
| Updated on: Mar 31, 2026 | 5:16 AM

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, मुंबई इंडियन्सनंतर आता राजस्थान रॉयल्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या हंगामात (IPL 2026) विजयी सुरुवात केली आहे. राजस्थानने 19 व्या मोसमातील तिसऱ्या सामन्यात घरच्या मैदानात गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सचा 8 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. चेन्नईने राजस्थानसमोर 128 धावांचं आव्हान ठेवलं होतं. वैभव सूर्यवंशी याच्या फायर खेळीच्या जोरावर राजस्थानने हा सामना एकतर्फी फरकाने आपल्या नावावर केला.

राजस्थानने 128 धावांचं आव्हान हे 2 विकेट्स गमावून 47 बॉलआधी पूर्ण केलं. राजस्थानने 12.1 ओव्हरमध्ये 8 विकेट्स राखून हे आव्हान पूर्ण केलं. वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल या दोघांनी विजयात प्रमुख भूमिका बजावली. त्यानंतर ध्रुव जुरेल आणि कॅप्टन रियान पराग या जोडीने राजस्थानला विजयापर्यंत पोहचवलं.

सामन्यात काय झालं?

राजस्थानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागल्यानंतर कर्णधार रियान पराग याने चेन्नईला बॅटिंगसाठी बोलावण्याचा निर्णय केला. हा निर्णय योग्य ठरला. राजस्थानने चेन्नईला 19.4 ओव्हरमध्ये 127 रन्सवर ऑलआऊट केलं. सीएसकेसाठी जेमी ओव्हरटन याने सर्वाधिक 43 धावा केल्या. जेमीच्या या खेळीमुळे सीएसकेला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. तर राजस्थानसाठी रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर आणि नांद्रे बर्गर या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या.

राजस्थानची बॅटिंग

राजस्थानसाठी वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल या दोघांनी 6.2 ओव्हरमध्ये 75 रन्सची ओपनिंग पार्टनरशीप केली. या दरम्यान वैभवने अवघ्या 15 चेंडूत अर्धशतक झळकावलं. मात्र वैभव 52 धावा करुन आऊट झाला. ध्रुव जुरेल याने 18 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि कॅप्टन रियान पराग या दोघांनी राजस्थानाला विजयापर्यंत पोहचवलं. यशस्वीने 36 बॉलमध्ये नॉट आऊट 38 रन्स केल्या. तर रियानने नाबाद 14 धावा केल्या. चेन्नईसाठी अंशुल कंबोज याने दोन्ही विकेट्स घेतल्या.

राजस्थानकडून पंजाबच्या विक्रमाची बरोबरी

दरम्यान राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्स विरूद्धच्या या विजयासह खास कामगिरी करुन दाखवली आहे. राजस्थान चेन्नई विरुद्ध सर्वाधिक सामने जिंकणारी संयुक्तरित्या दुसरी टीम ठरली आहे. राजस्थानचा चेन्नई विरुद्धचा हा स्पर्धेच्या इतिहासातील 16 वा विजय ठरला. राजस्थानने यासह पंजाब किंग्सच्या विक्रमाची बरोबरी केली. तसेच चेन्नई विरुद्ध स्पर्धेत मुंबई इंडियन्सने सर्वाधिक सामने जिंकले आहेत. मुंबईने चेन्नईला 21 सामन्यांमध्ये पराभूत केलं आहे.

Follow Us