RR vs SRH : वैभवचं शतक-ध्रुवचं अर्धशतक, हैदराबादसमोर 229 धावांचं आव्हान, राजस्थान रोखणार?
Rajasthan Royals vs Sunrisers Hyderabad 1st Inning Highlight : वैभव सूर्यवंशी आणि ध्रवु जुरेल या जोडीने हैदराबादच्या गोलंदाजांची धुलाई करत राजस्थानला 220 पार पोहचवण्यात सर्वाधिक योगदान दिलं. वैभवने शतक तर ध्रुवने अर्धशतकी खेळी केली.

ओपनर वैभव सूर्यवंशी याचं शतक आणि ध्रुव जुरेल याने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2026 स्पर्धेच्या (IPL 2026) 36 व्या सामन्यात जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये सनरायजर्स हैदराबादसमोर 229 धावांचं आव्हान ठेवलं आहे. राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 228 धावा केल्या. राजस्थानसाठी वैभव सूर्यवंशी आणि आणि ध्रुव जुरेल या दोघांव्यतिरिक्त डोनोवन फरेरा याने सर्वाधिक धावा केल्या. तर हैदराबादसाठी एशान मलिंगा याने सर्वाधिक 2 विकेट्स मिळवल्या. हैदराबाद आणि राजस्थान दोन्ही संघांचा हा 19 व्या मोसमातील आठवा सामना आहे. हैदराबादने सलग 3 सामने जिंकले आहेत. त्यामुळे राजस्थान हैदराबादला विजयी चौकार लगावण्यापासून रोखणार का? यासाठी निकालाची वाट पाहावी लागणार आहे.
राजस्थान-हैदराबाद सामन्याआधी डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात पंजाबने दिल्ली विरुद्ध स्पर्धेच्या इतिहासातील विक्रमी 265 धावांचा पाठलाग केला. हैदराबादच्या गोटात ट्रेव्हीस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन आणि हेन्रिक क्लासेन असे तगडे आणि विस्फोटक फलंदाज आहेत. त्यामुळे हैदराबादला विजयी व्हायचं असेल तर प्रत्येक ओव्हरमध्ये 11.45 च्या रनरेट धावा कराव्या लागणार आहेत. त्यामुळे हैदराबाद 229 धावा करुन सलग चौथा आणि एकूण पाचवा विजय मिळवणार की राजस्थान एकूण 10 गुण मिळवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राजस्थानची बॅटिंग
हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स याने टॉस जिंकून राजस्थान बॅटिंगसाठी भाग पाडलं. वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल या सलामी जोडीने 40 धावा जोडल्या. यशस्वी 10 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यानंतर यशस्वी आणि ध्रुव या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी फक्त 62 बॉलमध्ये 112 रन्सची पार्टनरशीप केली.ध्रुवने 35 बॉलमध्ये 51 रन्स केल्या.
लाईव्ह स्कोअरकार्ड
वैभव सूर्यवंशीचा शतकी झंझावात
ध्रुवनंतर वैभव सूर्यवंशीही आऊट झाला. वैभवने आयपीएल कारकीर्दीतील दुसरं आणि या मोसमातील पहिलं अर्धशतक झळकावलं. वैभवने 37 चेंडूत 12 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 103 धावा केल्या. डोवोवन फरेरा याने 33 तर शिमरोन हेटमायर याने 11 धावा जोडल्या. कॅप्टन रियान पराग याने 7 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. तर रवींद्र जडेजा 4 धावांवर नाबाद परतला. हैदराबादासाठी एशान मलिंगा याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर प्रुफल हिंगे, पॅट कमिन्स, साकिब हुसैन आणि नितीश कुमार रेड्डी या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.