AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RR vs SRH : वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड, 15 वर्षीय फलंदाजाची ऐतिहासिक कामगिरी

Vaibhav Sooryavanshi World Record : राजस्थान रॉयल्सचा 15 वर्षीय युवा सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशी याने सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मोठा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला आहे. जाणून घ्या.

RR vs SRH : वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड, 15 वर्षीय फलंदाजाची ऐतिहासिक कामगिरी
Vaibhav Sooryavanshi World RecordImage Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 25, 2026 | 9:32 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) शनिवारी 25 एप्रिलला डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिट्ल्सचा धुव्वा उडवत एकूण सहावा विजय मिळवला. पंजाबने दिल्ली विरुद्ध विक्रमी 265 धावांचा यशस्वी पाठलाग करत विजय मिळवला. त्यानंतर या डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या 15 वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी याने इतिहास घडवला आहे. युवा फलंदाज वैभवने या मोसमात आपला झंझावात कायम ठेवत हैदराबाद विरुद्धही तडाखेदार बॅटिंग केली आहे. वैभवने राजस्थानमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये अवघ्या 15 चेंडूत अर्धशतक झळकावलं. वैभवचं हे या 19 व्या मोसमातील 15 चेंडूत केलेलं एकूण तिसरं अर्धशतक ठरलं. वैभवने या अर्धशतकी खेळी दरम्यान प्रुफल हिंगे याला सलग 4 षटकार लगावले. तसेच वैभवने हैदराबादचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स याचं पहिल्याच बॉलवर सिक्स ठोकून स्वागत केलं.

वैभव सूर्यवंशीकडून वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक

वैभवने 15 चेंडूत 7 षटकार आणि 1 चौकारासह 333.33 च्या स्ट्राईक रेटने हे अर्धशतक पूर्ण केलं. वैभवने यासह मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला. वैभव टी 20 क्रिकेटमध्ये चेंडूबाबत वेगवान 1 हजार धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. वैभवने यासह मिचेल ओवन याचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला. तसेच वैभव वेगवान 1 हजार टी 20 धावा करणारा सर्वात युवा फलंदाजही ठरला.

वैभवने मिचेल ओवन याचा टी 20 क्रिकेटमध्ये वेगवान 1 हजार धावा करण्याचा विश्व विक्रम मोडीत काढला. वैभवने मिचेलच्या तुलनेत 60 बॉलआधी 1 हजार धावा पूर्ण केल्या. वैभवने 473 चेंडूत 1 हजार टी 20 धावा केल्या. तर मिचेल ओवन याला 1 हजार धावांपर्यंत पोहचण्यासाठी 533 चेंडूंचा सामना करावा लागला होता.

वेगवान 1 हजार टी 20 धावा करणारे फलंदाज

वैभव सूर्यवंशी : 473 बॉल

मिचेल ओवन : 533 बॉल

अँड्रयू सायमंड्स : 558 बॉल

वैभवचा अर्धशतका तडाखा, वर्ल्ड रेकॉर्ड उद्धवस्त

वैभव सूर्यवंशी दुसराच भारतीय

तसेच वैभवने 26 व्या डावात 1 हजार टी 20 धावा पूर्ण केल्या. वैभव यासह डावांबाबत वेगवान 1 हजार टी 20 धावा पूर्ण करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला. तर भारताकडून डावांबाबत वेगवान 1 हजार धावा करण्याचा विक्रम हा देवदत पडीक्कल याच्या नावावर आहे. देवदत्तने 25 डावांत 1 हजार टी 20 धावा केल्या होत्या.

Follow Us
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल