IPL Auction 2026 Updates and Highlights : 7 तासांच्या थरारानंतर मिनी ऑक्शन पार, 77 खेळाडूंचा फैसला, कॅमरुन ग्रीन सर्वात महागडा, कुणाला किती रक्कम?

IPL Auction 2026 Updates and Highlights in Marathi : आयपीएल 2026 साठी तब्बल 7 तास मिनी ऑक्शनचा थरार रंगला. या मिनी ऑक्शनमधून 77 खेळाडूंचं नशिब फळफळलं. तर इतर खेळाडूंच्या पदरी निराशा आली. ऑस्ट्रेलियाचा कॅमरुन ग्रीन हा मिनी ऑक्शनच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला.

IPL Auction 2026 Updates and Highlights : 7 तासांच्या थरारानंतर मिनी ऑक्शन पार, 77 खेळाडूंचा फैसला, कॅमरुन ग्रीन सर्वात महागडा, कुणाला किती रक्कम?
IPL Mini Auction 2026 Live Updates
Image Credit source: Tv9
| Updated on: Dec 16, 2025 | 9:47 PM

आयपीएल 2026 मिनी ऑक्शनची सांगता झाली आहे. मिनी ऑक्शनला दुपारी अडीच वाजता सुरुवात झाली. तर रात्री 9 वाजून 10 वाजता मिनी ऑक्शन आटोपलं आहे. एकूण 10 फ्रँचायजींनी या मिनी ऑक्शनमधून आपल्या गरजेनुसार खेळाडू घेतले आहेत. एकूण 369 खेळाडूंमधून 77 खेळाडू सोल्ड ठरले आहेत. या 10 फ्रँचायजींनी 215 कोटी 45 लाख रुपये खर्च केले आहेत. या 77 खेळाडूंमध्ये 29 विदेशी क्रिकेटपटू आहेत. कॅमरुन ग्रीन हा सर्वात महागडा विदेशी खेळाडू ठरला. कॅमरुनला 25 कोटी 20 लाख इतका भाव मिळाला. मथिशा पथिराणा हा या मिनी ऑक्शनमधील एकूण दुसरा तर श्रीलंकेचा सर्वात महागडा खेळाडू ठरला. मथिशाला 18 कोटींचा भाव मिळाला. कॅमरुन आणि मथिशा केकेआरकडून खेळणार आहेत. तसेच कार्तिक शर्मा आणि प्रशांत वीर हे अनकॅप्ड खेळाडू चमकले. या दोघांना प्रत्येकी 14कोटी 20 लाख इतका विक्रमी भाव मिळाला. दोघेही चेन्नईसाठी खेळणार आहेत. तर लियाम लिविंगस्टोन याला हैदराबादने 13 कोटी रुपयांमध्ये आपल्या गोटात घेतलं.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 16 Dec 2025 09:40 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : आयपीएल मिनी ऑक्शन पार, जाणून घ्या एकूण किती खेळाडू सोल्ड?

    आयपीएल 2026 साठी मिनी ऑक्शन पूर्ण झालं आहे. एकूण 10 फ्रँचायजांनी या मिनी ऑक्शनद्वारे 77 खेळाडूंना आपल्या गोटात घेतलं आहे. सर्व 10 संघांमध्ये प्रत्येकी 25 खेळाडू पूर्ण झाले आहेत. नियमांनुसार एका संघात किमान 18 तर कमाल 25 खेळाडूंची मर्यादा आहे.

    कॅमरुन ग्रीन हा या मिनी ऑक्शनमधील सर्वात महागडा खेळाडी ठरला. ग्रीनसाठी केकेआरने 25 कोटी 20 लाख रुपये मोजले. तसेच केकेआरने मथीशा पथीराणा याच्यासाठी 18 कोटी रुपये खर्च केले. मथीशा श्रीलंकेचा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. तर प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा या दोघांना प्रत्येकी 14 कोटी 20 लाख मिळाले. तर लियाम लिविंगस्टोन याला 13 कोटी रुपयात सोल्ड झाला.

  • 16 Dec 2025 09:18 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : कायले जेमीन्सन सोल्ड

    न्यूझीलंडचा अनुभवी खेळाडू कायले जेमीन्सन हा 19 व्या हंगामात दिल्ली कॅपिट्ल्सकडून खेळणार आहे. दिल्ली कॅपिट्ल्सने जेमीन्सन याच्यासाठी 2 कोटी मोजले. जेमीन्सन या ऑक्शनमधील शेवटचा खेळाडू ठरला. जेमीन्सन सोल्ड होताच या मिनी ऑक्शनची सांगता झाली.

  • 16 Dec 2025 09:16 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : विहान मल्होत्रा आणि कनिष्क चौहान सोल्ड

    विहान मल्होत्रा आणि कनिष्क चौहान हे दोघे सोल्ड झाले आहेत. या 2 भारतीय कॅप्ड खेळाडूंना प्रत्येकी 30 लाखांचा भाव मिळाला आहे. विहान आणि कनिष्क हे दोघेही आरसीबीचं प्रतिनिधित्व करणार आहेत.

  • 16 Dec 2025 09:14 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : लूक वूड याला 75 लाख

    लूक वूड याला 75 लाख रुपयांचा भाव मिळाला आहे. लूक वूड 19 व्या हंगामात गुजरात टायटन्सचं प्रतिनिधित्व करणार आहे.

  • 16 Dec 2025 09:13 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : विकी ओस्तवाल आणि पृथ्वीराज यारा सोल्ड

    विकी ओस्तवाल आणि पृथ्वीराज यारा हे भारतीय अनकॅप्ड खेळाडू सोल्ड झाले आहेत. या दोघांना प्रत्येकी 30 लाख रुपयांचा भाव मिळाला आहे. विकी आरसीबी तर पृथ्वीराज गुजरात टायटन्सकडून खेळणार आहे.

  • 16 Dec 2025 09:11 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : कुलदीप सेन याला 75 लाख

    कुलदीप सेन तिसऱ्या आणि अंतिम फेरीत सोल्ड ठरला आहे. कुलदीप सेन याच्यासाठी राजस्थान रॉयल्सने 75 लाख रुपये मोजले आहेत.

  • 16 Dec 2025 09:09 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : एडम मिल्ने याला कोटींचा भाव

    एडम मिल्ने याला कोटींचा भाव मिळाला आहे. एडम मिल्ने सोल्ड ठरल्याने तो 19 व्या हंगामात खेळताना दिसणार आहे.  एडमसाठी राजस्थान रॉयल्सने 2 कोटी 40 लाख रुपये मोजले.

  • 16 Dec 2025 09:07 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : टॉम बँटन कोट्यधीश, गुजरातकडून 2 कोटींचा भाव

    टॉम बँटन कोट्यधीश झाला आहे. टॉमला गुजरात टायटन्सकडू 2 कोटींचा भाव मिळाला आहे.

  • 16 Dec 2025 09:06 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : झॅक फाउल्क्स सोल्ड

    झॅक फाउल्क्स तिसऱ्या आणि शेवटच्या एक्सलरेटेड राउंडमध्ये सोल्ड ठरला आहे. झॅकला चेन्नई सुपर किंग्स टीमने घेतलं आहे. चेन्नईने झॅकसाठी 75 लाख रुपये मोजले आहेत.

  • 16 Dec 2025 09:03 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : श्रद्धा आणि सबुरी, पृथ्वी शॉ अखेर सोल्ड

    तिसऱ्या आणि अंतिम एक्सलरेटेड राउंडला सुरुवात झाली आहे.  पृथ्वी शॉ अखेर सोल्ड झाला आहे. पृथ्वीला दिल्ली कॅपिट्ल्सने 75 लाख या बेस प्राईजमध्ये आपल्या ताफ्यात घेतलं आहे. पृथ्वीचं यासह आयपीएलमध्ये कमबॅक झालं आहे.

  • 16 Dec 2025 08:49 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : दुसरा एक्सलरेटेड राउंड पूर्ण, 66 खेळाडूंची खरेदी

    आयपीएल 2026 च्या मिनी ऑक्शनमधील दुसरा एक्सलरेटेड राउंड पूर्ण झाला आहे. आतापर्यंत एकूण 10 संघांनी 66 खेळाडूंची खरेदी केली आहे. या 66 खेळाडूंसाठी आतापर्यंत 10 फ्रँचायजींनी  204.85 कोटी रुपये खर्च केले आहेत. तर केकेआर, एलएसजी, एमआय, एसआरएच आणि पीबीकेस या 5 संघांमध्ये 25 खेळाडू झाले आहेत. त्यामुळे या 5 संघांसाठी हे मिनी ऑक्शन संपलं आहे. तर आता उर्वरित 5 फ्रँचायजी पुढील राउंडमध्ये आपल्याला हवे असलेले खेळाडू घेता येणार आहेत.

  • 16 Dec 2025 08:45 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : जॅक एडवर्ड याला 3 कोटींचा भाव

    दुसऱ्या एक्सलरेटेड राउंडमध्ये जॅक एडवर्ड याला चांगला भाव मिळाला आहे. जॅक एडवर्ड याला 3 कोटींचा भाव मिळाला आहे. जॅक 19 व्या हंगामात सनरायजर्स हैदराबादकडून खेळणार आहे.

  • 16 Dec 2025 08:38 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : विशाल निषाद आणि ब्रिजेश शर्मा सोल्ड

    विशाल निषाद आणि ब्रिजेश शर्मा या दोन्ही अनकॅप्ड खेळाडूंना खरेदीदार मिळाला आहे. विशाल निषाद आणि ब्रिजेश शर्मा या दोघांना त्यांच्या बेस प्राईजची किंमत मिळाली आहे. विशाल पंजाब तर ब्रिजेश राजस्थानकडून खेळताना दिसणार आहे.

  • 16 Dec 2025 08:36 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : प्रवीण दुबे आणि साहिल पारेख सोल्ड

    प्रवीण दुबे आणि साहिल पारेख हे दोघे खेळाडू सोल्ड झाले आहेत. प्रवीणसाठी पंजाब किंग्सने 30 लाख मोजले. तर साहिल पारेख यालाही दिल्ली कॅपिटल्सकडून 30 लाखांचा भाव मिळाला.

  • 16 Dec 2025 08:33 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : अमन राव पेरला आणि मयंक रावत सोल्ड

    अमन राव पेरला आणि मयंक रावत या दोघांनाही बेस प्राईजमध्ये खरेदीदार मिळाले आहेत. अमन आणि मंयक या दोघांना प्रत्येकी 30 लाख रुपयांचा भाव मिळाला. अमन राजस्थान तर मंयक मुंबईकडून खेळणार आहे.

  • 16 Dec 2025 08:30 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : लुंगी एन्गिडी सोल्ड

    दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी अखेर सोल्ड झाला आहे. लुंगीला दिल्ली कॅपिट्ल्सने 2 कोटी रुपयात आपल्या ताफ्यात घेतलं आहे.

  • 16 Dec 2025 08:29 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : एडम मिल्ने अनसोल्ड

    एडम मिल्ने अनसोल्ड एक्सलरेटेड राउंडमध्ये अनसोल्ड ठरला आहे. एडमसाठी कोणत्याच संघाने रस दाखवला नाही.

  • 16 Dec 2025 08:29 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : जॉश इंग्लिसची चांदी, बेस प्राईजपेक्षा किती जास्त रक्कम

    जॉश इंग्लिस याची मिनी ऑक्शनमध्ये चांदी झाली आहे. जॉशची बेस प्राईज ही 2 कोटी इतकी होती. मात्र त्याला 8 कोटी 60 लाख इतका भाव मिळाला आहे. जोश आगामी हंगामात लखनौ सुपर जायंट्सकडून खेळताना दिसणार आहे.

  • 16 Dec 2025 08:26 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : जॉर्डन कॉक्स सोल्ड, 75 लाखात कोणत्या टीममध्ये

    जॉर्डन कॉक्स सोल्ड झाला आहे. जॉर्डन कॉक्स गतविजेत्या आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळताना दिसणार आहे. आरसीबीने जॉर्डननसाठी 75 लाख रुपये मोजले आहेत.

  • 16 Dec 2025 08:25 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : बेन ड्वारशुईस याला 4 कोटींपेक्षा जास्त भाव

    बेन ड्वारशुईस याला 4 कोटींपेक्षा जास्त भाव मिळाला आहे. बेन ड्वारशुईस याच्यासाठी पंजाब किंग्सने 4 कोटी 40 लाख रुपये मोजले आहेत.

  • 16 Dec 2025 08:18 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : राहुल चाहर याला मोठा भाव,

    टीम इंडियातून गेली अनेक वर्ष दूर असलेल्या फिरकीपटू राहुल चाहर याला मिनी ऑक्शनमध्ये बेस प्राईजपेक्षा कित्येक पट जास्त भाव मिळाला आहे. राहुलची बेस प्राईज ही 1 कोटी होती.  मात्र राहुलसाठी पंजाब आणि चेन्नईत चुरस पाहायला मिळाली. मात्र अखेरच्या क्षणी पंजाबने माघार घेतली. अशाप्रकारे चेन्नईने 5 कोटी 20 लाख रुपये मोजले आणि राहुल चाहर याला आपल्या गोटात घेतलं.

  • 16 Dec 2025 08:13 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : शिवम मावी दुसऱ्या फेरीत सोल्ड

    टीम इंडियाचा खेळाडू शिवम मावी दुसऱ्या फेरीत अखेर सोल्ड झाला आहे. शिवमला बेस प्राईजचा भाव मिळाला आहे. शिवमला 75 लाख या किंमतीत सनरायजर्स हैदराबादने घेतलं आहे.

  • 16 Dec 2025 08:12 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : मॅट हेन्री चेन्नईच्या गोटात

    मॅट हेन्री याला चेन्नई सुपर किंग्सने घेतलं आहे. सीएसकेने मॅटसाठी 2 कोटी या बेस प्राईजमध्ये घेतलं आहे.

  • 16 Dec 2025 08:11 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : आकाश दीप याला 1 कोटीचा भाव

    टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आकाश दीप याला 1 कोटींचा भाव मिळाला आहे. केकेआरने आकाशला त्याच्या बेस प्राईजमध्ये आपल्या ताफ्यात घेतलं आहे.

  • 16 Dec 2025 08:10 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : जेमी स्मिथ अनसोल्ड

    जेमी स्मिथ दुसऱ्या एक्सलरेटेड राउंडमध्ये अनसोल्ड ठरला आहे.  जेमी पहिल्या फेरीतही अनसोल्ड ठरला होता.

  • 16 Dec 2025 08:09 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : रचीन रवींद्र सोल्ड, केकेआरकडून 2 कोटींचा भाव

    पहिल्या फेरीत अनसोल्ड ठरलेला रचीन रवींद्र याला अखेर खरेदीदार मिळाला आहे. रचीन रवींद्र याला केकेआरने घेतलं आहे. रचीनसाठी केकेआरने 2 कोटी मोजले आहेत.

  • 16 Dec 2025 08:08 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : लियाम लिविंगस्टोनला तगडा भाव

    लियाम लिविंगस्टोन याला तगडा भाव मिळाला आहे. लियामला त्याच्या बेस प्राईजपेक्षा 11 कोटी जास्त मिळाले आहेत. सनरायजर्स हैदराबादने लियाम लिविंगस्टोन याला 13 कोटी रुपये मोजून आपल्या गोटात घेतलं आहे.

  • 16 Dec 2025 08:04 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : सर्फराज खान सोल्ड, पृथ्वी शॉ अनसोल्ड

    मुंबईकर सर्फराज खान सोल्ड ठरला आहे. सर्फराज खान याला चेन्नई सुपर किंग्सने 75 लाख या बेस प्राईजमध्ये आपल्या गोटात घेतलं आहे. तर पृथ्वी शॉ अनसोल्ड ठरला आहे.

  • 16 Dec 2025 08:02 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : जॅक फ्रेझर मॅकग्रर्क अनसोल्ड

    दुसऱ्या एक्सलरेटेड राउंडमधील पहिलाच खेळाडू अनसोल्ड ठरला आहे. जॅक फ्रेझर मॅकग्रर्क अनसोल्ड ठरला आहे.

  • 16 Dec 2025 08:00 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : पहिल्या एक्सलरेटेड राउंडमध्ये मुस्तफिजुर रहमान मालामाल

    आयपीएल 2026 च्या मिनी ऑक्शनमधील पहिला एक्सलरेटेड राउंड पूर्ण झाला आहे. या राउंडमध्ये बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान मालामाल झाला आहे. मुस्तफिजुरला केकेआरने 9 कोटी 20 लाख रुपयात आपल्या ताफ्यात घेतलं. दुसऱ्या एक्सलरेटेड राउंडमध्ये 43 खेळाडूंवर बोली लावण्यात येणार आहे.

  • 16 Dec 2025 07:39 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : मणीशंकर मुरा सिंह अनसोल्ड, एक्सलरेटेड राउंडचा पहिला टप्पा पूर्ण

    मणीशंकर मुरा सिंह हा अनकॅप्ड खेळाडू अनसोल्ड राहिला आहे. यासह एक्सलरेटेड राउंडचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.  आता काही मिनिटांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा एक्सलरेटेड राउंडमधील दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे.

  • 16 Dec 2025 07:35 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : सलग 3 खेळाडू सोल्ड, प्रत्येकी 30 लाखांचा भाव

    क्रेन्स फुलेत्रा, सार्थक रंजन आणि दक्ष कामरा हे तिघे सलग सोल्ड ठरले आहेत. या तिघांना प्रत्येकी 30 लाख रुपये इतका भाव मिळाला आहे. या तिघांना अनुक्रमे सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांनी घेतलं. आहे.

  • 16 Dec 2025 07:31 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : जिक्कू ब्राईट आणि इझाज सावरिया अनसोल्ड

    जिक्कू ब्राईट आणि इझाज सावरिया या अनकॅप्ड खेळाडूंच्या पदरी निराशा आली आहे.  जिक्कू ब्राईट आणि इझाज सावरिया हे दोघे अनसोल्ड ठरले आहेत.

  • 16 Dec 2025 07:29 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : प्रफुल हिंगे सोल्ड, हैदराबादकडून किती रक्कम?

    प्रफुल हिंगे याला खरेदीदार मिळाला आहे.  प्रफुल हिंगे याला सनरायजर्स हैदराबादने आपल्या ताफ्यात घेतलं आहे. हैदराबादने प्रफुलला 30 लाख या बेस प्राईजमध्ये आपल्या ताफ्यात घेतलं आहे.

  • 16 Dec 2025 07:27 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : करण, उत्कर्ष आणि आयुष अनसोल्ड

    करण लाल, उत्कर्ष सिंग आणि आयुष वर्तक हे तिघेही कमनशिबी ठरले आहेत. या तिघांना कुणीही खरेदीदार मिळाले नाही. हे तिघेही अनसोल्ड ठरले आहेत.

  • 16 Dec 2025 07:24 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : मुंबईकर अथर्व अंकोलेकर हैदराबादकडून खेळणार

    देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई टीमचं प्रतिनिधित्व करणारा अथर्व अंकोलेकर हैदराबादकडून खेळणार आहे. अथर्व अंकोलेकर याला सनरायजर्स हैदराबादने 30 लाख या बेस प्राईजमध्ये आपल्या ताफ्यात घेतलं.

  • 16 Dec 2025 07:22 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : सलग 3 अनकॅप्ड खेळाडू अनसोल्ड

    पुन्हा एकदा सलग 3 अनकॅप्ड खेळाडू अनसोल्ड ठरले आहेत.  विशाल निषाद, नॅथन स्मिथ आणि डॅनियल लॅटेगन हे तिघेही अनसोल्ड ठरले आहेत.

  • 16 Dec 2025 07:21 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : अमित कुमार याला 30 लाखांचा भाव

    अमित कुमार याला बेस प्राईजचा भाव मिळाला आहे. अमित कुमार सनरायजर्स हैदराबादकडून खेळताना दिसणार आहे.

  • 16 Dec 2025 07:19 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : सलग 11 खेळाडू अनसोल्ड

    सलग 11 खेळाडू अनसोल्ड ठरले आहेत. या खेळाडूंमध्ये डॅनिलय लॉरेन्स, तास्किन अहमद, रिचर्ड ग्लीसन, अल्झारी जोसेफ, रिले मेरडिथ, झाय रिचर्डसन, एम धीरज, तनय त्यागराजन, कॉनर एस्टरहुइझेन, इरफान उमेर आणि चिंतल गांधी यांचा समावेश आहे.

  • 16 Dec 2025 07:15 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : कूपर कोनोली याला 3 कोटींचा भाव

    कूपर कोनोली याला 3 कोटींचा भाव मिळाला आहे. कपूर पंजाब किंग्सकडून खेळताना दिसणार आहे.

  • 16 Dec 2025 07:14 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : सलग 4 खेळाडू अनसोल्ड

    सलग 4 खेळाडू अनसोल्ड ठरले आहेत. या चौघांमध्ये मुर्गन अश्विन, तेजस बारोओका, केसी करिअप्पा आणि मोहिती राठी अनसोल्ड ठरले.

  • 16 Dec 2025 07:12 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : मोहम्मद इझहार आणि ओंकार तरमाले या दोघांना प्रत्येकी 30 लाख

    मोहम्मद इझहार आणि ओंकार तरमाले या दोघांना प्रत्येकी 30 लाख रुपयांचा भाव मिळाला आहे. मोहम्मद मुबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. तर ओंकार तरमाले सनरायजर्स हैदराबादचं प्रतिनिधित्व करणार आहे.

  • 16 Dec 2025 07:10 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : साकीब हुसैन याला 30 लाख

    साकीब हुसैन सोल्ड ठरला आहे.  साकीब हुसैन याला 30 लाख रुपयांचा भाव मिळाला आहे. साकीबला सनरायजर्स हैदराबादने आपल्या ताफ्यात घेतलं आहे.

  • 16 Dec 2025 07:09 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : केएम आसिफ अनसोल्ड

    युवा आणि अनकॅप्ड खेळाडू केएम आसिफ अनसोल्ड ठरला आहे. केएम आसिफ याच्यासाठी कोणतीच फ्रँचायजी इच्छू दिसली नाही.

  • 16 Dec 2025 07:07 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : सलील अरोरा आणि रवी सिंह सोल्ड

    सलील अरोरा आणि रवी सिंह सोल्ड ठरले आहेत. सलील अरोरा याला एसआरएचकडून दीड कोटींचा भाव मिळाला आहे. तर रवी सिंह याच्यासाठी राजस्थान रॉयल्सने 95 लाख रुपये मोजले आहेत.

  • 16 Dec 2025 07:05 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : मंगेश यादव मालामाल, 5 कोटींपेक्षा जास्त भाव

    मंगेश यादव मालामाल झाला आहे. मंगेश यादव याला 5 कोटींपेक्षा जास्त भाव मिळाला आहे.  आरसीबीने मंगेश यादव याच्यासाठी 5 कोटी 20 लाख रुपये मोजले आहेत.

  • 16 Dec 2025 07:04 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : विकी ओस्तवाल आणि मंयक रावत अनसोल्ड

    विकी ओस्तवाल आणि मंयक रावत हे दोघे अनसोल्ड ठरले आहेत. या दोघांसाठी कोणत्याही फ्रँचयाजीने रस दाखवला नाही. त्यामुळे या दोघांना आता पुढील हंगामाची  वाट पाहावी लागणार आहे.

  • 16 Dec 2025 07:02 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : अमन खान याला 40 लाख रुपये, कोणत्या टीमकडून खेळणार?

    अनकॅप्ड अमन खान याला 40 लाख रुपयांचा भाव मिळाला आहे.  अमन खान चेन्नई सुपर किंग्स टीमकडून खेळताना दिसणार आहे.

  • 16 Dec 2025 07:01 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : सात्विक देसाई गतविजेत्या आरसीबीकडून खेळणार

    सात्विक देसाई गतविजेत्या आरसीबीकडून खेळताना दिसणार आहे. सात्विक देसाई याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 30 लाख रुपयात आपल्या गोटात घेतलं आहे.

  • 16 Dec 2025 07:00 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : अक्षत रघुवंशी कोट्यधीश, 2 कोटींपेक्षा जास्त भाव

    अक्षत रघुवंशी कोट्यधीश झाला आहे. अक्षतला 2 कोटींपेक्षा जास्त भाव मिळाला आहे. अक्षत 19 व्या मोसमात लखनौ सुपर जायंट्स टीमकडून खेळताना दिसणार आहे.

  • 16 Dec 2025 06:58 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : सलमान निजार अनसोल्ड

    सलमान निजार अनसोल्ड ठरला आहे.  सलमान निझार याला कुणीच खरेदीदार मिळाला नाही.

  • 16 Dec 2025 06:57 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : दानिश मालेवार याला 30 लाख

    दानिशे मालेवार याला 30 लाख रुपयांचा भाव मिळाला आहे. दानिश मालेवार 19 व्या मोसमात आयपीएल स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे.

  • 16 Dec 2025 06:56 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : पुन्हा सलग तिघे अनसोल्ड

    मुस्तफिजुर रहमान याच्यानंतर 3 खेळाडू अनसोल्ड ठरले आहेत. चेतन सकारिया, कुलदीप सेन आणि मोहम्मद वकार सलामखेईल हे तिघे अनसोल्ड ठरले आहेत.

  • 16 Dec 2025 06:53 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : मुस्तफिजूर रहमानला तगडा भाव, 9 कोटी 20 लाखांसह केकेआरच्या गोटात

    बांगलादेशच्या मुस्तफिजूर रहमान याला तगडा भाव मिळाला आहे.  मुस्तफिजूर रहमान याला 9 कोटी 20 लाखांचा भाव मिळाला आहे. मुस्तफिजूर रहमान केकेआरकडून खेळताना दिसणार आहे.

  • 16 Dec 2025 06:51 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : पुन्हा 3 खेळाडू अनसोल्ड

    कायले जेमीन्सन, एडम मिल्ने आणि लुंगी एन्गिडी हे तिघे कमनशिबी ठरले आहेत. या तिघांना 10 पैकी कोणत्याही फ्रँचायजींनी घेतलं नाही.

  • 16 Dec 2025 06:49 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : टीम सायफर्टला दीड कोटींचा भाव

    टीम सायफर्ट याला मिनी ऑक्शनमध्ये दीड कोटींचा भाव मिळाला आहे. टीम सायफर्ट 19 व्या हंगामात किंग खान शाहरुख खान याच्या कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना दिसणार आहे.

  • 16 Dec 2025 06:48 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : सलग 3 खेळाडू अनसोल्ड

    मॅथ्यू शॉर्ट याच्यानंतर सलग 3 खेळाडू अनसोल्ड ठरले आहेत. टॉम बँटन, जॉर्डन कॉक्स आणि जोश इंग्लिस हे तिघेही अनसोल्ड ठरले आहेत. या तिघांना खरेरीदार मिळाला नाही.

  • 16 Dec 2025 06:46 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : मॅथ्यू शॉर्ट याला दीड कोटी, यलो आर्मीकडून खेळणार

    ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू शॉर्ट याला चेन्नई सुपर किंग्स टीमने आपल्या गोटात घेतलं आहे. मॅथ्यू शॉर्टसाठी सीएसकेने दीड कोटी रुपये मोजले. मॅथ्यू शॉर्ट आता यलो आर्मीकडून खेळताना दिसणार आहे.

  • 16 Dec 2025 06:44 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : डॅरेल मिचेल आणि दासुन शनाका अनसोल्ड

    न्यझीालंडचा डॅरेल मिचेल (2 कोटी बेस प्राईज) आणि श्रीलंकेचा दासुन शनाका (75 लाख रुपये बेस प्राईज) हे दोघे अनसोल्ड ठरले आहेत. या दोघांना एक्सलरेटेड राउंडमध्येही कुणी घेतलं नाही.

  • 16 Dec 2025 06:43 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : जेसन होल़्डरला 7 कोटी, गुजरातकडून खेळणार

    वेस्ट इंडिजचा ऑलराउंडर जेसन होल्डर याला मिनी ऑक्शनमध्ये चांगला भाव मिळाला आहे. होल्डरसाठी गुजरात टायटन्स टीमने 7 कोटी मोजले आहेत. होल्डरची बेस प्राईज 2 कोटी रुपये होती.

  • 16 Dec 2025 06:38 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : शॉन एबेट, मायकल ब्रेसवेल आणि बेन ड्वारसुईस अनसोल्ड

    ऑस्ट्रेलियाचा शॉन एबेट, मायकल ब्रेसवेल आणि बेन ड्वारसुईस हे तिघे अनसोल्ड ठरले आहेत.  या तिघांसाठी कोणत्याच फ्रँचायजीने बोली लावली नाही.

  • 16 Dec 2025 06:37 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : राहुल त्रिपाठी याचं कमबॅक, केकेआरकडून 75 लाख

    राहुल त्रिपाठी याची बेस प्राईजचा भाव मिळाला आहे. राहुल त्रिपाठी याला 75 लाख रुपये मिळणार आहेत.

  • 16 Dec 2025 06:36 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : पाथुम निसांकासाठी मोठी बोली, टीमकडून इतक्या कोटींचा भाव

    श्रीलंकेच्या पाथुम निसांका याला तगडा भाव मिळाला आहे. पाथुमनची बेस प्राईज 75 लाख रुपये इतकी होती. मात्र दिल्ली कॅपिट्ल्सने पाथुम निसांका याच्यासाठी 4 कोटी रुपये मोजले.

  • 16 Dec 2025 06:34 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : एक्सलरेटेड राउंड, सेदीकुल्लाह अटल अनसोल्ड

    एक्सलरेटेड राउंडला सुुरुवात झाली आहे. या फेरीतील पहिलाच खेळाडू अनसोल्ड ठरला आहे. अफगाणिस्तानचा सेदीकुल्लाह अटल अनसोल्ड ठरला. सेदीकुल्लाह अटलसाठी कुणीच बोली लावली नाही.

  • 16 Dec 2025 06:33 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : एक्सलरेटेड राउंडला सुरुवात, 66 खेळाडूंचा फैसला होणार

    एक्सलरेटेड राउंडला सुरुवात झाली आहे. एक्सलरेटेड राउंडमध्ये 66 खेळाडूंचा फैसला होणार आहे. आता पहिल्या फेरीत अनसोल्ड ठरलेले खेळाडू सोल्ड होणार का? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

  • 16 Dec 2025 06:31 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : मिनी ऑक्शनमधील आतापर्यंतचे 5 महागडे खेळाडू

    कॅमरन ग्रीन, 25 कोटी 20 लाख, कोलकाता नाईट रायडर्स

    मथीशा पथिराणा, 18 कोटी, कोलकाता नाईट रायडर्स

    प्रशांत वीर (अनकॅप्ड), 14 कोटी 20 लाख, चेन्नई सुपर किंग्स

    कार्तिक शर्मा, (अनकॅप्ड) 14 कोटी 20 लाख, चेन्नई सुपर किंग्स,

    आकिब नबी, 8 कोटी 40 लाख, दिल्ली कॅपिट्ल्स

  • 16 Dec 2025 05:48 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : दहाव्या फेरीत अनकॅप्ड स्पिनरचा फैसला, कोण सोल्ड कोण अनसोल्ड?

    दहाव्या फेरीत अनकॅप्ड स्पिनरचा फैसला झाला आहे. या फेरीत वाहिदुल्ला झद्रान, शिवम शुक्ला, कर्ण शर्मा आणि कुमार कार्तिकेय हे 4 खेळाडू अनसोल्ड ठरले.

    सोल्ड खेळाडू

    विघ्नेश पुथुर, 30 लाख, राजस्थान रॉयल्स

    प्रशांत सोळंकी, 30 लाख, कोलकाता नाईट रायडर्स

    यश राज पुंजा , 30 लाख, राजस्थान रॉयल्स

  • 16 Dec 2025 05:35 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : सुशांत मिश्रा याला 90 लाख

    सुशांत मिश्रा याला 90 लाख रुपयांचा भाव मिळाला आहे. सुशांतसाठी राजस्थान रॉयल्सने 90 लाख रुपयांची बोली लावून त्याला आपल्या गोटात घेतलं आहे.

  • 16 Dec 2025 05:33 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : आकाश मढवाल अनसोल्ड

    मुंबई इंडियन्सकडून खेळलेला आकाश मढवाल हा अनसोल्ड ठरला आहे. आकाश मढवाल याच्यासाठी कोणत्याच टीमने बोली लावली नाही.

  • 16 Dec 2025 05:32 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : नमन तिवारी कोट्यधीश, लखनौकडून खेळणार

    नमन तिवारी कोट्यधीश झाला आहे. नमनला एलसजी अर्थात लखनौ सुपर जायंट्सकडून 1 कोटींचा भाव मिळाला आहे.

  • 16 Dec 2025 05:30 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : सिमरजीत सिंह अनसोल्ड

    सिमरजीत सिंह अनसोल्ड ठरला आहे. सिमरजीत सिंह याच्यासाठी कोणत्याच फ्रँचायजीने बोली लावली नाही.

  • 16 Dec 2025 05:29 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : कार्तिक त्यागी याला 30 लाख

    कार्तिक त्यागी याला 30 लाख रुपयांचा भाव मिळाला आहे. सर्वाधिक रक्कम घेऊन ऑक्शनमध्ये उतरलेल्या केकेआरने कार्तिकला आपल्या गोटात घेतलं आहे.

  • 16 Dec 2025 05:27 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : राज लिंबानी अनसोल्ड

    राज लिंबानी अनसोल्ड ठरला आहे. राज लिंबानी याला आपल्या ताफ्यात घेण्यात कोणत्याही संघाने रस दाखवला नाही.

  • 16 Dec 2025 05:25 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : अशोक शर्माला 90 लाख, गुजरातसाठी खेळणार

    अशोक शर्मा याला 90 लाख रुपयांचा भाव मिळाला आहे. अशोक 19 व्या मोसमात गुजरातसाठी खेळताना दिसणार आहे. अशोक कशी कामगिरी करतो याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

  • 16 Dec 2025 05:23 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : नवव्या फेरीला सुरुवात, अनकॅप्ड वेगवान गोलंदाजांवर बोली लागणार

    आयपीएल 2026 मिनी ऑक्शनमधील नवव्या फेरीला सुरुवात झालीय. या फेरीत अनकॅप्ड वेगवान गोलंदाजांवर बोली लागणार आहे.

  • 16 Dec 2025 05:20 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : वंश बेदी आणि तुषार रहेजा अनसोल्ड

    वंश बेदी आणि तुषार रहेजा हे दोेघे अनसोल्ड ठरले आहेत. या दोघांसाठी कोणत्याही फ्रँचयाजीने बोली लावली नाही. या दोघांना बेस प्राईजमध्येही कुणी खरेदीदार मिळाला नाही.

  • 16 Dec 2025 05:18 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : तेजस्वी सिंह याला 3 कोटी

    कोलकाता नाईट रायडर्सने तेजस्वी सिंग याला 3 कोटी रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं आहे. तेजस्वीसाठी जोरदार चुरस पाहायला मिळाली. मात्र केकेआरने बाजी मारली.

  • 16 Dec 2025 05:14 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : मुकुल चौधरीला कोटींचा भाव, लखनौकडून 2 कोटी 60 लाख

    मुकुल चौधरी याला कोटीचा भाव मिळाला आहे. मुकलची बेस प्राईज 30 लाख रुपये इतकी होती. मात्र मुकुलसाठी एलएसजी टीमने 2 कोटी 60 लाख रुपये मोजले आणि त्याला आपल्या ताफ्यात घेतलं.

  • 16 Dec 2025 05:10 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : कार्तिक शर्माची चांदी, 14 कोटी 20 लाखांचा भाव

    अनकॅप्ड विकेटकीपरमधील कार्तिक शर्मा याची चांदी झाली आहे. कार्तिक याला त्याच्या बॅटिंगसाठी मोठा भाव मिळाला आहे. कार्तिकसाठी सीएसके फ्रँचायजीने 14 कोटी 20 लाख रुपये मोजले आहेत. कार्तिकची बेस प्राईज ही 30 लाख रुपये इतकी होती.

  • 16 Dec 2025 05:03 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : रुचीत अहीर अनसोल्ड

    अनकॅप्ड विकेटकीपर रुचीत अहीर अनसोल्ड ठरला आहे. रुचीत अहीर याच्यासाठी कोणत्याही फ्रँजायजीने बोली लावली नाही. त्यामुळे रुचीतच्या पदरी निराशा आली आहे.

  • 16 Dec 2025 05:02 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : सेट नंबर 8 ला सुरुवात, अनकॅप्ड विकेटकीपरचं काय होणार?

    आयपीएल 2026 मिनी ऑक्शमधील सेट नंबर 8 ला सुरुवात झाली आहे. या सेटमध्ये अनकॅप्ड विकेटकीपर खेळाडूंवर बोली लागणार आहे.

  • 16 Dec 2025 05:00 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : तनुश कोटीयन, कमलेश नागरकोट्टी आणि सनवीर सिंह अनसोल्ड

    मिनी ऑक्शनमध्ये सलग 3 अनकॅप्ड खेळाडू अनसोल्ड ठरले आहेत.  मुंबईकर तनुश कोटीयन, कमलेश नागरकोट्टी आणि सनवीर सिंह अनसोल्ड ठरले आहेत. या तिघांना कुणीही घेतलं नाही.

  • 16 Dec 2025 04:59 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : शिवांग कुमारला 30 लाख रुपये, एसआरएचसाठी खेळणार

    शिवांग कुमार याला 30 लाख रुपयांचा भाव मिळाला आहे. शिवांग 19 व्या मोसमात एसआरएचसाठी खेळणार आहे.

  • 16 Dec 2025 04:57 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : प्रशांत वीर याला कोटींचा भाव, ठरला इतिहासातील सर्वात महागडा अनकॅप्ड

    प्रशांत वीर याने इतिहास घडवला आहे. प्रशांत आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला आहे. अनकॅप्ड प्रशांत वीर याला कोटींचा भाव मिळाला आहे. प्रशांतची बेस प्राईज 30 लाख रुपये होती. मात्र प्रशांतला 14 कोटी 20 लाख रुपये  इतका भाव मिळाला आहे.  चेन्नई सुपर किंग्स फ्रँचायजीने प्रशांतला आपल्या टीममध्ये घेतलं आहे.

  • 16 Dec 2025 04:50 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : सलग 4 खेळाडू अनसोल्ड

    विजय शंकर, राज्यवर्धन हंगरगेकर, महिपाल लोमरुर आणि एधन टॉम हे खेळाडू अनसोल्ड ठरले आहेत. या 4 खेळाडूंसाठी कोणत्याही फ्रँचायजींनी रस दाखवला नाही.

  • 16 Dec 2025 04:47 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : आकिब डार याला कोटींचा भाव

    ऑलराउंडर आकीब डार याला कोटींचा भाव मिळाला आहे. आकीब डार याच्यासाठी दिल्ली कॅपिट्ल्सने 8 कोटी 40 लाख रुपये मोजले आहेत. आकीबची बेस प्राईज ही 30 लाख रुपये इतकी होती.

  • 16 Dec 2025 04:40 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : सातव्या फेरीला सुरुवात, अनकॅप्ड ऑलराउंडर्सचं काय होणार?

    आयपीएल 2026 मिनी ऑक्शनमधीर सातव्या फेरीला सुरुवात झाली आहे. या फेरीत अनकॅप्ड ऑलराउंडर्सचा फैसला होणार आहे. या फेरीत कोणत्या ऑलराउंडरला किती रक्कम मिळणार? हे काही मिनिटांत स्पष्ट होईल.

  • 16 Dec 2025 04:20 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : सहाव्या सेटमधील सर्व फलंदाज अनसोल्ड

    मिनी ऑक्शनमधील सहाव्या फेरीतील सर्व खेळाडू अनसोल्ड राहिले आहेत. हा सेट अनकॅप्ड बॅट्समनचा होता. मात्र 10 फ्रँचायजींंनी एकाही खेळाडूला घेतलं नाही. अर्थव तायडे, अनमोलप्रीत सिंह, अभिवन तेजराणा, अभिनव मनोहर,  यश धुळ आणि आर्या देसाई हे अनसोल्ड ठरले आहेत.

  • 16 Dec 2025 04:16 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : सहाव्या फेरीला सुरुवात, अनकॅप्ड बॅट्समनचा फैसला

    आयपीएल 2026 मिनी ऑक्शनमधील सहाव्या फेरीला सुरुवात झाली आहे. या सहाव्या फेरीत अनकॅप्ड बॅट्समनचा फैसला होणार आहे.

  • 16 Dec 2025 04:15 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : अकील होसेन याला 2 कोटी

    वेस्ट इंडिजचा खेळाडू याला 2 कोटींचा भाव मिळाला आहे. अकीलला चेन्नई सुपर किंग्सने 2 कोटी रुपये मोजून आपल्या गोटात घेतलं आहे.

  • 16 Dec 2025 04:14 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : महीश तीक्षणा-मुजीब उर रहमान अनसोल्ड

    महीश तीक्षणा आणि मुजीब उर रहमान अनसोल्ड राहिले आहेत. या दोघांना कुणीही घेतलं नाही. या दोघांची झटपट फेरीत निवड होणार का? याकडे लक्ष असणार आहे.

  • 16 Dec 2025 04:12 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : रवी बिश्नोईला 7 कोटी 20 लाख रुपयांचा भाव

    टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू याला त्याच्या बेस प्राईजपेक्षा कित्येक पट जास्त रक्कम मिळाली आहे.  रवीला राजस्थानने 7 कोटी 20 लाख रुपयात आपल्या गोटात घेतलं आहे.

  • 16 Dec 2025 04:04 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : फिरकी गोलंदांजाच्या फेरीला सुरुवात, राहुल चहर अनसोल्ड

    फिरकी गोलंदांजाच्या फेरीला सुरुवात झाली आहे. राहुल चहर अपयशी ठरला आहे. राहुल चहर अनसोल्ड ठरला आहे.

  • 16 Dec 2025 04:03 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : स्पेन्सर जॉन्सन, एनरिक नॉर्खिया आणि फझलहक फारुकी अनसोल्ड

    स्पेन्सर जॉन्सन, एनरिक नॉर्खिया आणि फझलहक फारुकी हे तिघे वेगवान गोलंदाज अनसोल्ड ठरले आहेत. या तिघांना खरेदीदार मिळाला नाही.

  • 16 Dec 2025 04:01 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : मथीशा पथिराणा याला 18 कोटींचा भाव

    श्रीलंकेचा गोलंदाज मथिशा पथीराणा याला 18 कोटींचा भाव मिळाला आहे. मथिशा आयपीएलमधील सर्वात महागडा श्रीलंकन खेळाडू ठरला आहे. केकेआरने मथिशाला घेतलं आहे. मथिशाची बेस प्राईज 2 कोटी रुपये इतकी होती.

  • 16 Dec 2025 03:53 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : गेराल्ड कोएत्झी अनसोल्ड

    दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झी याच्या पदरी निराशा आली आहे. गेराल्ड कोएत्झी अनसोल्ड ठरला आहे. कोएत्झीसाठी कोणत्याच संघाने बोली लावली नाही.

  • 16 Dec 2025 03:52 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : शिवम मावी अनसोल्ड

    टीम इंडियाचा शिवम मावी अनसोल्ड ठरला आहे. शिवमची बेस प्राईज ही 75 लाख रुपये इतकी होती.

  • 16 Dec 2025 03:51 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : जेकब डफी याला 2 कोटींचा भाव

    न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज जेकब डफी याला 2 कोटींचा भाव मिळाला आहे. आरसीबीने जेकबला त्याच्या बेस प्राईजमध्ये घेतलं आहे.

  • 16 Dec 2025 03:50 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : आकाश दीप अनसोल्ड

    टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आकाश दीप अनसोल्ड ठरला आहे. आकाश दीप याची बेस प्राईज 1 कोटी रुपये इतकी होती.

  • 16 Dec 2025 03:49 PM (IST)

    IPL Mini Auction 2026 Live Updates : न्यूझीलंडचा मॅट हेन्री अनसोल्ड

    न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री अनसोल्ड ठरला आहे. मॅटची बेस प्राईज 2 कोटी रुपये इतकी होती.