AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 CSK vs SRH : सीएसकेने हैदराबादला रोखलं, विजयासाठी इतक्या धावांंचं आव्हान

सनराइजर्स हैदराबाद संघाला इतिहास रचण्याची संधी आहे. त्यासाठी हैदराबाद संघाला सीएसकेला 134 धावा करण्यापासून रोखावं लागणारल आहे.

IPL 2023 CSK vs SRH : सीएसकेने हैदराबादला रोखलं, विजयासाठी इतक्या धावांंचं आव्हान
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Apr 21, 2023 | 9:33 PM
Share

मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आणि सनराइजर्स हैदराबाद यांच्यामध्ये 29 वा सामना सूरू आहे. सीएसकेने टॉस जिंकत बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना सनराइजर्स हैदराबाद संघाने निर्धारित 20 षटकात 134 धावा केल्या आहेत. हैदराबादच्या संघाच्या कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. सलामीला आलेल्या अभिषेक शर्मा याने सर्वाधिक 34 धावांची खेळी केली. तर जडेजाने चेन्नईकडून 3 विकेट्स घेतल्या. हैदराबादने चेन्नईला पराभूत केलं तर हा त्यांचा चेन्नईच्या मैदानावर पहिलाविजय ठरणार आहे.

हैदराबाद संघाची बॅटींग

सनराइजर्स संघाची सुरूवात चांगली झाली होती. अभिषेक शर्मा आणि हॅरी ब्रूक आज सलामीला आले होते. मात्र मयंक अग्रवाल याच्या जागी अभिषेकला सलामीला उतरवण्याचा संघ व्यवस्थापनाने निर्णय घेतला होता.  हा फार काही योग्य ठरला नाही. हॅरी ब्रूक याला 18 धावांवर असातान आकाश सिंगने बाद केला होता. ऋतुराज गायकवाड याने कमाल कॅच घेतला होता. त्यानंतर अभिषेक शर्माने एक बाजू लावून धरली होती. रविंद्र जडेजाने शर्माला आऊट करत ही जोडी फोडली.

राहुल त्रिपाठी 21 धावा, एडन मार्करम 12 धावा,  हेनरिक क्लासेन 17 धावा आणि मार्को जॅनसेन याने नाबाद 17 धावांची खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत मारून दिली. चेन्नईकडून रविंद्र जडेजाने 3 विकेट्स, महेश तीक्ष्णा, मथीशा पाथिराना आणि आकाश सिंग यांनी 1 विकेट्स घेतली.

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): रुतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, अंबाती रायुडू, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (w/c), महेश तीक्ष्णा, तुषार देशपांडे, मथीशा पाथिराना

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (C), हेनरिक क्लासेन (W), अभिषेक शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, उमरान मलिक

Follow Us
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोल
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर उघडले
12 वर्षांची प्रतीक्षा संपली! सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर भाविकांसाठी खुले
शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने...
Nashik Simhastha Kumbh Mela : शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन्...
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन् गोदावरीच्या महाआरतीने मंगलमय वातावरण
सप्त नद्यांच्या पवित्र जलाने अभिषेक, देवतांचं आवाहन अन् ध्वजपूजन.....
Trimbakeshwar Kumbh Mela Flag Hoisting : सप्त नद्यांच्या पवित्र जलाने अभिषेक, देवतांचं आवाहन अन् ध्वजपूजन; त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याचा विधिवत प्रारंभ
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा भव्य ध्वजारोहण सोहळा
Simhastha Kumbh Mela Nashik : नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा भव्य ध्वजारोहण सोहळा; कुंभपर्वाला सुरुवात
पूर्णेकर समर्थकांना मारहाण; ठाणे पोलीस पालकमंत्र्यांची धुणीभांडी करतात
Sanjay Raut : पूर्णेकर समर्थकांना मारहाण; ठाणे पोलीस पालकमंत्र्यांची धुणीभांडी करतात का? संजय राऊतांचा थेट सवाल
एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;
Gunratna Sadavarte : एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;  गुणरत्न सदावर्तेंचं गाण्यातून भाकीत