IPl Final 2023 : ही दोस्ती तुटायची नाय! माही शून्यावर आऊट, जडेजाच्या मॅचविनिंग चौकारानंतर पाहा काय झालं?

| Updated on: May 30, 2023 | 3:50 AM

Dhoni jadeja : धोनीने जडेजाला उचलून घेतलेला हा फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. विजयाचा आनंद गगनात मावत नव्हता, धोनी आणि जडेजाची मैत्री सर्वांना माहितच आहे. दोघांनी याआधी अनेक सामने चेन्नईला जिंकून दिले आहेत.

IPl Final 2023 : ही दोस्ती तुटायची नाय! माही शून्यावर आऊट, जडेजाच्या मॅचविनिंग चौकारानंतर पाहा काय झालं?
Follow us on

मुंबई : आयपीएल 2023 मधील फायनल सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने गुजरात टायटन्सचा 5 विकेट्सने पराभव केला. या विजयासह सीएसके संघाने आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा विजेतेपद जिंकण्याचा पराक्रम केला आहे. मुंबई इंडिअन्सने पाचवेळा विजेतेपद जिंकलं होतं, या विक्रमाशी सीएसकेने आता बरोबरी केलीये. एकवेळ सामना गुजरातच्या बाजूने पूर्णपणे झुकलेला होता. मात्र सर रविंद्रज जडेजाने षटकार आणि चौकार मारत ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केलं.

मोहित शर्मा याने अंतिम ओव्हरमध्ये सीएसकेला 13 धावांची गरज असताना सुरूवातीच्या 4 चेंडूत त्याने अवघ्या 3 धावा दिल्या. त्यानंतर 2 चेंडूत 10 धावांची गरज असताना जडेजाने पहिला सिक्स आणि नंतर चौकार मारत विजय संपादित केला. ही फायनल काही सोपी नव्हती कारण टी-20 सामन्याचा तिसऱ्या दिवशी या सामन्याचा निकाल लागला.

पाहा व्हिडीओ-

 

सीएसकेने विजय मिळवल्यावर जडेजा मैदानात पळत गेला. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्णधार महेंद्र सिंग धोनी याने जडेजाला मिठी मारली. कारण धोनीच्या नेतृत्त्वाखाली सीएसकेला आता पाचवी ट्रॉफी मिळवून दिली आहे. धोनीने जडेजाला उचलून घेतलेला हा फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. विजयाचा आनंद गगनात मावत नव्हता, धोनी आणि जडेजाची मैत्री सर्वांना माहितच आहे. दोघांनी याआधी अनेक सामने चेन्नईला जिंकून दिले आहेत.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): ऋद्धिमान साहा (W), शुबमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (C), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋुतुराज गायकवाड़, डेवॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, महेंद्र सिंह धोनी (कप्तान, विकेटकीपर), दीपक चाहर, मथीशा पथिराना, तुषार देशपांडे, महेश तीक्ष्णा