AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 Points Table | रोहितच्या ‘पलटण’कडून एक घाव दोन तुकडे, पॉइंट्स टेबल पाहिलंत का? एकदा पाहाच!

वानखेडे स्टेडिअमवर केलेल्या पराभवाचा बदला पलटणने घेतलाच, मोहालीमध्ये त्यांच्या घरच्या मैदानावर 6 विकेट्स आणि 7 चेंडू राखून मोठ्या थाटात विजय मिळवला.

IPL 2023 Points Table | रोहितच्या 'पलटण'कडून एक घाव दोन तुकडे, पॉइंट्स टेबल पाहिलंत का? एकदा पाहाच!
तिळक वर्मा याने या मोसमात मुंबई इंडियन्सकडून 9 सामन्यात 274 धावा केल्या आहेत. नाबाद 84 हा तिळकचा त्याचा हायस्कोअर आहे.
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: May 04, 2023 | 12:46 AM
Share

मुंबई : मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात पलटणने दमदार विजय मिळवलेला आहे. पंजाबने दिलेल्या 215 धावांचं लक्ष मुंबईने 6 विकेट्स आणि 7 बॉल राखून पूर्ण केलं आहे. या विजयासह मुंबईने वानखेडे मैदानावर झालेल्या पराभवाचा बदला घेतलाच तर त्यासोबतच पॉइंट टेबलमध्ये सुद्धा मुसंडी मारली आहे.

संघमॅचविजय पराभवगुणएनआरआर
गुजरात टायटन्स1410420+0.820
चेन्नई सुपर किंग्स148517+0.652
लखनऊ सुपर जायंट्स 148517+0.284
मुंबई इंडियन्स 148616-0.044
राजस्थान रॉयल्स147714+0.148
आरसीबी 137614-0.128
केकेआर146812-0.229
पंजाब किंग्स146812-0.304
दिल्ली कॅपिटल्स145910-0.808
सनरायजर्स हैदराबाद 134908-0.558

मुंबई इंडियन्स संघाने आजच्या सामन्यात विजय मिळवत पॉइंट टेबल मध्ये सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. तर दुसरीकडे पंजाब संघाचा आज पराभव झाल्यामुळे 10 गुणांसह  पॉईंट टेबल मध्ये सातव्या स्थानी आहेत. पॉइंट टेबलमध्ये राजस्थान रॉयल्स, आरसीबी, मुंबई आणि पंजाब या संघाचे 10 गुण झालेले आहेत. अनुक्रमे संघ पॉइंट टेबलमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. फक्त रनरेटच्या आधारावर हे संघ एकाखालोखाल आहेत. त्यामुळे येणाऱ्या सामन्यांमध्ये नेट रनरेट हा एक्स फॅक्टर ठरणार आहे.

सामन्याचा धावता आढावा 

पंजाब किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी केली होती. पहिल्यांदा बॅटिंग करताना पंजाबने 214 धावांचं लक्ष मुंबईला दिलं होतं. यामध्ये पंजाबतर्फे लियाम लिव्हिंगस्टनने नाबाद 82 आणि जितेश शर्माने 49 धावांची नाबाद खेळी खेळी केली. या दोघांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर पंजाबने 200 धावांचा पल्ला पार केला होता.

मुंबईकडून हे लक्ष पूर्ण करण्यासाठी उतरलेल्या सलामीवीरांनी एकदम निराशाजनक सुरुवात केली. रोहित शून्यावर झाला, त्यानंतर ग्रीन फलंदाजीला आला मात्र 23 धावांवर तोसुद्धा आऊट झाला.  ग्रीन आऊट झाल्यावर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या सूर्यकुमार यादवने वादळी खेळी केली.  दुसरीकडे  ईशान किशन यानेही एक बाजू लावून धरली होती. दोघांनी अनुक्रमे 75 धावा आणि 66 धावा केल्या. शेवटी तिलक वर्मा याने आक्रमक फलंदाजी करत सिक्स मारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): प्रभसिमरन सिंग, शिखर धवन (C), मॅथ्यू शॉर्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (w), सॅम कुरान, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, राहुल चहर, अर्शदीप सिंग

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), इशान किशन (डब्ल्यू), कॅमेरॉन ग्रीन, टिळक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, जोफ्रा आर्चर, पीयूष चावला, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्शद खान

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती