IPL 2024 Points Table : मुंबईच्या पराभवाने गुजरात टायटन्सची पॉईंट टेबलमध्ये उडी, थेट…

| Updated on: Mar 25, 2024 | 12:21 AM

IPL 2023 Points Table Purple Cap and Orange Cap : सुपर सन डे दिवशी डबल हेडर सामन्यानंतर पॉईंट टेबलमध्ये मोठा बदल झालेला पाहायला मिळाला आहे. गुजरात आणि राजस्थान दोन्ही संघांनी आपले पहिले विजय नोंदवले आहेत.

IPL 2024 Points Table : मुंबईच्या पराभवाने गुजरात टायटन्सची पॉईंट टेबलमध्ये उडी, थेट...
Follow us on

मुंबई : आज म्हणजेच रविवारी झालेल्या डबल हेडर सामन्यानंतर पॉईंट टेबलमध्ये बदल झालेले पाहायला मिळाले आहेत. राजस्थान रॉयल्स वि. लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या सामन्यानंतर पॉईंट टेबलमध्ये एका संघान टॉप मारला आहे. तर मुंबईला आजच्य पराभवाचा तोटा सहन करावा  लागला आहे. डबल हेडरमध्ये राजस्थान आणि गुजरात संघाने विजयाचा श्रीगणेशा केला आहे.

संघसामनेविजय पराजयनेट रनरेटगुण
राजस्थान रॉयल्स330+1.249 6
कोलकाता नाईट रायडर्स220+1.0474
चेन्नई सुपर किंग्स 3210.9764
गुजरात टायटन्स321-0.7384
सनरायझर्स हैदराबाद312+0.2042
लखनऊ सुपर जायंट्स2110.0252
दिल्ली कॅपिटल्स212-0.016 2
पंजाब किंग्स3120.3372
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु312-0.7112
मुंबई इंडियन्स 303-1.4230

आजच्या आज रविवारी दुपारी झालेल्या पहिल्या सामन्यामध्ये राजस्थान संघाने लखनऊ संघाचा पराभव करत थेट पहिलं स्थान गाठलं आहे. आता राजस्थान संघाचा नेट रनरेट +1.000 असून त्यानंतर दुसऱ्या स्थानी चेन्नई सुपर किंग्ज असून नेट रनरेट +0.779, पंजाब किंग्ज नेट +0.495. नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानी, तर चौथ्या स्थानी गुजरात टायटन्स आणि पाचव्या क्रमांकावर केकेआर आहे. पाच सामने झाले असून त्यामधील पाच सामन्यात सनराईजर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, आरसीबी आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांना अद्याप विजयाचं खातं काही उघडता आलं नाही.

मुंबई वि. गुजरात सामन्याचा धावता आढावा

मुंबई इंडियन्स संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गुजरातने प्रथम बॅटींग करताना 20 ओव्हरमध्ये 168-6 धावा केल्या. त्यानंतर या लक्ष्याचा पाठालाग करताना मुंबईला अपयश आलं. मुंबईला 20 ओव्हरमध्ये 162-9 धावा करता आल्या. गुजरात संघाने सहा धावांनी विजय मिळवत दमदार सुरूवात केली आहे.

गुजरात टायटन्स प्लेईंग इलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), रिद्धिमान साहा (डब्ल्यू), साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, आर साई किशोर आणि स्पेन्सर जॉन्सन.

मुंबई इंडियन्स प्लेईंग इलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नमन धीर, टिम डेव्हिड, शम्स मुलानी, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह आणि ल्यूक वुड