IPL 2022 Points Table: एमएस धोनीचा एमआयला दे धक्का, मुंबईच्या खात्यात अजूनही फक्त ‘भोपळा’च

| Updated on: Apr 22, 2022 | 6:53 AM

आयपीएल 2022 ला आता चार आठवडे पूर्ण होत असून एवढ्या दिवसाता आता 33 सामने झाले आहेत, तरीही मुंबई इंडियन्सला काही पहिल्या विजयाची प्रतीक्षा काही संपलेली नाही.

IPL 2022 Points Table: एमएस धोनीचा एमआयला दे धक्का, मुंबईच्या खात्यात अजूनही फक्त भोपळाच
IPL मध्ये 4 चेंडू असताना धोनीने 16 धावांचा मारा करत मुंबईकडून विजयाची संधी हिरावून घेतली
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबईः रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने (Mumabi Indians) गुरुवारी आपल्या सर्वात मोठा प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) विरुद्ध मैदानात उतरले होते. मात्र त्यांना एका महत्वाच्या सामान्यात शेवटच्या चेंडूवर 3 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या सीझनमधील मुंबई इंडियन्सचा हा सलग सातवा पराभव होता आणि त्यामुळे पुन्हा एकदा ही चॅम्पियन संघ आयपीएल पॉइंट टेबलमध्ये आपले विजयाचे खाते उघडण्यात अपयशी ठरला. चेन्नई सुपर किंग्जने मात्र गेल्या सीझनमध्ये गतविजेत्या संघाने त्यांच्या दुसऱ्या विजयासह प्लेऑफच्या त्यांच्या विजयाची संधी अजूनही कायम ठेवल्या आहेत.

विजयाची संधी हिरावली

आयपीएलच्या या लढतीत पहिल्या दोन संघांनी 6-6 मॅच खेळाल्या होत्या, त्यामध्ये CSK संघाने एक विजय मिळवला होता, आणि त्यावेळी मुंबई संघाची सगळीच झोळी खाली होती. चेन्नई विरोधात दमदार रेकॉर्डला बघून सगळ्यांना वाटत होतं की, मुंबई आता यावेळी आपल्या संघाचे एकतरी खातं उघडणार आहे. सामन्याच्या पहिल्याच डावात फलंदाजीच्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडल्यानंतर, मुंबईने चांगली कामगिरी केली होती, आणि त्याच वळी शेवटच्या षटकात ते अगदी विजयाच्या अगदी जवळ पोहचले होते. त्यानंतर 20 व्या षटकारामध्ये उर्वरित 4 चेंडू असताना एमएस धोनीने 16 धावांचा मारा करत मुंबईकडून हीसुद्धा विजयाची ही संधी हिरावून घेतली.

पॉइंट्स टेबलमध्ये परिस्थिती जैसे थी

तसे, या निकालामुळे पाँईट्स टेबलमध्ये कोणताही फरक पडलेला नाही आणि कोणत्याही संघाचे स्थान यामुळे बदललेही नाही. खरं तर हा सामना शेवटच्या दोन संघांमधीलच होता. या सामन्यापूर्वीही मुंबई इंडियन्स संघ शेवटच्या स्थानावर होता आणि अजूनही तो तसाच आहे. त्यामुळे चेन्नई अजूनही नवव्या स्थानावर तशीच आहे, मात्र त्यांना आता आणखी 2 पाँईट्स मिळाले आहेत. या पाँईट्सच्या आधारावरच त्यांचे् 7 सामन्यांमधून 4 गुण आहेत.

याप्रकारे, या लीगमधील 33 व्या सामन्यानंतर गुजरात टायटन्स पहिल्या स्थानावर आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर दुसऱ्या स्थानावर आहेत. या दोघांचेही 10-10 गुण आहेत. त्यामुळे राजस्थान रॉयल्स सध्या प्लेऑफच्या तिसऱ्या स्थानावर असून लखनऊ सुपर जायंट्स चौथ्या स्थानावरच आहे.

दिल्ली-राजस्थानची होणार टक्कर

आता जर तुम्हाला पॉइंट टेबलमध्ये काही चढ-उतार पाहण्याचे असतील तर शुक्रवारी होणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्या सामन्याची वाट तुम्हाला बघावी लागणार आहे. दोन्ही संघांनी त्यांचे मागील सामने जिंकले असले तरी त्यांच्या या पाँईट्समध्ये फरक आहे. तर राजस्थानचे 8 पाँईट्स असून दिल्लीचे 6 गुण आहेत. त्यामुळे ते सहाव्या स्थानावर आहे. जर राजस्थानने हा सामना जिंकला तर ते पहिले स्थान त्यांना मिळणार आहे. तर दुसरीकडे, दिल्ली जिंकल्यास राजस्थानसह उर्वरित संघांना मागे टाकत तिसऱ्या स्थानावर प्रवेश करणार आहे.