AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022 Points Table: KKR चा MI वर मोठा विजय, चार टीम्सचे समान पॉइंटस, पुढे काय? सामन्याचे हायलाइटस एकदा पहा

IPL 2022 Points Table: KKR ला आजच्या सामन्यात विजय आवश्यक होता. त्यांच्यासाठी हा सामना 'करो या मरो' होता. पॉइंटस टेबलमध्ये केकेआरचा संघ नवव्या स्थानावर होता.

IPL 2022 Points Table: KKR चा MI वर मोठा विजय, चार टीम्सचे समान पॉइंटस, पुढे काय? सामन्याचे हायलाइटस एकदा पहा
KKR Won Against Mumbai Indians
| Updated on: May 09, 2022 | 11:27 PM
Share

मुंबई: मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) फॅन्स आज पुन्हा एकदा निराश झाले. जसप्रीत बुमराहच्या (Jasprit bumrah) जबरदस्त कामगिरीवर फलंदाजांनी पाणी फिरवलं. मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांचं कोलकात्याच्या गोलंदाजांसमोर काहीच चाललं नाही. कोलकात्याच्या 166 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा डाव 113 धावात आटोपला. केकेआरने मुंबईवर 52 धावांनी मोठा विजय मिळवला. त्यामुळे केकेआरच्या धावगतीत सुद्धा सुधारणा झाली आहे. इशान किशनने (Ishan kishan) 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. पण त्यात T 20 क्रिकेटला साजेसा वेग नव्हता. त्याने 43 चेंडूंमध्ये 51 धावा केल्या. मुंबई इंडियन्सला आज अपेक्षित सुरुवात मिळाली नाही. कॅप्टन रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला. अवघ्या 2 रन्सवर साउदीने रोहितला जॅक्सनकरवी झेलबाद केलं. तिलक वर्माही आज फार वेळ टिकला नाही. त्याला अवघ्या 6 रन्सवर रसेलने बाद केलं. मागचे दोन सामने मुंबई इंडियन्सला जिंकून देणारा टिम डेविड आज चमकला नाही. वरुण चक्रवर्तीच्या फिरकीने त्याला चकवलं. डेविडने 9 चेंडूत 13 धावा केल्या. या खेळीत तीन चौकार होते. पॅट कमिन्सने एकाच ओव्हरमध्ये इशान किशन, डॅनियल सॅम्स आणि मुरुगन अश्विन यांच्या विकेट काढल्या.

पॉइंटस टेबलची स्थिती समजून घ्या

KKR ला आजच्या सामन्यात विजय आवश्यक होता. त्यांच्यासाठी हा सामना ‘करो या मरो’ होता. पॉइंटस टेबलमध्ये केकेआरचा संघ नवव्या स्थानावर होता. आज मुंबई विरुद्धच्या विजयानंतर केकेआरची टीम सातव्या स्थानावर आली आहे. काल चेन्नईने दिल्ली कॅपिटल्सला नमवल्यानंतर केकेआरची नवव्या स्थानावर घसरण झाली होती. प्लेऑफचं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी केकेआरला आजच्या सामन्यात विजय आवश्यक होता. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना इतर संघांच्या कामगिरीवरही अवलंबून रहाव लागेल. आता दिल्ली, एसआरएच, पंजाब आणि कोलकाता तिन्ही टीम्सचे समान 10 पॉइंटस आहेत.

पॅट कमिन्सने एका ओव्हरमध्ये घेतलेले तीन विकेट इथे क्लिक करुन पहा

IPL पॉइंट्स टेबल

संघ सामने जय पराजय पॉइंट्स नेट रन रेट
गुजरात टायटन्स 14104200.316
राजस्थान रॉयल्स 1495180.298
लखनौ सुपर जायंट्स1495180.251
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर 148616-0.253
दिल्ली कॅपिटल्स 1477140.204
पंजाब किंग्स 1477140.126
कोलकाता नाइट रायडर्स1468120.146
सनरायजर्स हैदराबाद 146812-0.379
चेन्नई सुपर किंग्स 144108-0.203
मुंबई इंडियन्स144108-0.506

KKR च्या धावगतीला बुमराहमुळे ब्रेक

केकेआरने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 9 बाद 165 धावा केल्या. केकेआरकडून सर्वाधिक वेंकटेश अय्यर 43 आणि नितीश राणाने 43 धावा केल्या. वेकंटेश अय्यरने ज्या पद्धतीची सुरुवात केली होती. ते पाहता केकेआरचा संघ 180-190 धावसंख्या सहज उभारेल असं वाटलं होतं. पण बुमराहच्या वादळापुढे त्यांच्या धावगतीला ब्रेक लागला.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.