IPL 2024 Points Table : पंजाब विरुद्धच्या विजयानंतर मुंबईला पॉइंट्स टेबलमध्ये फायदा की तोटा?

IPL Points Table 2024 After 33rd Match : मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 33 व्या सामन्यात पंजाब किंग्सवर मात केली आहे. मुंबई या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये कुठे आहे?

IPL 2024 Points Table : पंजाब विरुद्धच्या विजयानंतर मुंबईला पॉइंट्स टेबलमध्ये फायदा की तोटा?
pbks vs mi ipl 2024 mumbai indians,
Image Credit source: BCCI/IPL
| Updated on: Apr 18, 2024 | 11:54 PM

मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सवर 9 धावांनी मात केली आहे. मुंबईने पंजाबला विजयासाठी 193 धावांचं आव्हान दिलं होतं. पंजाबनेही अखेरपर्यंत जोरदार लढत दिली. मात्र पंजाबला 19.1 ओव्हरमध्ये ऑलआऊट 183 धावांपर्यंतच मजल मारता आली. पंजाबकडून आशुतोष शर्मा याने सर्वाधिक 61 धावांची खेळी केली. शशांक सिंह याने 41 धावा जोडल्या. हरप्रीत ब्रार याने 21 धावांचं योगदान दिलं. पंजाबकडून या चौघांव्यतिरिक्त एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि गेराल्ड कोएत्झी या दोघांनी प्रत्यकेी 3-3 विकेट्स घेतल्या. तर आकाश मढवाल, हार्दिक पंड्या आणि श्रेयस गोपाळ या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. मुंबईला या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये मोठा फायदा झाला. मुंबई पॉइंट्स टेबलमध्ये कुठे पोहचलीय हे जाणून घेण्याआधी मुंबईच्या पहिल्या डावाबाबत जाणून घेऊयात.

मुंबईची बॅटिंग

त्याआधी पंजाबने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी बोलावलं. मुंबईने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 192 धावा केल्या. मुंबईकडून सूर्यकुमार यादव याने 53 बॉलमध्ये 78 धावा केल्या. रोहित शर्माने 25 बॉलमध्ये 36 धावांचं योगदान दिलं. तिलक वर्माने नॉट आऊट 34 रन्स केल्या. कॅप्टन हार्दिक पंड्या 10, टीम डेव्हिड 14, ईशान किशन 8 आणि रोमरिया शेफर्ड याने 1 धावेचं योगदान दिलं. तर पंजाबकडून हर्षल पटेल याने 3 विकेट्स घेतल्या. तर कगिसो रबाडाला 1 विकेट मिळाली.

मुंबई पॉइंट्स टेबलमध्ये कुठे?

मुंबईचा हा सातव्या सामन्यांमधील तिसरा विजय ठरला. तर पंजाबचा हा सातव्या सामन्यातील पाचला पराभव ठरला आहे. मुंबईने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानावरुन थेट सातव्या स्थानी झेप घेतली. मुंबईचा नेट रनरेट हा आधी -0.23 इतका होता तो विजयानंतर 0.133 असा झाला आहे. तर मुंबईच्या विजयामुळे गुजरात टायटन्सची सातव्या स्थानावरुन आठव्या स्थानी घसरण झाली आहे. तर पंजाब किंग्स आठव्या क्रमांकावरुन नवव्या स्थानी घसरली आहे.

मुंबई इंडियन्सची सातव्या स्थानी झेप

पंजाब किंग्स प्लेइंग ईलेव्हन : सॅम करन (कॅप्टन), रिली रोसो, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा आणि अर्शदीप सिंग.

मुंबई इंडियन्स प्लेईंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपाल आणि जसप्रीत बुमराह.