IPL 2024 : पहिल्या सामन्यापासून ऑरेंज कॅपची शर्यत सुरु, या खेळाडूची रेसमध्ये पहिली एन्ट्री

आयपीएल 2024 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सने 6 गडी राखून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा धुव्वा उडवला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 20 षटकात 6 गडी गमवून 173 धावा केल्या. विजयासाठी 174 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान चेन्नईने 4 गडी गमवून पूर्ण केलं. या सामन्यात चेन्नईने जरी विजय मिळवला असला तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या खेळाडूने लक्ष वेधून घेतलं.

IPL 2024 : पहिल्या सामन्यापासून ऑरेंज कॅपची शर्यत सुरु, या खेळाडूची रेसमध्ये पहिली एन्ट्री
IPL 2024 : पहिल्या सामन्यात हा खेळाडू ठरला ऑरेंज कॅपचा मानकरी, पाहा किती आणि कशा धावा केल्या ते
| Updated on: Mar 23, 2024 | 12:26 AM

ऑरेंज कॅप हा फलंदाजांसाठी एक मोठा मान असतो. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला हा मान मिळतो. ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या खेळाडूला रोख पारितोषिक आणि ट्रॉफी दिली जाते. स्पर्धेत या कॅपसाठी फलंदाजांमध्ये चुरस पाहायला मिळते. आज एकाकडे तर उद्या दुसऱ्याच्या डोक्यावर ही कॅप पाहायला मिळते. अखेर स्पर्धा संपल्यानंतर सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला अधिकृतपणे ही कॅप मॅच दिली जाते. ऑरेंज कॅपची शर्यत पहिल्या सामन्यापासूनच सुरु झाली आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना झाला. या सामन्यात बंगळुरुने 173 धावा करत 174 धावांचं विजयी लक्ष्य ठेवलं होतं. हे आव्हान चेन्नई सुपर किंग्सने 18.4 षटकात पूर्ण केलं. असं असलं तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या अनुज रावतने लक्ष वेधून घेतलं. पहिल्या सामन्यात अवघ्या 2 धावांनी अर्धशतक हुकलं पण त्याची खेळी त्याला पहिल्या सामन्यात टॉपला ठेवून गेली.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या अनुज रावतने 192 च्या स्ट्राईक रेटने 48 धावा केल्या. यात 4 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. त्या खालोखाल दिनेश कार्तिक आहे. त्याने नाबाद 38 धावांची खेळी केली. तर रचिन रविंद्र 37 धावांसह तिसऱ्या, फाफ डु प्लेसिस 35 धावांसह चौथ्या आणि शिवम दुबे 34 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. आता धावांची ही शर्यत प्रत्येक सामन्यानंतर रंगत जाणार आहे. त्यामुळे आज टॉपला असलेला खेळाडू उद्या दुसरीकडे असेल. त्यामुळे या स्पर्धेत कोणाचे स्टार चमकतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

प्लेयर्ससामनेस्ट्राईक रेटरन्स
विराट कोहली4140.97203
रियान पराग3160.17181
हेनरिक क्लासेन3219.73167
शुबमन गिल4159.22164
साई सुदर्शन4160128.00

डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक 3 वेळा ऑरेंज कॅप जिंकली आहे. 2015, 2017, 2019 साली या कॅपचा मानकरी ठरला आहे. तर वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलने ही कॅप दोनदा मिळवली आहे. 2011, 2012 मध्ये त्याने ही कॅप मिळवली आहे. तर शेन मार्शने (2008), मॅथ्यू हेडनने (2009), सचिन तेंडुलकरने (2010), माईक हसीने (2013), रॉबिन उथप्पाने (2014), विराट कोहलीने (2016), केन विल्यमसनने (2018), केएल राहुलने (2020), ऋतुराज गायकवाडने (2021), जोस बटलरने (2022) आणि शुबमन गिलने (2023) मध्ये ही कॅप मिळवली आहे.