
आयपीएल 2024 स्पर्धेतील पर्पल कॅपची शर्यत दिवसागणिक चुरशीची होत चालली आहे. टी20 क्रिकेट आणि आयपीएलमधील धावांचं अंतर गाठणं तसं सोपं आहे. मात्र विकेट्सच गणित सोडवणं वाटतं तितकं सोपं नाही. कारण प्रत्येक सामन्यात फलंदाज गोलंदाजांवर हावी होतात. क्वचितच कधी एखादा गोलंदाज चालला की संघाला फायदा होतो. त्यामुळे पर्पल कॅपची शर्यत खूपच महत्त्वाची ठरते. रविवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यानंतर पर्पल कॅपच्या टॉप 5 मध्ये बदल झाले आहेत. पंजाबचे दोन गोलंदाज आणि कोलकात्याच्या एका गोलंदाजाचा समावेश झाला आहे. पंजाबकडून हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग, तर कोलकात्याकडून वरुण चक्रवर्थी रेसमध्ये आला आहे. अर्शदीप सिंगने 4 षटकात 42 धावा देत 2 गडी बाद केले. तर हर्षल पटेलने 4 षटकात 24 धावा देत 3 गडी बाद केले. दुसरीकडे कोलकात्याच्या वरुण चक्रवर्तीने 3 षटकात 30 धावा देत 3 गडी बाद केले.
पर्पल कॅपच्या शर्यतीत मुंबई इंडियन्स वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आघाडीवर आहे. त्याने 11 सामन्यात 17 गडी बाद केले आहेत. त्याचा इकोनॉमी रेट हा 6.25 असल्याने पहिल्या स्थाावर आहे. हर्षल पटेलनेही 17 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र त्याचा इकोनॉमी रेट 9.78 इतका आहे. वरुण चक्रवर्ती चौथ्या स्थानावर असून त्याने 11 सामन्यात 16 गडी बाद केले आहेत. सनरायझर्स हैदराबादचा टी नटराजन 15 विकेटसह चौथ्या स्थानावर आहे. तर अर्शदीप सिंग 15 विकेटसह पाचव्या स्थानावर आहे. नटराजन आणि अर्शदीपमध्ये इकोनॉमी रेटचा फरक आहे.
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेअरस्टो, रिली रोसो, शशांक सिंग, सॅम करन (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, राहुल चहर, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग.
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): अजिंक्य रहाणे, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, रिचर्ड ग्लीसन, तुषार देशपांडे.