IPL Slapgate: ‘कानशि‍लात मारल्याप्रकरणातून हरभजनने कमावले 1 कोटी’, श्रीसंतने आरोप करत केलं ब्लॉक

आयपीएल 2026 स्पर्धा आता मध्यात आली आहे. प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेत उलथापालथ होत आहे. दुसरीकडे, आयपीएलमधील एक प्रकरण मात्र कायम चर्चेत आहे. पहिल्याच पर्वात यावरून मोठा वाद झाला होता. हरभजन सिंगने श्रीसंतच्या कानशि‍लात लगावली होती. अजूनही हे प्रकरण या ना त्या कारणाने चर्चेत आहे.

IPL Slapgate: कानशि‍लात मारल्याप्रकरणातून हरभजनने कमावले 1 कोटी, श्रीसंतने आरोप करत केलं ब्लॉक
IPL Slapgate: 'कानशि‍लात मारल्याप्रकरणातून हरभजनने कमावले 1 कोटी', श्रीसंतने आरोप करत केलं ब्लॉक
Image Credit source: Getty Images
| Updated on: Apr 25, 2026 | 3:48 PM

Sreesanth vs Harbhajan Singh Slap Contrversy: आयपीएलच्या प्रत्येक पर्वात लहानसहान गोष्टींवरून वाद होत असतात. त्या वादावरून त्या पर्वाची ओळख तयार होत असते. सध्या आयपीएल पर्वात फार मोठा वाद झालेला नाही. त्यामुळे चर्चा करण्यासाठी तसा काही विषय नाही. पण प्रत्येक वर्षी आयपीएल स्पर्धेत श्रीसंतच्या कानशि‍लात लगावल्याचं प्रकरण गाजत आहे. हरभजन सिंग आणि एस श्रीसंत यांच्यातील एक खळबळजनक पैलू समोर आला आहे. माजी क्रिकेटपटू एस श्रीसंतने हरभजन सिंगवर या प्रकरणी पैसे कमावल्याचा गंभीर आरोप केला आहे. आयपीएल 2008 म्हणजेच पहिल्याच पर्वात पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स सामन्यात कानशि‍लात मारल्याचं प्रकरण गाजलं होतं. पंजाब किंग्सने त्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभूत केलं होतं. पण जेव्हा श्रीसंत हरभजन सिंगला हात मिळवण्यासाठी गेला. तेव्हा पराभवामुळे संतापलेल्या हरभजनने त्याच्या कानशि‍लात लगावली.

आयपीएल स्पर्धेत हरभजन सिंगची ही कृती पाहून प्रत्येकाला आश्चर्याचा धक्का बसला होता. या कृतीसाठी हरभजन सिंगला संपूर्ण पर्वात खेळण्याची बंदी घातली होती. आता या प्रकरणाला 18 वर्षांचा काळ लोटला आहे. मात्र या ना त्या कारणाने पुन्हा एकदा चर्चा होत आहे. आता एक प्रकरण टीव्ही जाहिरातीबाबत आहे. या प्रकरणाचा उल्लेख आणि हरभजन सिंग या जाहिरातीचा बाग आहे. या जाहिरातीवरून श्रीसंतने हरभजन सिंगवर गंभीर आरोप केले आहेत.

एस श्रीसंतने एका मल्याळम वृत्तपत्राशी बोलताना श्रीशांत म्हणाला, “मी कोणत्याही मुलाखतीत भज्जीबद्दल काहीही बोललो नाही. ही पहिलीच वेळ आहे. अलीकडेपर्यंत काही अडचण नव्हती, पण त्याने त्यावर एक जाहिरात बनवली. त्याने त्यातून 80 लाख ते 1 कोटी रुपये कमावले. त्यानंतर त्याने मला फोन करून ते शेअर करण्यास सांगितले.” हरभजन सिंगच्या अशा वागण्यामुळे श्रीशांत संतापला आणि त्याने त्याच्याशी सर्व संबंध तोडले आहेत.

श्रीसंत म्हणाला की, “मी त्याला म्हणालो, ‘मी तुला माफ करेन, पण हे कधीही विसरणार नाही.’ जर कोणी तुमच्याशी वाईट वागले, तर तुम्ही त्यांना माफ केले पाहिजे पण कधीही विसरू नये, कारण जर तुम्ही विसरलात, तर ते पुन्हा तेच करतील. हरभजन याचे उत्तम उदाहरण आहे. त्या व्यक्तीशी माझे कोणतेही नाते नाही. मी त्याला भाऊ म्हणायचो, पण गेल्या 1-2 महिन्यांत त्याने ती जाहिरात केली आणि आता मी त्याला इन्स्टाग्रामवरही ब्लॉक केले आहे.”

Follow Us