AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DC vs PBKS: दिल्ली कॅपिटल्सने जिंकला नाणेफेकीचा कौल, कर्णधार अक्षर पटेल फलंदाजी घेत म्हणाला..

आयपीएल 2026 स्पर्धेतील 35वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने लागला. कर्णधार अक्षर पटेलने फलंदाजी स्वीकारण्याचं कारण सांगितलं.

DC vs PBKS: दिल्ली कॅपिटल्सने जिंकला नाणेफेकीचा कौल, कर्णधार अक्षर पटेल फलंदाजी घेत म्हणाला..
DC vs PBKS: दिल्ली कॅपिटल्सने जिंकला नाणेफेकीचा कौल, कर्णधार अक्षर पटेल फलंदाजी घेत म्हणाला.. Image Credit source: IPL Twitter
| Updated on: Apr 25, 2026 | 3:15 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स हे संघ आमनेसामने आले आहेत. या स्पर्धेत पंजाब किंग्सची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. तर दिल्ली कॅपिटल्स टॉप 4 मध्ये जागा मिळवण्यासाठी धडपड करत आहे. असं असताना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना होत आहे. हा सामना जिंकून पंजाब किंग्सला अव्वल स्थानी कायम राहण्याची संधी आहे. तर दिल्ली कॅपिटल्स हा सामना जिंकून टॉप 4 मध्ये येण्याच्या प्रयत्नात असेल. या सामन्यापूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा दिल्ली कॅपिटल्सच्या पारड्यात पडला. कर्णधार अक्षर पटेलने प्रथम फलंदाजीला प्राधान्य दिलं.

कर्णधार अक्षर पटेल म्हणाला की, ‘आम्ही प्रथम फलंदाजी करू. खूप उष्णता आहे, त्यामुळे आम्हाला एक चांगली धावसंख्या उभारून तिचा बचाव करायचा आहे. खेळपट्टी संथ होईल. सर्व संघ चांगला खेळत आहेत, आम्हीही चांगला खेळण्याचा प्रयत्न करत आहोत, पण आम्ही महत्त्वाचे क्षण जिंकू शकत नाही. आमच्याकडून छोट्या-छोट्या चुका होत आहेत. आम्हाला त्यावर काम करण्याची गरज आहे. संघात कोणताही बदल नाही.’

पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, ‘वर्तमानात राहणे महत्त्वाचे आहे. त्या सामन्यात खूप उष्णता होती. आपल्याला योग्य सवयी जपण्याची गरज आहे. आतापर्यंत सर्व काही उत्तम चालले आहे. मला गोलंदाजी करायला खूप आवडले असते. आम्ही त्याच संघासोबत खेळणार आहोत.’

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (विकेटकीपर), पथुम निसांका, समीर रिझवी, अक्षर पटेल (कर्णधार), नितीश राणा, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, कुलदीप यादव, टी नटराजन, मुकेश कुमार.

पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन) : प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), प्रियांश आर्य, कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, मार्को जॅनसेन, झेवियर बार्टलेट, विजयकुमार विषक, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल