
डब्लिन | आयर्लंड विरुद्ध टीम इंडियाने 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेतील पहिले 2 सामने जिंकले. टीम इंडियाने यासह आयर्लंड विरुद्ध मालिका विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. टीम इंडियाने 2018, 2022 नंतर आता 2023 मध्ये आयर्लंड विरुद्ध टी 20 मालिका जिंकली. टीम इंडियाने ही कामगिरी विराट कोहली, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह यांच्या नेतृत्वात ही कामगिरी केली. आता टीम इंडिया बुमराहच्या नेतृत्वात 3 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. तिसरा सामना हा 23 ऑगस्ट रोजी होणार आहे.
आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया आतापर्यंत एकूण 7 वेळा टी 20 क्रिकेटमध्ये आमनेसामने आले आहेत. या 7 सामन्यात टीम इंडियाच वरचढ राहिली आहे. टीम इंडियाने आयर्लंडला सातही सामन्यात पराभूत केलंय. त्यामुळे आकड्यांच्याबाबतीत टीम इंडियाच सरस आहे.
टीम इंडियाने मालिका जिंकली आहे. त्यामुळे तिसऱ्या टी 20 सामन्यासाठी कॅप्टन जसप्रीत बुमराह टीम इंडिया प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल करु शकतो. यामध्ये युवा खेळाडूंना संधी मिळू शकते. तसेच जितेश शर्मा याला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळू शकते. जितेश शर्मा हा महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्याचा आहे. तसेच जितेश हा विकेटकीपर बॅट्समन आहे.
त्यामुळे जितेश शर्मा याला प्लेईंग इलेव्हमध्ये संजू सॅमसन याच्या जागी संधी मिळू शकते. त्यामुळे आता खरंच जितेशला पदार्पणाची संधी मिळते, की त्याची प्रतिक्षा आणखी वाढते, हे येत्या काही तासात स्पष्ट होईल.
टी 20 सीरिजसाठी आयर्लंड क्रिकेट टीम | पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्रयू बालबर्नी, मार्क अडायर, रॉस अडायर, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, फिओन हँड, जोश लिटल, बॅरी मॅककार्थी, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, थिओ व्हॅन वोरकॉम, बेन व्हाइट आणि क्रेग यंग.
आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया | जस्प्रीत बुमराह (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग , मुकेश कुमार आणि आवेश खान.