7 महिन्यात बांधले 5 मजल्याचे हॉटेल, 6 सेंकदात जमीनदोस्त, समोर आला VIDEO
केवळ ७ महिन्यात बांधलेल्या एका पाच मजली हॉटेलच्या बेसमेंटमध्ये तडे गेल्याची घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिक प्रशासनाने ही इमारत पाडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अवघ्या काही सेकंदात ही इमारत कोसळली.

जयपुरातील मालवीय नगर, सेक्टर ९ मध्ये तयार होत असलेले पाच मजली हॉटेलच्या पायात खोदकाम सुरु असताना इमारतीला तडे गेले. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने धाव घेत अनधिकृतपणे बांधलेल्या या हॉटेलच्या इमारतीला नियंत्रित पद्धतीने स्फोट घडवत पाडले. या हॉटलच्या बेसमेंटमध्ये चुकीच्या पद्धतीने खोदकाम करताना तडे गेले होते. त्यामुळे इमारत एका बाजूला झुकली गेली होती. अखेर या हॉटेलच्या इमारतीला पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
जयपुरात एक मालवीय नगरातील सेक्टर ९ येथील एक मोठा अपघात टळला आहे. एक पाच मजली हॉटेलची इमारत झुकल्याचे निदर्शनास आल्याने जयपुर डेव्हलपमेंट अथॉरिटी (JDA)ने या हॉटेलच्या इमारतीला पाडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोठा बंदोबस्त करीत अत्यंत नियंत्रितपणे ही इमारत पाडण्यात आली. केवळ पाच सेकंदात ही इमारत पत्त्यासारखी कोसळली.
या इमारतीत जसे तडे पडले, तसे हे हॉटेल झुकून लागल्याने सर्व मजूर काम सोडून सुरक्षित जागी पळाले. आस-पासच्या लोकांनी लागलीच पोलिस आणि प्रशासनाला कळवले. त्यानंतर अधिकारी घटनास्थळी पोहचले. आणि सुरक्षा म्हणून संपूर्ण भागाला रिकामे करण्यात आले.
समोर आला भयंकर व्हिडीओ
तोडफोड करण्याच्या तयारीसाठी दोन क्रेन लावण्यात आले. परंतू वाढता धोका पाहून जयपुर डेव्हलपमेंट अथॉरिटी (JDA)ने संपूर्ण इमारतच पाडण्याचा निर्णय घेतला. जेसीबी मशीनच्या सहाय्याने इमारतीच्या खालच्या स्ट्रक्चरला कमजोर करण्यात आले. आणि हॉटेलला काही सेंकदात पाडण्यात आले. याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे.
हॉटेल मालकाने केला विरोध
हॉटेल मालक घटनास्थळी पोहचला आणि त्याने जेडीएच्या कारवाईचा विरोध केला. त्याने सांगितले की त्याने नगर महामंडळाची परवानगी घेतली होती. आणि १.२ लाख रुपये जमा केले होते. तरीही हॉटेल बेकायदेशीर ठरवून पाडण्यात आल्याचे त्याने म्हटले आहे.
येथे पाहा व्हिडीओ –
VIDEO | Jaipur: Administration demolishes weak under-construction building in Malviya Nagar area. pic.twitter.com/5LdOW6Ax0m
— Press Trust of India (@PTI_News) December 7, 2025
कारवाईवर तहसीलदार काय म्हणाले. ?
जयपुर डेव्हलपमेंट अथॉरिटी (JDA) झोन – एकचे तहसीलदार शिवांग शर्मा यांनी सांगितले की हॉटेल निवासी भागात बांधले जात होते. जे कमर्शियली एक्टीव्हीटी नियमांचे उल्लंघन होते. तसेच बेसमेंटचे खोदकाम चुकीच्या पद्धतीने केले जात होते. याची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. हॉटेलची निर्मिती ९० यार्डाच्या प्लॉटवर वेगाने केली जात होते.
केवळ सात महिन्यात पाच मजल्याची बिल्डींग बांधून झाली होती. आणि बाहेरील कामही लगभग पूर्ण झाले होते. परंतू बेसमेंटमध्ये फटी आणि तडे गेल्याने इमारत झुकल्याने धोका वाढला. प्रशासनाने इमारतीला नियंत्रित पद्धतीने पाडून संभाव्य अपघात टाळला आहे. कारवाईल येथील रहिवासी आणि प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
