AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुगल मॅप्सने मृत्यूच्या दरवाजापाशी पोहचला, समोर दृश्य पाहून बसला हादरा, Viral Video

एका तरुणाचा एक व्हिडीओ अलिकडेच व्हायरल झाला आहे. ज्यात तो बाईकवरुन गुगल मॅप्सच्या आधारे डोंगरावर पोहचतो. शेवटी त्याच्यासोबत असे घडते की ज्याची कल्पनाही कधी केली जाऊ शकत नाही. हा व्हिडीओ इंस्टावर शेअर केलेला आहे.

गुगल मॅप्सने मृत्यूच्या दरवाजापाशी पोहचला, समोर दृश्य पाहून बसला हादरा, Viral Video
Viral Video
| Updated on: Nov 29, 2025 | 7:05 PM
Share

एक असाही काळ होता जेव्हा लोकांकडे न मोबाईल होत न कोणताही डिजिटल नकाशा. प्रवासात लोक दुकानदाराला, पादचाऱ्याला वा कोणा ऑटो चालकाला विचारुन रस्ता शोधायचे. अनेकदा दोन पावले पुढे जाण्याआधी पुन्हा कोणाला तरी दिशा विचारायचे. आजही लोक ही पद्धत वापरतात. परंतू स्मार्टफोन आल्याने हा त्रास काही प्रमाणात कमी झाला. मोबाईलमधील गुगल मॅप्सने लोकांचा पत्ता शोधण्याचा त्रास वाचला.आता तर लोक कोणत्याही नव्या ठिकाणी जाण्याआधी गुगल्स मॅप खोलतात आणि आपला प्रवास सुरु करतात.

परंतू अनेकदा तंत्रज्ञान जितकी मदत करते, तेवढेच कधी कधी त्रासदायक असते. गुगल मॅप्सने पत्ता शोधून अनेक लोक थेट नदीत आणि समुद्रात घुसलेले आहेत. अनेक गुगलने पत्ता शोधणे हे जीवावर देखील बेतले गेले आहे. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांना हसुही येत आहे आणि भीतीही वाटत आहे.

मृत्यूच्या तोंडी पोहचल्यानंतरचा नजारा

या व्हिडीओत एक व्यक्ती डोंगराच्या एकदम कडेवर बाईक घेऊन उभा आहे. त्याच्या बाईकला मोबाईल फोन लावलेला आहे आणि स्क्रीनवर गुगल मॅप्स त्याला पुढचा रस्ता दाखवत आहे.समस्या ही आहे की मॅप्स ज्या दिशेला जाण्याचा इशारा करत आहे, तेथे कोणताही रस्ता नाही. त्याच्यासमोर खोर दरी दिसत आहे.हे पाहून स्पष्ट दिसतंय की पाऊल पुढे जाणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे आहे. व्हिडीओ पाहणारे पहिल्या नजरेत विचार करतात एक इंच जरी हा पुढे गेला तर परिणाम खूपच खतरनाक होऊ शकतात. त्यामुळे या व्हिडीओकडे लोकांचे लक्ष गेले आहे.

काही युजरच्या मते हा कदाचित हा व्हिडीओ एक मस्करीचा भाग देखील असू शकतो. आणि केवळ मनोरंजनसाठी शूट केलेला असू शकतो. सोशल मीडियावर अशा कंटेन्टचा पूर असतो. जेथे लोक युजरना धक्का बसण्यासाठी अशा प्रकारच्या स्टोरी करतात. परंतू या संपूर्ण प्रकरणात एक गोष्ट समोर येते की गुगल मॅप्स काही वेळा भ्रमित करतो. मग नेटवर्कचा प्रॉब्लेम असो की चुकीचा लोकेशन डाटा. मॅप्समध्ये अनेक वेळा दर्शवलेला मार्ग वापरकर्त्याला अडचणीत आणू शकतो.

येथे पाहा पोस्ट –

मग मॅप्स किती भरोसेमंद का असेना, रस्त्यावर नीट पाहून चालणे आणि आजबाजूच्या स्थितीला समजून सावधानतेने पावले टाकणेच नेहमी योग्य असते. प्रत्येक रस्ता हा केवल स्क्रीनवर पाहून निश्चित करणे धोकादायक असते. या व्हिडीओ युजरच्या प्रतिक्रीयाही भन्नाट आलेल्या आहेत. यावरुन लोकांना यात खूपच इंटरेस्ट असल्याचे हे दर्शवते. लोक हा व्हिडीओ पाहून स्वत:चे मनोरंजन करत आहेत. तसेच टेक्नॉलॉजीचा वापर करताना सावधान देखील राहणे गरजेचे असल्याचे म्हणत आहे.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.