IND vs IRE 3rd T20 Weather Report | तिसऱ्या सामन्यात पावसाचं विघ्न? जाणून घ्या

IND vs IRE 3rd T20 Weather Forecast Report | आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसऱ्या टी 20 सामन्यात पाऊस येणार? जाणून घ्या.

IND vs IRE 3rd T20 Weather Report | तिसऱ्या सामन्यात पावसाचं विघ्न? जाणून घ्या
| Updated on: Aug 22, 2023 | 11:36 PM

डब्लिन | टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध बुधवारी 23 ऑगस्ट रोजी क्लिन स्वीप करण्याच्या हेतून मैदानात उतरेल. जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वात टीम इंडियाने आयर्लंडवर विजय मिळवला. टीम इंडियाने सलग 2 विजयांसह मालिकाही जिंकली. आता टीम इंडियाचं ध्येय हे आयर्लंडचा 3-0 ने पराभव करण्याचा हेतू असणार आहे. मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना हा डब्लिन येथील द व्हिलेज इथेच खेळवण्यात येणार आहे. मालिकेतील पहिले 2 सामने या स्टेडियममध्येच खेळवण्यात आले होते.

सलामी जोडीचा अपवाद वगळता पहिल्या सामन्यात पावसामुळे टीम इंडियाच्या फलंदाजांना बॅटिंगची संधीच मिळाली नाही. तर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने टीम इंडियाने 185 धावा केल्या. त्यामुळे खेळपट्टी फलंदाजांसाठी पूरक असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे तिसऱ्या टी 20 सामन्यातही अशीच फटकेबाजी क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळू शकते.

हवामान कसं असेल?

मालिकेतील पहिल्याच सामन्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार टीम इंडियाचा 2 धावांनी विजय झाला. दुसऱ्या सामन्यात पाऊस झाला नाही, मात्र ढग दाटून आले होते. आता तिसऱ्या सामन्यात पाऊस होणार की नाही, हे आपण जाणून घेऊयात.

met office gov या वेबसाईटनुसार, बुधवारी 23 ऑगस्ट रोजी डब्लिनमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. आयर्लंडमध्ये सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. तर संध्याकाळी 5-6 दरम्यान पाऊस होण्याची 50 टक्के शक्यता आहे. त्यामुळे दुसऱ्या डावात पावसामुळे ‘गेम’ होऊ शकतो.

टी 20 सीरिजसाठी आयर्लंड क्रिकेट टीम | पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्रयू बालबर्नी, मार्क अडायर, रॉस अडायर, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, फिओन हँड, जोश लिटल, बॅरी मॅककार्थी, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, थिओ व्हॅन वोरकॉम, बेन व्हाइट आणि क्रेग यंग.

आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया | जस्प्रीत बुमराह (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग , मुकेश कुमार आणि आवेश खान.