IND vs IRE 3rd T20I | आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया तिसरा सामना, कधी, कुठे आणि केव्हा पाहता येणार?
ireland vs india 3rd t20i live streaming | टीम इंडिया आयर्लंड विरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे.

डब्लिन | जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वात टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध टी 20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळणार आहे. हा सामना डब्लिनमधील द व्हिलेज मैदानात पार पडणार आहे. टीम इंडिया या मालिकेत आधीच 2-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडचं लक्ष हे आयर्लंडचा सूपडा साफ करण्याकडे असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला आयर्लंडचं लक्ष हे विजयासह मालिकेचा शेवट गोड करण्याचा असेल. त्यामुळे तिसऱ्या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. या तिसऱ्या सामन्याबाबत आपण जाणून घेऊयात.
आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसरा टी 20 सामना केव्हा होणार?
आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसरा आणि अंतिम सामना हा बुधवारी 23 ऑगस्ट रोजी खेळवण्यात येणार आहे.
आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसरा सामना कुठे खेळवण्यात येणार?
आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया तिसरा टी 20 सामना डबलिनमधील द व्हिलेज स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया तिसरा टी 20 सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया तिसऱ्या आणि अंतिम टी 20 सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.
आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया तिसरा सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार?
आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसरा सामना हा टीव्हीवर स्पोर्ट्स 18 वर पाहता येईल.
आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया तिसरी मॅच मोबाईल आणि लॅपटॉपवर पाहता येईल का?
आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया तिसरी टी 20 मॅच मोबाईल आणि लॅपटॉपवर जिओ सिनेमा एपच्या माध्यामातून पाहता येईल.
टी 20 सीरिजसाठी आयर्लंड क्रिकेट टीम | पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्रयू बालबर्नी, मार्क अडायर, रॉस अडायर, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, फिओन हँड, जोश लिटल, बॅरी मॅककार्थी, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, थिओ व्हॅन वोरकॉम, बेन व्हाइट आणि क्रेग यंग.
आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया | जस्प्रीत बुमराह (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग , मुकेश कुमार आणि आवेश खान.
