AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कामाला लागा…, शिंदेंच्या बैठकीत नेत्यांना सूचना, आगामी निवडणुकांबाबत मोठा निर्णय

आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटाची महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी नेत्यांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत, तसंच त्यांचं अभिनंदन देखील केलं आहे.

कामाला लागा..., शिंदेंच्या बैठकीत नेत्यांना सूचना, आगामी निवडणुकांबाबत मोठा निर्णय
एकनाथ शिंदे Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Dec 08, 2025 | 9:51 PM
Share

आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेची महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीला सर्व प्रमुख शिवसेना नेत्यांची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये   नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीवर चर्चा करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.  पुढचे दोन महिने निवडणुका आहेत, काळजी घ्यावी लागेल, रोज अधिवेशनात हजेरी लावा, शिवसैनिकांना फोडण्याचा प्रयत्न हाणून पाडा अशा सूचना या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेत्यांना दिल्या आहेत, तर दुसरीकडे या बैठकीमध्ये नेत्याचा काहीसा नाराजीचा सूर देखील दिसून आला. कार्यकर्त्यांना सांभाळा त्यांची कामे होत नाहीत, अशी नाराजी या बैठकीमध्ये नेत्यांनी व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे.

नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटाची महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीमध्ये नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनापासून ते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. पुढचे दोन महिने निवडणुका आहेत, काळजी घ्यावी लागेल, रोज अधिवेशनात हजेरी लावा, शिवसैनिकांना फोडण्याचा प्रयत्न हाणून पाडा अशा सूचना या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेत्यांना दिल्या आहेत.

दरम्यान पुढे बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, 186 नगराध्यक्षपदाच्या आणि 4000 नगरसेवक पदाच्या जागा शिवसेना लढली, धनुष्यबाण गावागावात पोहचवण्यात यश मिळालं. आजवर शिवसेनेने कधीच एवढ्या जागा लढल्या नव्हत्या. तुम्हा सर्वांचा अभिमान आहे. या निवडणुकीत चांगलं वातावरण होतं. आपण चांगली लढत दिली. निकालही चांगला लागेल, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी यावेळी शिवसेना नेत्यांचं कौतुक केलं आहे. दरम्यान पालिका  झेडपीच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढणार आणि जिंकणार आहोत.  युती धर्माचं पालन करा. कुठेही वादग्रस्त वक्तव्य नको. संघर्ष होईल अशी आपली वर्तणूक नको. नगरपालिका निवडणूकांमध्ये काही वाद झाला असेल तो विषय आता संपला आहे. झालं गेलं विसरून पुन्हा नव्या दमाने कामाला लागायचं आहे, अशा सूचना या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

अजित पवारांच्या मृत्यूवर संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
अजित पवारांच्या मृत्यूवर संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
अजित पवार यांचा मृत्यू; हसन मुश्रीफ धाय मोकलून रडले!
अजित पवार यांचा मृत्यू; हसन मुश्रीफ धाय मोकलून रडले!.
अजित पवारांचा हादरवणारा शेवट! अपघातानंतरचे भीषण व्हिडीओ आले समोर
अजित पवारांचा हादरवणारा शेवट! अपघातानंतरचे भीषण व्हिडीओ आले समोर.
भीषण विमान अपघातात अजित पवारांचा चटका लावणारा मृत्यू
भीषण विमान अपघातात अजित पवारांचा चटका लावणारा मृत्यू.
मोठी दुर्घटना! महाराष्ट्र हादरला; विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू
मोठी दुर्घटना! महाराष्ट्र हादरला; विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू.
लॅंडींगदरम्यान बिघाड, धुराचे लोट अन्..; अपघातात अजित पवार गंभीर जखमी
लॅंडींगदरम्यान बिघाड, धुराचे लोट अन्..; अपघातात अजित पवार गंभीर जखमी.
अजित पवारांच्या विमानाचा अपघात; बारामतीत लॅंडींगदरम्यान घडली दुर्घटना
अजित पवारांच्या विमानाचा अपघात; बारामतीत लॅंडींगदरम्यान घडली दुर्घटना.
अंजली भारतींना वादग्रस्त वक्तव्य भोवलं महिला आयोगाने घेतला मोठा निर्णय
अंजली भारतींना वादग्रस्त वक्तव्य भोवलं महिला आयोगाने घेतला मोठा निर्णय.
पद्मभूषण : विरोधकांची कोश्यारींवर टीका, पण मुख्यमंत्र्यांचे समर्थन...
पद्मभूषण : विरोधकांची कोश्यारींवर टीका, पण मुख्यमंत्र्यांचे समर्थन....
समृद्धी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश
समृद्धी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश.