AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता फडणवीसांचे आणि माझे फोटो इन्स्टाग्रामवर टाकतो अन्…, नाराजीच्या चर्चेवर एकनाथ शिंदेंचं थेट उत्तर

उद्यापासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे, या पार्श्वभूमीवर आज महायुतीची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये नाराजीच्या चर्चेवर उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी मिश्किल उत्तर दिलं आहे.

आता फडणवीसांचे आणि माझे फोटो इन्स्टाग्रामवर टाकतो अन्..., नाराजीच्या चर्चेवर एकनाथ शिंदेंचं थेट उत्तर
एकनाथ शिंदे Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 07, 2025 | 7:51 PM
Share

उद्यापासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. हे अधिवेशन चांगलंच वादळी ठरू शकतं. राज्यातील विविध प्रश्न उपस्थित करून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांची कोंडी केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज महायुतीची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती. सध्या शिवसेना शिंदे गट महायुतीमध्ये नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. याबाबत या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला, या प्रश्नाला एकनाथ शिंदे यांनी मिश्किल उत्तर दिलं आहे.  अशी चर्चा सुरू आहे, तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलत नाही, तुम्ही मुख्यमंत्र्यांशी अबोला धरला आहे, असा प्रश्न यावेळी एकनाथ शिंदे यांना करण्यात आला होता.

नेमकं काय म्हणाले शिंदे? 

या प्रश्नाला एकनाथ शिंदे यांनी मिश्किल उत्तर दिलं आहे. आता आम्ही काय करतो, रोज एकमेकांना फोन करतोना त्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला पाठवतो. नाहीतर रोज मुख्यमंत्र्यांसोबतचे फोटो आता इन्स्टाग्रामवर टाकतो. नाहीतर आता आपण हस्यजत्रेला जावू यात असं त्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बघून म्हटलं आहे. दरम्यान सध्या विरोधकांकडून विरोधी पक्षनेतेपदाची मगणी जोर धरत आहे, यावर बोलताना शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

लोकांचे प्रश्न मांडा हीच विरोधकांना विनंती आहे, विरोधी पक्षनेतेपद नसेल तर उपमुख्यमंत्रिपद रद्द करा बोलतात. तुमच्या काळात उपमुख्यमंत्रिपद घटनाबाह्य होतं का? असा थेट सवालच एकाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना केला आहे. सारखं जळजळ आणि मळमळ नको. लोकांचे प्रश्न राहिले बाजूला, विरोधी पक्षनेतेपदावर सवाल करत आहेत, आधी संख्या कमवा आणि मग विरोधी पक्षनेतेपद मागा. विरोधी पक्ष संख्येनं कमी असला तरी त्यांना आम्ही गांभीर्यानं घेऊ, विरोधक सभागृहाबाहेर आंदोलन करण्यात आनंद मानतात. पायऱ्यांवरच स्टट करण्यात धन्यता मानतात, असं टीका यावेळी शिंदे यांनी केली आहे.

Follow Us
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर