IRE vs NZ : न्यूझीलंडच्या फिरकीपटूचा विक्रम, पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक घेणारा Michael Bracewell पहिला गोलंदाज, पाहा VIDEO

| Updated on: Jul 21, 2022 | 7:58 AM

आयर्लंडच्या डावाच्या 14व्या षटकात मायकेल ब्रेसवेलनं तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर विकेट घेत हॅट्ट्रिक केली. या हॅट्ट्रिकसह आयर्लंडचा खेळ संपला आणि नवा इतिहास रचला गेला. जाणून घ्या..

IRE vs NZ : न्यूझीलंडच्या फिरकीपटूचा विक्रम, पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक घेणारा Michael Bracewell पहिला गोलंदाज, पाहा VIDEO
Michael Bracewell
Image Credit source: social
Follow us on

नवी दिल्ली : टी-20 (T20I) मध्ये अनेक गोलंदाजांनी हॅट्ट्रिक घेतली, पण मायकेल ब्रेसवेलच्या (Michael Bracewell) हॅट्ट्रिकची बाबच वेगळी आहे. ही सर्वात अनोखी हॅट्ट्रिक आहे. अशी हॅट्ट्रिक घेणारा ब्रेसवेल हा पहिलाच गोलंदाज आहे. यामुळे क्रीडाप्रेमी देखील ब्रेसवेलवर चांगलेच खुश झाले आहेत. अनेकांनी त्याचा व्हिडीओ देखील व्हायरल केलाय. पण, त्याआधी ब्रेसवेलची हॅट्ट्रिक कधी आणि कुठे झाली हे जाणून घ्यायला हवं. त्यानं हा पराक्रम आयर्लंडविरुद्ध (IRE vs NZ) खेळल्या गेलेल्या दुसऱ्या T20 सामन्यात केला आहे. आयर्लंडच्या डावातील 14व्या षटकात त्यानं तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर विकेट घेत आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली. या हॅट्ट्रिकसह आयर्लंडचा खेळ संपला आणि नवा इतिहास रचला गेला आहे. यानंतर ब्रेसवेलनेही न्यूझीलंडसाठी मालिकेवर शिक्कामोर्तब केला आहे.

मायकेल ब्रेसवेलने इतिहासात आपलं नाव नोंदवलं आहे. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. न्यूझीलंडचा ऑफस्पिनर ब्रेसवेलनं आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या T20 मध्ये ही कामगिरी केली. ब्रेसवेलनं कारकिर्दीतील दुसरा टी-20 खेळताना 5 चेंडूत 3 बळी घेत न्यूझीलंडला 88 धावांनी मोठा विजय मिळवून दिला. या सामन्यात प्रथम खेळताना न्यूझीलंडनं 4 गडी गमावत 179 धावा केल्या. प्रत्युत्तरात यजमान आयर्लंडचा संघ 13.5 षटकांत 91 धावांत गारद झाला. अशाप्रकारे किवी संघाने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.

हे सुद्धा वाचा

हा व्हिडीओ पाहा

31 वर्षीय मिचेल ब्रेसवेल त्याच्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील दुसरा सामना खेळत होता. पहिल्या सामन्यात त्याला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. तो गोलंदाजीला आला तेव्हा आयर्लंडची धावसंख्या 7 बाद 86 अशी होती. मॅगार्थीने पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारला आणि दुसऱ्या चेंडूवर धाव घेतली. तिसऱ्या चेंडूवर डीप मिडविकेटवर मार्क एडेअरला फिलिपने झेलबाद केले. पुढच्याच चेंडूवर मगार्थीनेही फिलिपच्या हातात झेल घेतला.

हॅट्ट्रिक घेणारा तिसरा गोलंदाज

ब्रेसवेलला आता हॅट्ट्रिक घेण्याची संधी होती. 5व्या चेंडूवर क्रेग यंगने शॉट खेळला आणि त्याला बॅकवर्ड पॉइंटवर ईश सोधीने झेलबाद केले. अशा प्रकारे हॅट्ट्रिक पूर्ण झाली. T20I मध्ये हॅट्ट्रिक घेणारा ब्रेसवेल हा न्यूझीलंडचा तिसरा गोलंदाज आहे. याआधी जेकब ओरम आणि टीम साऊदी यांनी हा पराक्रम केला आहे. तत्पूर्वी, डेन क्लीव्हरने नाबाद 78 धावा करत न्यूझीलंडची धावसंख्या 180 धावांच्या जवळ नेली. त्याने 55 चेंडूंचा सामना केला. 5 चौकार आणि 4 षटकार मारले. याशिवाय फिन ऍलननेही 20 चेंडूत 35 धावा केल्या.

प्रत्युत्तरात आयर्लंडची धावसंख्या एका वेळी बिनबाद 23 धावा होती, पण पुढच्या 22 धावांत संघाने 5 विकेट गमावल्या. अशा प्रकारे स्कोअर 5 विकेटवर 45 धावा झाला. मार्क एडेअरने सर्वाधिक 27 धावा केल्या. लेगस्पिनर ईश सोधीनेही 3 बळी घेतले. याशिवाय जेकब डफीनेही २ बळी घेतले. या मालिकेतील अंतिम सामना 22 जुलै रोजी होणार आहे. याआधी न्यूझीलंडने एकदिवसीय मालिकाही ३-० अशी जिंकली होती.