IND vs ENG : याला म्हणतात नशीब! 2 नो बॉलवर दोन मोठ्या विकेट, पंचानेही दिली साथ, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

| Updated on: Jul 02, 2022 | 9:16 PM

IND vs ENG : जसप्रीत बुमराहनं आतापर्यंत इंग्लंडच्या फलंदाजांवर आपली पकड घट्ट केली आहे. लीस आणि पोप यांच्याशिवाय त्यानं जॅक क्रॉऊलीलाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. बुमराहनं आतापर्यंत टाकलेल्या 7 षटकांमध्ये 30 धावा देऊन तीन बळी घेतले आहेत. यादरम्यान त्यानं 4 नो बॉल टाकले.

IND vs ENG : याला म्हणतात नशीब! 2 नो बॉलवर दोन मोठ्या विकेट, पंचानेही दिली साथ, जाणून घ्या नेमकं काय घडलं?
Jasprit Bumrah
Image Credit source: social
Follow us on

नवी दिल्ली : इंग्लंडच्या (IND vs ENG) बर्मिंगहॅममध्ये इंग्लंड विरुद्ध कसोटा सामन्यात बुमराह (Jasprit Bumrah) चांगलाच फॉर्ममध्ये दिसतोय. आधी विश्वविक्रम (World Record) केला. आता त्याला त्याच्या नशीबाचीही साथ मिळत असल्याची चर्चा आहे. तुम्ही म्हणाल नेमकं काय म्हणायचं तर मग चला आम्ही तुम्हाला मैदानात नेमकं काय झालं ते सांगतो. जेव्हा जेव्हा गोलंदाज नो बॉल टाकतो तेव्हा तो नक्कीच निराश होतो. कधी-कधी नशीब खराब असेल तर नो बॉलवर गोलंदाजाला विकेट मिळतो. त्यामुळे संघाला खूप त्रास सहन करावा लागतो. जसप्रीत बुमराहला हे चांगलंच माहीत आहे. 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये फखर जमानविरुद्ध नो बॉल झाला होता. त्यामुळे टीम इंडियाला अंतिम सामना गमवावा लागला होता. पण एजबॅस्टन येथे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात केवळ नो बॉलनं बुमराहचं नशीब उजळलंय. या चुकीमुळे त्याला एक नाही तर दोन विकेट मिळाल्या आणि त्याचा भारतीय संघाला खूप फायदा झाला. आधीच विश्वविक्रम केला आणि त्यानंतर दोन विकेट घेतल्यानं सध्या बुमराह भाऊ चांगलेच चर्चेत आले आहेत.

डावाच्या तिसऱ्या षटकात जसप्रीत बुमराहनं लीसला क्लीन बोल्ड करून भारताला पहिलं यश मिळवून दिलं. जसप्रीत बुमराहनं ओव्हरचा शेवटचा चेंडू नो बॉल टाकला. जेव्हा गोलंदाज नो बॉल टाकतो तेव्हा फलंदाज आनंदी असतो. पण बुमराहच्या या नो बॉलनं अॅलेक्स लीसला आनंद होणार नव्हता, हे त्याला माहितही नसावं. खरं तर, त्या चेंडूवर क्रॉलीनं स्ट्रायकर लीसला धाव दिली होती आणि पुढच्या अतिरिक्त चेंडूवर बुमराहनं लीसला क्लीन बोल्ड करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

हे सुद्धा वाचा

आसीसीचं ट्विट

ओली पोपविरुद्धही बुमराहचं नशीब जोरात

लीसप्रमाणेच बुमराहनेही नो बॉलच्या पुढच्या चेंडूवर ऑली पोपला बाद केलं. 11 वं षटक आणणारा बुमराह त्याच्या षटकातून 1 धाव घेणार होता. तेव्हा अंपायरनं त्याला शेवटचा चेंडू नो बॉल टाकल्याचं सांगितलं. नो बॉलमुळे, बुमराह एक अतिरिक्त चेंडू टाकण्यासाठी परत आला आणि त्यानं या चेंडूवर स्लिपमध्ये ऑली पोपला बाद केलं. पोपची विकेट घेतल्यानंतर जसप्रीत बुमराहची प्रतिक्रियाही पाहण्यासारखी होती.

जसप्रीत बुमराहनं आतापर्यंत इंग्लंडच्या फलंदाजांवर आपली पकड घट्ट केली आहे. लीज आणि पोप यांच्याशिवाय त्यानं जॅक क्रॉलीलाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. बुमराहनं आतापर्यंत टाकलेल्या 7 षटकांमध्ये 30 धावा देऊन तीन बळी घेतले आहेत. यादरम्यान त्यानं 4 नो बॉल टाकले.