
रणजी ट्रॉफी 2025-26 स्पर्धेचा अंतिम सामना कर्नाटक आणि जम्मू काश्मीर यांच्यात सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जम्मू काश्मीरच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरला असंच चौथ्या दिवसानंतर म्हणावं लागेल. कारण या सामन्यावर पूर्णपणे पकड ही जम्मू काश्मीर संघाने मिळवली आहे. जम्मू काश्मीरने प्रथम फलंदाीज करताना सर्व गडी गमवून 584 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना कर्नाटकच्या दिग्गज फलंदाजांनी नांगी टाकली. त्यामुळे सर्व गडा गमवून 293 धावांपर्यंत पोहोचले. यामुळे पहिल्या डावात जम्मू काश्मीरला 291 धावांची आघाडी मिळाली. या धावांच्या पुढे खेळताना जम्मू काश्मीरने चौथ्या दिवशी 4 विकेट गमवून 186 धावा केल्या. तसेच चौथ्या दिवसअखेर 477 धावा झाल्या आहेत. पाचव्या दिवशीच्या पहिल्या सत्रात जम्मू काश्मीर खेळला तर या सामन्यात जम्मू काश्मीरचा विजय पक्का होईल. कारण पहिल्या डावात जम्मू काश्मीरकडे आघाडी आहे. या आघाडीच्या जोरावर जम्मू काश्मीरला विजयी घोषित केलं जाईल.
दुसऱ्या डावात जम्मू काश्मीरची सुरूवात काही चांगली झाली नाही. संघाच्या 6 धावा असताना यावेर हस्सन 1 धाव करून तंबूत परतला. त्यानंतर पहिल्या डावात शतकी खेळी करणारा शुभम पुंडीर अवघ्या 4 धावांवर तंबूत परतला. पारस डोगरा 16 आणि अब्दुल समद 32 धावा करून बाद झाले. पण कामरान इकबालने एका बाजूने खिंड लढवणं सुरूच ठेवलं. त्यामुळे कर्नाटकचा पूर्णपणे बॅकफूटवर गेला.
𝙄.𝘾.𝙔.𝙈.𝙄
Auqib Nabi ripped through the Karnataka lineup in the Final to claim 5/54 👊
His 7️⃣th five-wicket haul in a monumental campaign.#RanjiTrophy | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/L5m1CORASX
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 27, 2026
जम्मू काश्मीरचा संघ पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. तसेच इतिहास रचण्याची संधी देखील चालून आली आहे. पाचव्या दिवशी जम्मू काश्मीर जेतेपद मिळवेल अशीच स्थिती आहे. त्यामुळे या विजयानंतर इतिहासात नोंद होईल. जम्मू काश्मीर एलिट डी गटात होता. या गटात दिल्ली, मुंबईसारखे दिग्गज संघ होते. असं असूनही या गटात टॉप 2 मध्ये स्थान मिळवण्यात जम्मू काश्मीरला यश आलं. उपांत्यपूर्व फेरीत जम्मू काश्मीरचा सामना मध्य प्रदेशशी झाला. या सामन्यात जम्मू काश्मीरने 56 धावांनी विजय मिळवला. तर उपांत्य फेरीत बंगालला 6 विकेट्स राखून पराभूत केलं.