Jasprit Bumrah World Record : बुमराहचा विश्वविक्रम, द्रविड आणि कोहलीचं खास सेलिब्रेशन, पाहा जबरदस्त VIDEO

| Updated on: Jul 02, 2022 | 8:32 PM

IND vs ENG 5th Test Match Day 2 : वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात बुमराहनं 35 धावा केल्या. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हे सर्वात महागडं षटक ठरलं. यापूर्वी ब्रायन लाराने 2002 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या आर पीटरसनविरुद्धच्या षटकात 28 धावा केल्या होत्या. दरम्यान, बुमराहच्या कामगिरीनंतर सचिन तेंडुलकर, रवी शास्त्री यांनी कौतुक केलं.

Jasprit Bumrah World Record : बुमराहचा विश्वविक्रम, द्रविड आणि कोहलीचं खास सेलिब्रेशन, पाहा जबरदस्त VIDEO
बुमराहच्या कामगिरीचं विराटकडून खास सेलिब्रेशन
Image Credit source: social
Follow us on

नवी दिल्ली : इंग्लंडच्या बर्मिंगहॅममध्ये इंग्लंड विरुद्ध कसोटा सामन्यात भारतीय खेळाडू बहारदार कामगिरी करताना दिसतायत. आधी पंत आणि जडेजानं (Ravindra Jadeja) शतक ठोकलं. त्यानंतर जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) आक्रमक फलंदाजी करत टीम इंडियाला कसोटीत मजबूत स्थितीत आणलं. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या दिवशी (IND vs ENG) संघ पहिल्या डावात 416 धावांवर बाद झाला. बुमराहनं 16 चेंडूत 31 धावा केल्या. 4 चौकार आणि 2 षटकार मारले. यादरम्यान त्याने स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात 35 धावा केल्या. हा त्याचा विश्वविक्रम ठरला. कसोटी क्रिकेटच्या 145 वर्षांच्या इतिहासातील हे सर्वात महागडं षटक असल्याचं बोललं जातंय. बुमराहनं 4 चौकार आणि 2 षटकार मारलेत. यानंतर गोलंदाजी करताना कर्णधार बुमराहने लीस आणि जॅक क्रॉलीचे बळी घेत संघाला मोठं यश मिळवून दिलं. पावसामुळे खेळ थांबेपर्यंत इंग्लंडनं 2 बाद 31 धावा केल्या आहेत. दरम्यान, बुमराहच्या कामगिरीनंतर सचिन तेंडुलकर, रवी शास्त्री यांनी कौतुक केलं असून आता त्यामध्ये आणखी दोन दिग्गज खेळाडूंची भर पडली आहे. चला जाणून घेऊया…

जसप्रीत बुमराहने स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकातील 5व्या चेंडूवर षटकार ठोकताच. यासह सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम झाला. ड्रेसिंग रुममध्ये बसून प्रशिक्षक राहुल द्रविडनं टाळ्या वाजवून आनंद साजरा केला. बुमराहच्या फलंदाजीवर तो खूप खूश होता आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर यांच्याशी बोलतानाही दिसला. त्याचवेळी विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी आतून धावत हसत टाळ्यांचा कडकडाट केला. त्याचवेळी बुमराहसोबत फलंदाजी करणाऱ्या सिराजने त्याला मिठी मारली. कसोटीच्या इतिहासात यापूर्वी कधीही एका षटकात 30 धावा झाल्या नव्हत्या.

सेलिब्रेशनचा जबरदस्त व्हिडीओ पाहा

इतिहासात पहिल्यांदाच….

आज कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एका षटकात 30 किंवा त्याहून अधिक धावा झाल्या. जसप्रीत बुमराहनं 84 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर 4 धावा काढल्या. दुसरा चेंडू वाईड होता आणि त्यावर 4 धावाही घेतल्या. दुसऱ्या चेंडूवर बुमराहने पुन्हा षटकार ठोकण्याचा प्रयत्न केला मात्र हा चेंडू नोबॉल होता. पुढच्या 3 चेंडूत बुमराहने ब्रॉडवर सलग 3 चौकार मारले. त्याने पाचव्या चेंडूवर बॅकवर्ड स्क्वेअर लेगवर षटकार ठोकला. शेवटच्या चेंडूवर धाव घेतली. अशा प्रकारे षटकात एकूण 35 धावा झाल्या. ब्रॉडने ओव्हरमध्ये एकूण 8 चेंडू टाकले. बुमराह प्रथमच संघाचे नेतृत्व करत आहे.

हायलाईट्स

  1. रवींद्र जडेजानं इंग्लंडमध्ये पहिल्यांदा शतक झळकावलंय
  2. रवींद्र जडेजाचं कसोटी कारकिर्दीतील हे तिसरं आणि वर्षातील दुसरं शतक आहे
  3. 31 चेंडूत 16 धावा करून शमीला स्टुअर्ट ब्रॉडनं बाद केलं
  4. ब्रॉडचा हा कसोटी कारकिर्दीतील 550 वा विकेट आहे
  5. 33 वर्षीय रवींद्र जडेजाचे देशाबाहेर हे पहिलेचं कसोटी शतक आहे.
  6. वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात त्यानं 35 धावा दिल्या
  7.  कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हे सर्वात महागडं षटक ठरलंय