Jasprit Bumrah: कसोटी संघाचं कर्णधारपद भूषवण्याबद्दल जसप्रीत बुमराहचं मोठ विधान

रोहित वनडे, टी-20 मध्ये भारताचा कर्णधार आहे. राहुल दुखापतग्रस्त झाल्यामुळे केएल राहुल दक्षिण आफ्रिका दौऱ्यात कसोटीमध्ये उपकर्णधार होता.

Jasprit Bumrah: कसोटी संघाचं कर्णधारपद भूषवण्याबद्दल जसप्रीत बुमराहचं मोठ विधान
Jasprit bumrah (IPL/Twitter)
| Edited By: | Updated on: Jan 17, 2022 | 6:12 PM

मुंबई: विराट कोहलीने (Virat kohli) कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याने त्याच्याजागी कोण कर्णधार होणार? याची चर्चा सुरु आहे. रोहित शर्मा (Rohit sharma) आणि लोकेश राहुलचं (Lokesh Rahul) नाव आघाडीवर आहे. पण जसप्रीत बुमराह सुद्धा कर्णधारपदासाठी इच्छुक आहे, तसे संकेतच बुमराहने दिले आहेत. भारताच्या कसोटी संघाचं कर्णधारपद भूषवायला मिळालं, तर तो माझ्यासाठी एक प्रकारचा सन्मान असेल. पण पदाचा विचार न करता, संघाच्या गरजेननुसार मी माझ्याकाडून योगदान देत राहीन असे बुमराहने म्हटलं आहे.

पद असलं किंवा नसलं, तरी मी….
“पद असलं किंवा नसलं, मी माझ्याबाजूने गरजेनुसार, संघासाठी योगदान द्यायला तयार आहे” असे बुमराह सोमवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाला. संधी दिली, तर तो सन्मान असेल. पण संधी नाही मिळाली, तरी मी माझ्या क्षमतेनुसार सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन. चांगली कामगिरी करण्याकडे माझं लक्ष आहे” असे बुमराहने सांगितलं.

निवड समितीचे सदस्य राहुल आणि रोहितला भेटल्याचे वृत्त आहे. रोहित वनडे, टी-20 मध्ये भारताचा कर्णधार आहे. राहुल दुखापतग्रस्त झाल्यामुळे केएल राहुल दक्षिण आफ्रिका दौऱ्यात कसोटीमध्ये उपकर्णधार होता. विराटही दुखापतग्रस्त झाल्याने त्याला जोहान्सबर्ग कसोटीत संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. पण त्या कसोटीत पराभव झाला. उद्यापासून सुरु होणाऱ्या वनडे मालिकेत राहुलचं संघाचे नेतृत्व करणार आहे.

(Jasprit Bumrah on Test captaincy Will be an honour if I’m given the opportunity)