चमत्कार! जयदेव उनाडकटच्या विकेटची जोरदार चर्चा, आधी स्टंप लाईट पेटला आणि मग असं झालं

आयपीएल 2024 स्पर्धेच्या अंतिम फेरीत सनरायझर्स हैदराबादची निराशाजनक कामगिरी राहिली. सनरायझर्स हैदराबादला 18.3 षटकात सर्व गडीबाद 113 धावा करता आल्या आणि विजयासाठी 114 धावांचं आव्हान दिलं. या सामन्यात सुनील नरीनच्या षटकात एक चमत्कार घडला. जयदेव उनाडकट स्ट्राईकला होता आणि बॉल स्टंपला लागल्याने लाईट पेटला. पण बेल्स न पडल्याने नाबाद दिला. पण श्रेयस अय्यरने अपील केली आणि हवं तेच झालं.

चमत्कार! जयदेव उनाडकटच्या विकेटची जोरदार चर्चा, आधी स्टंप लाईट पेटला आणि मग असं झालं
Image Credit source: Twitter
| Updated on: May 26, 2024 | 10:13 PM

आयपीएल 2024 स्पर्धेच्या अंतिम फेरीत सनरायझर्स हैदराबादच्या वाघांनी गवत खाल्लं, असंच म्हणावं लागलं. एकही फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. सनरायझर्स हैदराबादकडून कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक 24 धावा केल्या. या व्यतिरिक्त एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. सनरायझर्स हैदराबादने 18.3 षटकात सर्व गडी गमवत 113 धावा केल्या आणि विजयासाठी 114 धावांचं आव्हान दिलं. या सामन्यातील हैदराबादच्या डावात एक चमत्कारीक घटना घडली. कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने संघाचं 18वं आणि वैयक्तिक चौथं षटक सुनील नरीनकडे सोपवलं. एकही विकेट न मिळाल्याने सुनील नरीन प्रयत्न करत होता. पहिले चार चेंडू एक दोन धावा आल्या. पाचव्या चेंडूवर एकदम विचित्र घटना घडली. जयदेव उनाडकट स्ट्राईकला होता आणि सुनील नरीनने त्याला पाचवा चेंडू टाकला. नरीनने टाकलेला चेंडूवर फटका मारण्यासाठी उनाडकटने एक पाय पुढे टाकला आणि फसला. चेंडू थेट पायाला आदळला आणि बेल्सला घासून गेला. बेल्स काही पडली नाही पण स्टंप लाईट पेटला. यामुळे उनाडकटचं नशिब जोरात असल्याची चर्चा रंगली. पंचांनीही काहीच निर्णय दिला नाही. पण श्रेयस अय्यरने डीआरएस रिव्ह्यू घेतला आणि पाहीजे तेच झालं.

जयदेव उनाडकटच्या चेंडू पायाला आदळला होता. त्यामुळे डीआरएस रिव्ह्यूत चेंडू स्टंपला लागत असल्याचं स्पष्ट झालं. फिल्डवरच्या पंचांना तिसऱ्या पंचांचा आदेश येताच निर्णय बदलावा लागला. पंचांनी बाद असल्याचं घोषित केलं. त्यामुळे श्रेयस अय्यर आणि कधी नव्हे ते सुनील नरीनच्या तोंडावर हसू दिसलं. सुनील नरीनला विकेट मिळाली. त्याने 4 षटकं टाकली आणि 1 गडी बाद करत 16 धावा दिल्या. त्यामुळे अंतिम फेरीत सुनील नरीनला विकेट मिळवण्यात यश आलं. कारण त्याच्या तिसऱ्या षटकात पॅट कमिन्सचा झेल मिचेल स्टार्कने सोडला होता.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

कोलकाता नाईट रायडर्स इम्पॅक्ट प्लेयर्स: अनुकुल रॉय, मनीष पांडे, नितीश राणा, केएस भरत, शेरफेन रदरफोर्ड

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन.

सनरायझर्स हैदराबाद इम्पॅक्ट प्लेयर्स: उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, मयंक मार्कंडे, अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर