इंग्लंडच्या 3 दिग्गज खेळाडूंची IPL 2021 मधून माघार, मँचेस्टर कसोटी रद्द झाल्याचा परिणाम?

| Updated on: Sep 11, 2021 | 7:59 PM

भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टर कसोटी रद्द (Manchester Test Called Off) झाल्यामुळे आयपीएल - 2021 च्या दुसऱ्या टप्प्यावर परिणाम झाला आहे.

इंग्लंडच्या 3 दिग्गज खेळाडूंची IPL 2021 मधून माघार, मँचेस्टर कसोटी रद्द झाल्याचा परिणाम?
Follow us on

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टर कसोटी रद्द (Manchester Test Called Off) झाल्यामुळे आयपीएल – 2021 च्या दुसऱ्या टप्प्यावर परिणाम झाला आहे. इंग्लंडचे तीन खेळाडू डेव्हिड मलान, जॉनी बेअरस्टो आणि ख्रिस वोक्स लीगमधून बाहेर पडले आहेत. यापैकी कोणीही मँचेस्टर कसोटीला दोष दिला नसला तरी असे मानले जात आहे की, कसोटी रद्द होणे हेच त्यामागचे प्रमुख कारण आहे. इंग्लंडच्या तिन्ही खेळाडूंनी टी -20 विश्वचषक आणि अॅशेस मालिकेच्या तयारीचे कारण देत आयपीएलमधून माघार घेतली आहे. डेव्हिड मलानने आयपीएल 2021 मधून माघार घेतली असल्याची पुष्टी पंजाब किंग्सने केली आहे. (Jonny Bairstow, Dawid Malan, Chris Woakes pull out of IPL 2021)

फ्रेंचायझीने शनिवारी एक निवेदन जारी केले की, मलान आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी यूएईमध्ये येणार नाही. त्याने टी – 20 विश्वचषक आणि अॅशेस मालिकेपूर्वी काही काळ कुटुंबासोबत घालवण्याचा निर्णय घेतला आहे. मलानची बदली म्हणून पंजाबने दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करमला (Aiden Markaram) संघात समाविष्ट केले आहे.

इंग्लिश खेळाडूंनी वर्ल्ड कप आणि अॅशेस मालिकेचे कारण देत आयपीएलमधून माघार घेत असल्याची माहिती दिली आहे. पण यामागील कारण म्हणजे भारत आणि इंग्लंड दरम्यान रद्द झालेली मँचेस्टर कसोटी असल्याची चर्चा आहे. किंबहुना, भारताविरुद्धची ही कसोटी रद्द झाल्यानंतर इंग्लिश चाहते तसेच खेळाडू बीसीसीआय आणि टीम इंडियावर खूप नाराज होते. ही कसोटी रद्द करण्यासाठी त्यांनी टीम इंडियाला जबाबदार धरले आहे.

आयपीएल 2021 मध्ये भाग घेणारे इंग्लंडचे पाच खेळाडू माघार घेऊ शकतात असले बोलले जात आहे. मोईन अली, जॉनी बेअरस्टो, डेव्हिड मलान, ख्रिस वोक्स आणि सॅम करन हे या स्पर्धेतून माघार घेऊ शकतात. सध्या यापैकी तिघांनी (बेअरस्टो, वोक्स, मलान) माघार घेतली असल्याचे स्पष्ट आहे. मलान आणि बेअरस्टोने माघार घेतल्याने हैदराबाद आणि पंजाबला मोठा धक्का बसला आहे. विशेषत: हैदराबाद फ्रँचायझीसाठी मोठा धक्का आहे, कारण बेअरस्टोने गेल्या दोन हंगामात संघासाठी खूप चांगली कामगिरी केली होती. हैदराबादने अद्याप बदलीची घोषणा केलेली नाही.

आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्याआधीच इंग्लंडच्या अनेक खेळाडूंनी आपली नावे मागे घेतली आहेत. त्यात राजस्थान रॉयल्सचे फलंदाज जॉस बटलर, जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्स यांचाही समावेश आहे. जॉस बटलरच्या पत्नीने नुकताच एका बाळाला जन्म दिला आहे. त्यामुळे बटलरने स्पर्धेतून माघार घेतली आहे. स्टोक्स त्याच्या मानसिक स्थितीमुळे सध्या क्रिकेटपासून दूर आहे. आर्चरच्या कोपरावर शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे तो क्रिकेटपासून पूर्णपणे दूर असेल.

इतर बातम्या

Ind vs Eng : पाचवी टेस्ट रद्द, इंग्लंड क्रिकोट बोर्डाला 400 कोटींचा फटका, सौरव गांगुली तातडीनं इंग्लंडच्या दौऱ्यावर

Ind vs Eng : पाचवी टेस्ट रद्द, टीम इंडियानं मालिका विजयाची संधी गमावली? इंग्लंडला ‘असा’ होणार फायदा

चहलला विश्वचषकासाठी संघात स्थान न मिळाल्याने पत्नी धनश्री भावूक, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना, म्हणाली…

(Jonny Bairstow, Dawid Malan, Chris Woakes pull out of IPL 2021)