AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट नाही तर, ‘या’ खेळाडूंचे कव्हर ड्राईव्ह बेस्ट, पाकिस्तानच्या बाबर आजमच मत

सध्याच्या घडीला बाबर आजम पाकिस्तानी संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. तसेच तो आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजाच्या क्रमवारीतही अव्वल क्रमांकावर आहे.

विराट नाही तर, 'या' खेळाडूंचे कव्हर ड्राईव्ह बेस्ट, पाकिस्तानच्या बाबर आजमच मत
Virat Kohli_Babar Azam
| Edited By: | Updated on: Jun 09, 2021 | 5:58 PM
Share

कराची : भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या जगातील अव्वल क्रमाकांचा फलंदाज आहे. सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये विराट धडाकेबाज फलंदाजी करतो. त्यात विराटच्या कव्हर ड्राईव्हचं तर सर्वचजण कौतुक करतात. मात्र आयसीसीने (ICC) क्रिकेट फॅन्सकडून त्यांच्या आवडत्या कव्हर ड्राईव्हबद्दल ऑनलाईन मतदान करवलं तेव्हा पाकिस्तानच्या बाबर आजमच्या (Babar Azam) कव्हर ड्राईव्हला सर्वाधिक मतं मिळाली. यावेळी बाबरने माझ्या कव्हर ड्राईव्हची तुलना विराटसोबत करण्यात आली, याचा मला अभिमान आहे, असं मत दिलं. पण स्वत: बाबर आजमला त्याचा आवडता कव्हर ड्राईव्ह मारणारा खेळाडू कोण याच्याबद्दल विचारलं असता त्याने विराटच नाही तर इतर दोघा खेळाडूंची नाव घेतली. (Kane Williamson Ian Bell Cover Drive Is Better Than Virat Kohli says Babar Azam)

बाबरने इंग्लंडचा माजी खेळाडू इयान बेल (Ian Bell) आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनचा (Kane Williamson) कव्हर ड्राईव्ह सर्वात जास्त आवडतो असं वक्तव्य केलं आहे. बेलच्या कव्हर ड्राईव्हबद्दल बोलताना बाबर म्हणाला,‘इयान बेलचा कव्हर ड्राइव्ह अत्यंत स्मूथ असायचा. अगदी स्लो मोशनमध्ये खेळतोय असं वाटायचं.’ तर केनबद्दल बोलताना बाबर म्हणाला, ‘केनचा कव्हर ड्राइव्हतर शानदार असतो. तो थोडा वेळ घेऊन खेळतो पण उत्कृष्ट खेळतो.’

‘मला कव्हर ड्राईव्ह नको खेळू म्हणायचे’

बाबर आजम स्वत:च्या कव्हर ड्राईव्हबद्दल बोलताना म्हणाला, ‘मी अगदी नैसर्गिकरित्या कव्हर ड्राईव्ह खेळतो. मी माझ्या करीयरच्या सुरुवातीला कव्हर ड्राईव्हवर खूप मेहनत घेतली आहे. अनेकजण मला कव्हर ड्राईव्ह जमत नाही खेळू नको असे म्हणायचे. तरी मी त्यावर काम करुन त्यात सुधार आणला.’

बाबर आणि कोहलीमध्ये काटेंकी टक्कर

बाबर आजम हा सध्या पाकिस्तानचा सर्वात बेस्ट फलंदाज असून आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजाच्या (ICC Batsman Ranking) यादीत तो 865 गुणांसह पहिल्या स्थानी आहे. तर भारतीय कर्णधार विराट 857 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. अलीकडे बाबरने केलेल्या अप्रतिम कामगिरीमुळे तो नंबर एकला पोहोचला असून अलीकडे विराट आणि त्याच्यात अव्वल कोण यासाठी चूरशीची लढत दिसून येते.

हे ही वाचा –

IPL मधून कोट्यावधी कमावून भारतीयांचीच थट्टा, इंग्लंडच्या बटलर-मॉर्गनने रंग दाखवला

प्रेयसीसोबतची सेक्स टेप लीक, सनथ जयसूर्या अडकला, बदल्यासाठी घृणास्पद कृत्य

या अंपायरने अंपायरींग केली की टीम इंडिया मॅच हरतेच, WTC फायनलसाठी ICC कडून ‘या’ अंपायरची घोषणा!

(Kane Williamson Ian Bell Cover Drive Is Better Than Virat Kohli says Babar Azam)

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.