AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 : देशापेक्षा ‘या’ 4 प्लेयर्ससाठी IPL स्पर्धा मोठी, कॅप्टनच स्वत: नाही खेळणार

IPL 2023 : देश नाही, पैसा मोठा या खेळाडूंनी तेच दाखवून दिलय. देशासाठी खेळण्याऐवजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनेक मोठे खेळाडू आयपीएलला प्राधान्य देतात. त्यामागे कारण असतो पैसा.

IPL 2023 : देशापेक्षा 'या' 4 प्लेयर्ससाठी IPL स्पर्धा मोठी, कॅप्टनच स्वत: नाही खेळणार
IPL 2023
| Updated on: Mar 14, 2023 | 1:16 PM
Share

IPL 2023 News : ख्राइस्टचर्च टेस्टमध्ये नाबाद शतक झळकवून कॅप्टन केन विलियमसनने न्यूझीलंडला श्रीलंकेविरुद्ध दोन विकेटने विजय मिळवून दिला. तोच विलियमसन आता दुसऱ्या कारणांमुळे चर्चेत आहे. त्याच्या शतकी खेळीनंतर 24 तासांनी न्यूझीलंडच्या वनडे टीमची घोषणा झाली आहे. त्यात कॅप्टन केन विलियमसनच नाव नाहीय. फक्त विलियमसनच नाही, टिम साऊदी, डेवन कॉनवे आणि मिचेल सँटनर हे तीन खेळाडू सुद्धा स्क्वाडचा भाग नाहीयत.

न्यूझीलंडने मंगळवारी वनडे टीमची घोषणा केली. टॉम लॅथमची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आलीय. नियमित कॅप्टन केन विलियमसन वनडे सीरीज ऐवजी आयपीएल 2023 मध्ये खेळताना दिसेल.

तीन खेळाडू आयपीएलसाठी टीमची साथ सोडणार

टिम साऊदी, ड्वेन कॉनवे आणि मिचेल सँटनर सुद्धा आयपीएलमध्ये खेळताना दिसतील. न्यूझीलंडचे आणखी तीन प्लेयर श्रीलंकेविरुद्ध पहिला वनडे सामना खेळल्यानतंर आयपीएल खेळण्यासाठी भारतात येणार आहेत.

किती खेळाडू भारतात येणार?

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने कॅप्टन केन विलियमसनसह चार खेळाडूंना श्रीलंकेविरुद्ध वनडे, टी 20 सीरीजऐवजी आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी दिली आहे. विलियमसन गुजरात टायटन्सचा भाग आहे. टिम साऊदी केकेआर, डेवन कॉनवे आणि मिचेल सँटनर चेन्नई सुपर किंग्सचा भाग आहेत.

25 मार्चला ऑकलंडमध्ये पहिला वनडे सामना होईल. त्यानंतर फिन एलेन, लॉकी फर्ग्युसन आणि ग्लेन फिलिप्स भारतासाठी रवाना होतील. फिन एलेन रॉयल चॅलेंजर्स बँगलोरसाठी खेळतो. लॉकी फर्ग्युसन केकेआर आणि मिचेल सँटनर चेन्नई सुपर किंग्सचा भाग आहे.

वनडे टीमची घोषणा

विलियमसनच्या अनुउपस्थितीत न्यूझीलंडच नेतृत्व टॉम लॅथमकडे आहे. दुसऱ्या वनडेआधी तीन खेळाडू मार्क चॅपमॅन, बेन लिस्ट आणि हेनरी निकल्स टीममध्ये सहभागी होतील. वनडे टीममध्ये टॉम ब्लंडेल आणि विल यंग यांचा समावेश झालाय. बोवेस आणि बेन लिस्टर यांना पहिल्यांदा किवी टीममध्ये स्थान मिळालय. न्यूजीलंडची वनडे टीम- टॉम लॅथम (कॅप्टन), फिन एलेन (पहिली वनडे), टॉम ब्लंडेल, चेड बोवेस, मायकल ब्रेसवेल, मार्क चॅपमॅन (दूसरी, तीसरी वनडे), लॉकी फर्ग्युसन (पहिली वनडे), मॅट हेनरी, बेन लिस्टर (दूसरी, तीसरी वनडे), डॅरेल मिचेल, हेनरी निकल्स (दुसरी, तीसरी वनडे), ग्लेन फिलिप्स (पहिली वनडे), हेनरी शिप्ले, ईश सोढ़ी, ब्लेयर टिकनर आणि विल यंग.

Follow Us
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा, शिंदे, चाकणकर अन्..
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आ
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आला समोर
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला... बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्
मोठी बातमी! प्रवाशांचा श्वास गुदमरला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्रेस
ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याचं धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच मोठं
Omraje Nimbaklar | ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याने धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच केलं मोठं विधान, पुन्हा...
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री
CM Devendra Fadnavis | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कुटुंबीयांच्या भेटीला
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत...
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत... बड्या नेत्याने एक एक करत सगळंच सांगितलं
एकच खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री
खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री; त्याला सगळंच... डोकं चक्रावणारा खुलासा
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन नेत्यांमध्ये रुसवारुसवी... कारण अत्यंत चकित करणार
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची ऑफर?