KKR Champion : श्रेयस अय्यरने विजयानंतर सांगितला सामन्याचा टर्निंग पॉइंट, हैदराबादचा तो निर्णय पडला पथ्यावर

आयपीएल 2024 स्पर्धेच्या जेतेपदावर कोलकाता नाईट रायडर्सने नाव कोरलं आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सचं पारडं जड होतं. ते शेवटपर्यंत कायम राहिलं. अंतिम सामन्यात नाणेफेकीचा कौल हैदराबादच्या बाजूने लागला तर सामन्यावर कोलकात्याने पकड मिळवली. या विजयानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने टर्निंग पॉइंट सांगितला.

KKR Champion : श्रेयस अय्यरने विजयानंतर सांगितला सामन्याचा टर्निंग पॉइंट, हैदराबादचा तो निर्णय पडला पथ्यावर
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 27, 2024 | 12:59 AM

आयपीएल 2024 स्पर्धेच्या जेतेपद मिळवण्यात कोलकाता नाईट रायडर्सला यश आलं. अंतिम फेरीत कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबाद 8 विकेट्स राखून पराभूत केलं. सनरायझर्स हैदराबादने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हाच निर्णय कोलकात्याच्या पथ्यावर पडला. सनरायझर्स हैदराबादचं गणित पहिल्या षटकापासून फिस्कटलं. सनरायझर्स हैदराबदला 18.3 षटकात सर्व गडी बाद 113 धावा करता आल्या. हैदराबादने विजयासाठी 114 धावांचं दिलं होतं. हे आव्हान कोलकाता नाईट रायडर्सने 10.3 षटकात 2 गडी गमवून पूर्ण केलं. कोलकात्याने आयपीएल इतिहासात तिसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरलं आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात कोलकात्याने पहिल्यांदा जेतेपदावर नाव कोरलं. यापूर्वी गौतम गंभीरच्या नेतृत्वात दोनवेळा जेतेपद मिळवलं होतं. कोलकात्याने हैदराबादवर 8 गडी राखून विजय मिळवल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने विजयाचा टर्निंग पॉइंट सांगून टाकला. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने काय चूक केली ते सामन्यानंतर सांगितलं.

“सनरायझर्स हैदराबाद खरंच या स्पर्धेत चांगलं खेळली. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर त्यांनी प्रथम फलंदाजी स्वीकारली. त्यांच्या निर्णयामुळे आम्ही भाग्यवान ठरलो. त्या निर्णयानंतर प्रत्येक परिस्थिती आमच्या बाजूने गेली. सनरायझर्स हैदराबाद स्पर्धेत ज्या पद्धतीने खेळली त्यांचे खरंच आभार.” असं कोलकात्याचा कर्णधार श्रेयस अय्यर याने सांगितलं. “आम्ही या स्पर्धेत खरंच छान खेळलो. टीम म्हणून आम्ही चांगल्या खेळाचं प्रदर्शन केलं. प्रत्येक खेळाडूंनी आपली भूमिका चोखपणे बजावली”, असंही श्रेयस अय्यर याने सांगितलं.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

कोलकाता नाईट रायडर्स इम्पॅक्ट प्लेयर्स: अनुकुल रॉय, मनीष पांडे, नितीश राणा, केएस भरत, शेरफेन रदरफोर्ड

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन.

सनरायझर्स हैदराबाद इम्पॅक्ट प्लेयर्स: उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, मयंक मार्कंडे, अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर