AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KKR vs CSK 2023 : Ajinkya Rahane ची कॅप्टन MS Dhoni वर मात, माही रिटायर होण्याआधी अजिंक्यचा रेकॉर्ड तोडू शकेल का?

Kolkata Knight Riders vs Chennai Super Kings: अजिंक्य रहाणे (Anjinya Rahane) रविवारी 29 चेंडूत नाबाद 71 धावांची इनिंग खेळला. रहाणेने ही कामगिरी करताना एमएस धोनीला मागे टाकलं.

KKR vs CSK 2023 : Ajinkya Rahane ची कॅप्टन MS Dhoni वर मात, माही रिटायर होण्याआधी अजिंक्यचा रेकॉर्ड तोडू शकेल का?
Ajinkay rahane-MS Dhoni
| Updated on: Apr 24, 2023 | 1:06 PM
Share

KKR vs CSK IPL 2023 : सध्या क्रिकेट विश्वात अजिंक्य रहाणेचीच चर्चा आहे. सर्वच जण एकच गोष्ट बोलतायत, अजिंक्य रहाणेने असं काय खाल्लय? ज्यामुळे तो इतकी तुफानी बॅटिंग करतोय. आयपीएलमध्ये रविवारी रात्री इडन गार्डन्सवर सीएसके आणि केकेआरमध्ये मॅच झाली. या सामन्यात अजिंक्यने आपल्या तुफानी बॅटिंगने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्याने दे दणादण चौकार, षटकारांची बरसात केली. केकेआरच्या बॉलर्सचा त्याने चांगलाच समाचार घेतला.

29 चेंडूत अजिंक्य रहाणेने 71 धावा फटकावल्या. या खेळीत त्याने सहा फोर आणि पाच सिक्स मारले. या इनिंगद्वारे अजिंक्य रहाणेने चेन्नई सुपर किंग्ससाठी वेगवान अर्धशतक झळकवताना एमएस धोनीला मागे टाकलं.

CSK कडून वेगवान अर्धशतक कोणी झळकवलय?

चेन्नईसाठी सर्वात वेगवान अर्धशतक झळकवणाऱ्या खेळाडूंमध्ये सुरेश रैनाच नाव सर्वात वरती आहे. रैनाने वर्ष 2014 मध्ये मुंबईमध्ये पंजाब विरुद्ध फक्त 14 चेंडूत अर्धशतक झळकावल होतं. आता रैनानंतर रहाणेने अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक झळकवलं. मोइन अलीसह रहाणे दुसऱ्या स्थानावर आहे. मोइन अलीने मागच्यावर्षी मुंबईत राजस्थान विरुद्ध 19 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं.

धोनीसोबत आणखी दोघे तिसऱ्या स्थानावर

चेन्नईच्या अन्य फलंदाजांबद्दल बोलायच झाल्यास, एमएस धोनी तिसऱ्या नंबरवर आहे. वर्ष 2012 मध्ये बंगळुरुत मुंबई विरुद्ध त्याने 20 चेंडूत अर्धशतक झळकवल होतं. धोनीसोबत आणखी दोन फलंदाज आहेत, जे संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानावर आहेत. यात एक अंबाती रायुडू आणि शिवम दुबे आहे. त्याने केकेआर विरुद्ध रविवारी धोनीची बरोबरी केली. धोनीला रहाणेचा रेकॉर्ड मोडणं जमेल का?

शिवम दुबेने केकेआर विरुद्ध मोठे फटके खेळताना 20 चेंडूत अर्धशतक झळकावलं. आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्सच्या कुठल्याही फलंदाजाच संयुक्तरित्या हे तिसरं वेगवान अर्धशतक आहे. अजिंक्य रहाणेची चर्चा असताना आता धोनीने आयपीएलमधून रिंटायरमेंटचे संकेत दिलेत. आय़पीएलमधून रिटायर होण्याआधी धोनीला रहाणेचा 19 चेंडूतील अर्धशतकाचा रेकॉर्ड मोडणं जमले का? हा प्रश्न आहे.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....