IPL 2024 : दिनेश कार्तिकचा महारेकॉर्ड, आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा तिसराच खेळाडू

Dinesh Karthik IPL 2024 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा दिग्गज खेळाडू दिनेश कार्तिकने कीर्तीमान केला आहे. कार्तिक आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तिसराच फलंदाज ठरला आहे.

IPL 2024 : दिनेश कार्तिकचा महारेकॉर्ड, आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा तिसराच खेळाडू
Dinesh Karthik Rcb Ipl 2024,
Image Credit source: BCCI/IPL
| Updated on: Apr 21, 2024 | 5:17 PM

आयपीएलच्या 17 व्या हंगमातील 36 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे कोलकातामधील ऐतिहासिक ईडन गार्डनमध्ये करण्यात आलं आहे. आरसीबीचा अनुभवी फलंदाज आणि विकेटकीपर दिनेश कार्तिकने या सामन्यासाठी मैदानात उतरताच इतिहास रचला आहे. कोलकाता विरुद्धचा सामना हा दिनेश कार्तिकच्या आयपीएल कारकीर्दीतील हा 250 वा सामना ठरला आहे. आरसीबी टीमने सोशल मीडियावरुन कार्तिकच्या या 250 सामन्याचं खास पोस्टर पोस्ट केलं आहे.

दिनेश कार्तिक आयपीएलमध्ये 250 सामने खेळणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. दिनेश कार्तिक आधी आयपीएलमध्ये महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्मा या दोघांनी 250 पेक्षा जास्त सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याबाबत महेंद्रसिंह धोनी अव्वल स्थानी आहे. त्यानंतर रोहित शर्मा दुसऱ्या स्थानी आहे. त्यानंतर आता दिनेश कार्तिकचं नाव जोडलं गेलं आहे. त्यानंतर अनुक्रमे विराट कोहली, रवींद्र जडेजा, शिखर धवन, सुरेश रैना, रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, आर अश्विन किरॉन पोलार्ड आणि पीयूष चावला यांचा समावेश आहे.

दिनेश कार्तिकची सुपर कामगिरी

दरम्याना दिनेश कार्तिकने आतापर्यंत आयपीएलच्या या 17 व्या मोसमात बॅटिंगने धमाकेदार कामगिरी केली आहे. कार्तिकने आतापर्यंत 6 सामन्यात 75.33 एव्हरेज आणि 205.45 च्या स्ट्राईक रेटने 226 धावा केल्या आहेत. कार्तिकने या दरम्यान 2 अर्धशतकही ठोकली आहेत.

दिनेश कार्तिकचा आयपीएलमधील 250 वा सामना

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमेरून ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल आणि मोहम्मद सिराज.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, आंग्रिश रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा.