AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2023 टीम इंडियाच्या घोषणेआधी केएल राहुल याची फेसबूक पोस्ट व्हायरल, म्हणाला..

KL Rahul Latest Facebook Post : येत्या वर्ल्ड कप 2023 साठी टीम इंडियाच्या संघाची बीसीसीआयकडून घोषणा करण्यात आली नाही. मात्र आज संघ जाहीर करण्याचा शेवटचा दिवस असल्याने काही वेळात संघ जाहीर होणार आहे. मात्र त्याआधी स्टार खेळाडू के.एल. राहुल याची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

World Cup 2023 टीम इंडियाच्या घोषणेआधी केएल राहुल याची फेसबूक पोस्ट व्हायरल, म्हणाला..
टीम इंडियाचा स्टार खेळाडू के. एल राहुल दुखापतीमधून पूर्णपणे बरा झाला आहे. आशिया कपमधील सुपर 4 फेरीमधील सामन्यांमध्ये खेळताना दिसेल. आयपीएलमध्ये मांडीला दुखापत झाल्याने बाहेर पडलेल्या राहुलने आता कमबॅक केलं आहे. अशातच के. एल. राहुल याची वर्ल्ड कप संघामध्ये निवड झालेली आहे.
| Updated on: Sep 05, 2023 | 12:24 PM
Share

मुंबई :  टीम इंडियाचा केएल राहुल हा गेले अनेक महिन्यांपासून दुखापतीच्या कचाट्यात होता. बंगळुरुतील एनसीएत दुखापतीवर जोरदार मेहनत घेतली आणि टीम इंडियात कमबॅक केलं. केएलची आशिया कपसाठी निवड करण्यात आली. मात्र त्याला पाकिस्तान आणि नेपाळ विरुद्ध खेळता आलं नाही. केएल खेळणार नसल्याचं टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड यांनी स्पष्ट केलं होतं.

टीम इंडियाने 4 सप्टेंबर रोजी नेपाळला पराभूत करत आशिया कप 2023 सुपर 4 मध्ये धडक दिली. वर्ल्ड कप 2023 साछी बीसीसीआय निवड समिती 5 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी भारतीय संघाची घोषणा करणार आहे. त्याआधी के एल राहुल याने फेसबूक पोस्ट केली आहे. केएलची सोशल मीडिया पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे.

के.एल.च्या पोस्टमध्ये काय?

के.एल.ने सोशल मीडियावर पोस्टद्वारे त्याच्या दुखापतीसाठी एनसीएमध्ये मेहनत घेणाऱ्या टीमचे जाहीर आभार मानले आहेत. तसेच त्याने पाठिंब्याबद्दल बीसीसीआयला धन्यवाद दिलेत.

“माझ्यासाठी गेली अनेक महिने ही आव्हानात्मक आणि धडा देणारी होती. मी यातून बरंच काही शिकलो. नितीन सर, योगेश सर, धनंजय भाई, रजनी, शालिनी यांच्यासह एनसीएतील त्या सर्वांचा मी आभारी आहे, ज्यांनी माझ्यासाठी फार कठोर परिश्रम घेतले आणि मला खेळण्यासाठी पूर्णपणे तयार केलं.” , असं केएलने पोस्टमध्ये म्हटलंय.  तसेच लंडनमधील वेलिंग्टन हॉस्पिटलमधील टीम आणि डॉ. राहुल पटेल यांचेही केएलने आभार मानले आहेत.

केएलला आयपीएल 16 व्या मोसमादरम्यान दुखापत झाली होती. केएलला त्यामुळे आृपीएलमधून बाहेर पडावं लागलं होतं. त्यानंतर केएलची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये निवड करण्यात आली. मात्र केएलला दुखापतीमुळे तिथेही खेळता आलं नाही. त्यामुळे केएलने एनसीएत दुखापतीतून बाहेर पडण्यासाठी एनसीएत कठोर परीश्रम घेतले.

काही दिवसांआधी केएलची आशिया कपमध्ये निवड केली. केएल खेळणार नसल्याचं बीसीसीआयने जाहीर केलं. केएलने पुन्हा मेडिकल टेस्च दिली. केएल पूर्णपणे फीट असल्याचं बीसीसीआयच्या मेडिकल टीमने जाहीर केलं. त्यानंतर आता केएलने ही पोस्ट केलीय.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.