AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI : केएल राहुलचं 11 वं कसोटी शतक, शास्त्री-अमरनाथ यांच्या विक्रमाची बरोबरी, विंडीज विरुद्ध दणक्यात सुरुवात

KL Rahul Century : भारताचा अनुभवी फलंदाज केएल राहुल याने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये शतक झळकावलं आहे. केएलचं विंडीज विरुद्ध हे दुसरं कसोटी शतक ठरलं.

IND vs WI : केएल राहुलचं 11 वं कसोटी शतक, शास्त्री-अमरनाथ यांच्या विक्रमाची बरोबरी, विंडीज विरुद्ध दणक्यात सुरुवात
KL Rahul Century IND vs WI 1st TestImage Credit source: Social Media
| Updated on: Oct 03, 2025 | 12:21 PM
Share

टीम इंडियाचा अनुभवी आणि सलामीवीर फलंदाज केएल राहुल याने वेस्ट इंडिज विरूद्धच्या कसोटी मालिकेत अप्रतिम सुरुवात केली आहे. केएलने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पहिल्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी अप्रतिम शतक ठोकलं आहे. केएलने  शिट्टी वाजवत शतक साजरं केलं. केएलने यासह मायदेशात तब्बल 9 वर्षांची प्रतिक्षा संपवली. तसेच केएलने या शतकासह भारतीय संघाचे माजी दिग्गज फलंदाज रवी शास्त्री आणि मोहिंदर अमरनाथ यांच्या विक्रमाची बरोबरी केली.

केएलचं मायदेशात 9 वर्षांनंतर कसोटी शतक

रोस्टन चेज याने भारतीय डावातील 65 व्या ओव्हरमधील टाकलेल्या पाचव्या बॉलवर केएलने 1 धाव घेतली. केएलने यासह शतक पूर्ण केलं. केएलला शतकापर्यंत पोहचण्यासाठी 190 चेंडूचां सामना केला. केएलने या शतकी खेळीत 12 चौकार ठोकले. केएलचं हे कसोटी कारकीर्दीतील 11 वं तर मायदेशातील नववं शतक ठरलं. केएलने मायदेशात जवळपास 9 वर्षांनंतर 3 हजार 211 व्या दिवशी शतक ठोकलं आणि प्रतिक्षा संपवली. केएलने मायदेशातील पहिलंवहिलं शतक हे 2016 साली केलं होतं.

शास्त्री-अमरनाथ यांच्या विक्रमाची बरोबरी

केएलने या शतकासह भारतीय माजी फलंदाज रवी शास्त्री आणि मोहिंदर अमरनाथ या दोघांच्या 11 कसोटी शतकांची बरोबरी केली. या दोन्ही माजी दिग्गजांनी त्यांच्या कसोटी कारकीर्दीत 11 वेळा शतकी खेळी साकारली होती.

केएलच्या शतकाचं वैशिष्ट्य

केएलचं 2025 या वर्षात ओपनर म्हणून तिसरं शतक ठरलं. तसेच केएल या वर्षात सर्वाधिक शतक करणारा एकूण दुसरा फलंदाज ठरला आहे. तसेच केएलचं हे विंडीज विरुद्धचं दुसरं कसोटी शतक ठरलं. तसेच केएल भारतासाठी सर्वाधिक कसोटी शतक करणारा पहिला सक्रीय फलंदाजही आहे.

टीम इंडिया मजबूत स्थितीत

दरम्यान या कसोटीत टीम इंडिया आतापर्यंत मजबूत स्थितीत आहे. भारताने विंडीजला पहिल्या डावात 164 धावांवर रोखलं. त्यानंतर भारताने दुसऱ्या दिवशी लंचपर्यंत 3 विकेट्स गमावून 67 ओव्हरमध्ये 218 रन्स केल्या आहेत. केएल 100 आणि ध्रुव जुरेल 14 रन्सवर नॉट आऊट आहेत. त्याआधी कॅप्टन शुबमन गिल 100 चेंडूत 50 धावा करुन बाद झाला. तर यशस्वी जैस्वाल याने 36 आणि साई सुदर्शन याने 7 धावा केल्या.

केएलची कसोटीत धावांबाबत सर्वोत्तम वर्षं

दरम्यान केएलसाठी 2025 हे आतापर्यंत कसोटी क्रिकेटमधील धावांबाबत सर्वोत्तम वर्ष ठरलं आहे. केएलने शतकासह या वर्षात 649 धावा केल्या आहेत.

2025 – 649 धावा 2024 – 493 धावा 2017 – 633 धावा 2016 – 539 धावा

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…